ड्राय डे

एकादशीच्या दिवशीच साला असतो का ड्राय डे ब्लॅक ने शोधा, गावभर फिरा असले कसले कायदे उपवासाच्या चकण्याबरोबर लागते मस्त दारू दारू भेटली हेच बस्स झालं आता देशी मारू सही बात बोला भाई सही बात बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. उन्हामध्ये चालता चालता घामामध्ये भिजलो ६० ९० ३० साठी गोल गोल फिरून थकलो थोडी जरी भेटली आता मारेन ती कच्ची साबुदाण्याची खिचडी चालेल नको आता मच्छी सही बात बोला भाई एकदम सही बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. घशाला माझ्या कोरड पडली आता तरी पाव घोटभर जरी भेटली तरी घेईन तुझंच नाव शोधून शोधून दमलो मी आता कुठं भेटेना थरकाप माझ्या अंगाचा काही केल्या थांबेना क्या बात बोला भाई एकदम सही बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. आता तर मी काढनाराय ड्राय डे वाल कॅलेंडर वाईन शॉप च्या बाहेर जाऊन तारखा तेवढ्या पेंट कर आता कोणाची होणार नाय आदल्या दिवशी दमछाक कॅलेन्डर तुझ्यासाठी काढलाय मित्रा फक्त एक पेग देऊन टाक सही बात बोला भाई दिमाग से बोला! ड्राय डे का कॅलेन्डर बडे इज्जत से खोला कुणी तरी द्या बाबा कुणी तरी द्या उद्या पाहिजे तर मा...