Posts

Showing posts from December 16, 2017

बाजार

काल रात्री तू ओरबाडलं होतंस मला असेल तुझ्या नखात अजून माझं मांस सिगारेट चे चटके देत देत तोंड दाबलं होत होता तुला माझ्या ओरडण्याचाहि त्रास  दाताचे ठसे माझ्या छातीवर आणि गळ्यावर शरीर माझं खराब करतोय तीच माझी अर्धी भाकर माझ्या शरीरावर तुझी भूक भागवतोयस मी पण माणूस आहे माझी पण असू दे कदर 

वन पीस ..

वन पीस .. (नवरा दारातून आत येत चप्पल काढता काढता लाडात येऊन बायकोला एकदम प्रेमात बोलतो) नवरा : आग ए ऐकलस का ? तुझ्या साठी एक गम्मत आणलीय           तुला लय आवडलं बघ लयी झाक हाय. (बायको झाडू मारत मारत नवऱ्याला उत्तर देते ) बायको : म्हंजी आस आणलंय तरी काय म्हणायचं नवरा : थांब हा जरा वाईच दम धर लगिचच आलो   (नवरा लगबगीने आतल्या खोलीत जातो आणि बाहेर येऊन) नवरा : म्या का न्हाय तुझ्यासाठी गम्माडी जम्मड आणलीय  तू तर बघून पार येडीच होशील बघ आन नाय झालीस तर नाव नाय आपलं... त्याच बोलणं कापत ती झाडू मारायचा थांबवून त्याच्याकडं वळून म्हणते बायको : आता ग बाय आज दिस कुणीकड उजाडला म्हणायचं. (डोक्यावर हात ठेवत) आता माझ्या समद ध्यानात येतंय              ठरलं असलं मित्रांच्या संगट ढोसायचा प्रोग्राम.              आन मित्रांच्या संगत प्याचा पोरोग्राम केल्यामुळं जर मस्का लावत असाल तर गाठ माझ्याशी हाय सांगून ठिवते. झाडू दिसतोय का हातात? नवरा : आग ए का उगा वचा वचा कराया लागलीसा इकडं मी ...