Posts

Showing posts with the label bridge of love

प्रेमाचा पूल

Image
एका अंधारतल्या खोलीत एक ८० वर्षाची म्हातारी अंथरुणावर तिच्या शेवटच्या घटका मोजत होती. तिचा मुलगा अमेरिकेत त्याच्या कुटुंबासोबत राहत असल्यामुळे त्याला फारसं त्याच्या आईकडे लक्ष द्यायला मिळत नसे. पण त्याने त्याच्या आईच्या देखभालीसाठी एका कामवाल्या बाईची व्यवस्था मात्र करून ठेवलेली. कामवालीनेही काम करायचे पैसे घेत असल्यामुळे ती फक्त कामच करून निघून जायची तिच्याकडे म्हातारीशी बोलण्यासाठी वेळ नव्हता आणि म्हातारीनेही गेल्या एकदोन वर्षात महिन्यातून एकदा येणाऱ्या फोनवरून मुलाच्या आवाजाव्यतिरिक्त कोणाचाही आवाज ऐकला नव्हता.      नेहमी प्रमाणे आजही कामवाली बाई काम आटपून निघून गेली होती. म्हातारीने हि तीच लक्ष बंद खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या प्रकाशाच्या कवडस्या कड एकाग्र केलं होत. तिचा आता संपूर्ण दिवस त्या बंद खिडकीकडे बघत जाणार होता हे तिलाही चांगलच माहित होत. आजसुद्धा ती खिडकी बाहेरील जिवंत जगाचा अंदाज लावण्यात मग्न होती. अचानक तिला खिडकीबाहेरील पक्षांचा सुंदर आवाज आला तीच लक्ष विचलित झालं. तिला तो आवाज ओळखीचा वाटला आणि तिला तो आवाज खिडकीजवळ जाऊन ऐकायची इच्छा झाली. तिल...