हडळ (भाग ४) शेवट...

ती उतरली चंद्र प्रकाशात आली. ती हळू हळू पावलं टाकत सर्वांजवळ जाऊ लागली. सर्व जण पाठी सरकत होते. तिच्या तोंडावर हास्य होत. तिने तिचे दोन्ही हात सरळ रेषेत आडवे केले जणू ती सर्वना आलिंगन देण्यासाठी येत आहे. ती जवळ आली तिने एक हात मागे ठेवून मोठ्या बोटाने गाडीकडे इशारा केला ती सर्वांना गाडीत येण्यास खुणवत होती. इथे सर्वांचा थरकाप उडाला होता. ती अजून जवळ येऊन तिच्या मागे असणारा हात बाहेर काढून आता दोन्ही हाताने आत जाण्यास खुणावू लागली. आता मात्र ऐकणं सर्वांना भाग होत कारण तिच्या दुसऱ्या हातात मोठा सुरा होता त्याला बऱ्यापैकी रक्त लागलं होत. सर्व जण एकत्रच दबकत दबकत गाडीच्या दिशेने जाऊ लागले ती तशीच उभी तिच पूर्ण लक्ष नव्या नवरी कडे होत जस ते जोडपं जवळ आलं तास तीच मोठं असणार वाकड बोट तिच्या दिशेने पुढे आलं. त्याने ते झिडकारलं. तिला खूप राग आला तिने त्याच्याकडे रागाने बघितलं परत हसत तिने आत जाण्याचा इशारा केला. कसे बसे सर्वजण गाडीत शिरले सर्वांनी पाहिलं कि आत मध्ये मागे तो आडदांड माणूस शांत बसला आहे. दुसऱ्या सीट वर जोडपं आणि त्याच्या मागचये सीट वर ड्राइव्हर, कंडक्टर आणि बाकी दोघे बसल...