हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग २) ड्राइव्हर गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याचा राम नाम जप चालूच होता. तितक्यात सायकलच्या घंटीचा आवाज आला ड्राइवर ने बोलावलेला गाडी रिपेअर करणारा धापा टाकत आला होता. त्याने लांबूनच मोठ्या आवाजात विचारलं कशी काय बंद पडली ड्राइवर त्याच्या दिशेने वळला आणि प्रॉब्लेम सांगू लागला सर्वांना त्या सायकलवरच्या रिपेअर मन ला बघून थोडा धीर आला होता. त्याने गाडीचं बोनेट उघडलं आणि त्याच्याकडच्या टूल्स ने तो काही पार्ट खोलू लागला कंडक्टर ने बॅटरी पकडली होती आणि सर्व जण आशेने सर्व बघत होते. रिपेअर मन गाडी च्या खाली झोपून खाटखुट करत होता तेवढ्यात कंडक्टर ने विषय काढायचा म्हणून बोलला अहो आमच्या गाडीत एक येडी शिरलीय ती काही केल्या खाली उतरत नाहीय. गावातलाच असावी कोणीतरी. नाय का? तो हे ऐकून रिपेअर मन गाडी खालून थोडा बाहेर आला आणि त्याने विचारलं काळी साडी हाय का तिची? कंडक्टर ने नेहमीप्रमाणे मान हलवून होकार दिला. नंतर म्हणाला तुम्हाला कस माहित हो? रिपेअर मन थोडा अजून बाहेर आला आणि विचारलं ति च्या कपाळावर काळ्या रंगाची मोठी चंद्रकोर हाय काय? कंडक्टर ने होकार द्यायच्या आतच क्षणाचाही विलंब न करता तो...