मैफिल
मैफिल सा रे ग म प ध नि सा ... हा सा आला तुमच्यावर चला गाणं बोला पाहू..... आणि सचिन अवाक होऊन तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता. तीच लक्ष मात्र अडकित्त्याने सुपारी कातरण्याकडे असलं तरी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आलेले दिसत होते. दोन आठवड्यापूर्वी... सचिन मुंबई मध्ये म्युन्सिपालटी मध्ये कारकून म्हणुन १५ वर्ष कार्यरत होता त्याच लग्न २ वर्षांपूर्वीच झालं होत. तो आज हि गडबडीत कामाला जायची तयारी करत असताना मीना ने म्हणजेच याच्या बायकोने आतून डब्बा घेऊन येताना त्याच्याकडे रागात बघून विचारले. '' मग यावेळी लग्नाचा वाढदिवस साजरा कुठे करायचा कि घरीच बसायचं नटून.. त्यावर सचिन तिच्याकडे हसत हसत बघून उगाच लाडात आल्याचं दाखवत बोलला आज रात्री मी माझा प्लॅन सांगतो आपण खूप धमाल करायची आपण या वेळी कुठे तरी बाहेर जाऊयात. आणि तो बॅग उचलून घराबाहेर गेला इकडे मीना चा आनंद गगनात मावेना झाला ती खिडकीत आली आणि नवऱ्याला जाताना पाहू लागली आणि सचिन च लक्ष खिडकीकडे गेलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला आज चक्क ती सचिन ला टाटा करत होती आणि तोंडावर गॉड हास्य त्याने सुद्धा वर पाहून हात हलवला इतक...