प्रेमाचा पूल





एका अंधारतल्या खोलीत एक ८० वर्षाची म्हातारी अंथरुणावर तिच्या शेवटच्या घटका मोजत होती.
तिचा मुलगा अमेरिकेत त्याच्या कुटुंबासोबत राहत असल्यामुळे त्याला फारसं त्याच्या आईकडे लक्ष द्यायला मिळत नसे. पण त्याने त्याच्या आईच्या देखभालीसाठी एका कामवाल्या बाईची व्यवस्था मात्र करून ठेवलेली. कामवालीनेही काम करायचे पैसे घेत असल्यामुळे ती फक्त कामच करून निघून जायची तिच्याकडे म्हातारीशी बोलण्यासाठी वेळ नव्हता आणि म्हातारीनेही गेल्या एकदोन वर्षात महिन्यातून एकदा येणाऱ्या फोनवरून मुलाच्या आवाजाव्यतिरिक्त कोणाचाही आवाज ऐकला नव्हता.

     नेहमी प्रमाणे आजही कामवाली बाई काम आटपून निघून गेली होती. म्हातारीने हि तीच लक्ष बंद खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या प्रकाशाच्या कवडस्या कड एकाग्र केलं होत. तिचा आता संपूर्ण दिवस त्या बंद खिडकीकडे बघत जाणार होता हे तिलाही चांगलच माहित होत. आजसुद्धा ती खिडकी बाहेरील जिवंत जगाचा अंदाज लावण्यात मग्न होती. अचानक तिला खिडकीबाहेरील पक्षांचा सुंदर आवाज आला तीच लक्ष विचलित झालं. तिला तो आवाज ओळखीचा वाटला आणि तिला तो आवाज खिडकीजवळ जाऊन ऐकायची इच्छा झाली. तिला त्या पक्षांना बघण्याचा मोह झाला. आणि तिची इच्छा इतकी प्रबळ होती कि तिने चक्क बिछान्यातून उठण्याचा प्रयत्न केला आणि चमत्कार घडला... त्यावर तिचाही विश्वास बसत नव्हता. ती अंथरुणात उठून बसली होती. ना कसल्या वेदना ना कसल दुःख. तिचे हात खिडकीच्या दिशेने जाणार तोच तीच लक्ष समोरच्या कपाटावरील आरश्याकडे गेलं आणि आता मात्र तिला धक्काच बसला. तीने स्वतःला आरशात एखाद्या २० - २२ वर्ष्याच्या तरुणीला पाहिलं आणि ती तीच होती, ती म्हातारी पुन्हा तारुण्यात गेली होती. तिला विश्वास बसेना. ती झटकन उठून आरश्याकडे धावली. ती स्वतःला निरखून बघू लागली. ती स्वतःला पुन्हा पुन्हा चिमटे काढू लागली. कारण तिच्या समोर आज जे घडत होत त्यावर विश्वास ठेवायचा नसून हि ठेवावासा वाटत होता. तिने सवतःशीच ठरवलं जाऊ दे स्वप्न तर स्वप्न पण देवा असं असेल तर आता जाग नको..

    तिने तिचे लांब सडक केस सोडले. तिच्या तोंडात तिच्या आवडीचं गाणं गुणगुणू लागलं. तिला तिचे केस खूप आवडायचे. तिला आठवलं तिची आवडती फनी हि कपाटामध्ये आहे ती फनी ती कोणालाही द्यायची नाही. तिने कपाट उघडल आणि ती फनी शोधू लागली तितक्यात वरच्या कप्प्यात हात घातला असता. तिच्या हाताला काहीतरी लागलं तिने हात बाहेर काढला आणि खूप साऱ्या पत्रांचा गठ्ठा खाली पडला तिने काय आहे म्हणून त्यातल एक पत्र हातात घेतल.

त्यातला मजकूर वाचून तिच्या डोळ्यात चमक आली.

त्यात त्याने तिला लिहिलं होत -

प्रिय कविता,

सॉरी हा तुला प्रिय म्हणतोय पण खरंच तू मला सर्वात जास्त प्रिय आहेस. मला तू ३ वर्ष पासून आवडतेस पण मी कधी तुला विचारायचं धाडस नाही केलं. पण आज खूप धाडसाने हे पत्र लिहितोय. जर का तुझा मला होकार असेल तर मला आपल्या जुन्या शाळेजवळच्या पुलावर भेटशील का मी सकाळी ९ वाजता तिथेच उभा राहीन मला माहिते तू त्याच रस्त्याने जाते. मी त्याच पुलावर उभा राहून तुला रोज बघत असतो पण तुझं माझ्याकडे लक्ष नसतंच कधी. मी आज तुझी खूप वाट बघेन मला माहितेय तू येशील.

-अमित

तिने ते पत्र वाचलं तीच लक्ष घडाळ्याकडे गेलं तीने पाहिलं घडल्यात ११ वाजले होते. ती दरवाज्याकडे धावू लागली तिला त्या पुलावर पोहचायचं होत तिला माहिती होत तो तिथे उभा आहे. आणि तो तिला भेटल्याशिवाय जाणार नाही. ती दरवाज्याची कडी उघडणार तोच तिच्या पायाखाली दुसरी चिट्ठी आली. तिने ती उचलली

त्यात त्याने तिला लिहिलं होत -

प्रिय कविता,

तू आलीस मला लांबून दिसली मला नव्हतं माहित माझी चिट्ठी तुझ्या घरी सापडेल आणि तुझा काका तुझ्या मागे येईल. असो तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध झालं ना बस्स.. त्या दिवशी तुझ्या काकांनी तुला खेचत घरी नेलं मला तुझी खूप काळजी लागलेली. तुझा काका त्यादिवशी आमच्या सुद्धा घरी आला होता मला माझ्या वडिलांदेखत मारून टाकेन अशी धमकी देऊन गेला. मी अजिबात घाबरलो नाही आणि नाही घाबरलो हे बघून बाबांनी मला  कानसुलात लागवल्या त्या पण दोन पण तू मला भेटायला आलेलीस ह्या खुशीने मी त्या कानसुलात प्रेमाने गोड मानून घेतल्या. काळजी घे आपण पुन्हा भेटू लवकरच मी तुला घेऊन  जाईन काळजी घे...

तुझा अमित...

तिने जे वाचलं त्याने तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता तिची पावल त्या चिठ्यांच्या ढिगाऱ्याकडे गेलं. तिला कळून चुकलेलं कि एव्हाना त्या प्रेमाच्या पुलाखालून किती तरी पाणी वाहून गेलेलं. आता बस्स तिला त्या पुलापर्यंत पोहोचण्यासाठी चिट्ठी मदत करेल हीच आशा होती. ती आता त्यातून फक्त त्याने पाठवलेल्या चिठ्या शोधू लागली. कारण पहिल्या दोन चिठ्यांचा रंग गुलाबी होता म्हणजे अमित च्या चिठ्या गुलाबी रंगाच्या आहेत हि गोष्ट तिच्या लक्षात आलेली. तिला पुन्हा एक गुलाबी चिट्ठी सापडली. ती अधाश्यासारखी ती चिट्ठी खोलू लागली...

त्यात त्याने तिला लिहिलं होत -

प्रिय कविता,

मला समजल तुझं लग्न ठरलंय. माझं पण पुण्यातल्या एका मोठ्या महाविद्यालयांत ऍडमिशन झालय. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम होत. पण मी माझ्या पायावर अजून तरी उभा नसल्यामुळं तुझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी काहीही करू शकत नाहीय मी आपल्या त्याच पुलावर आता तासन तास बसून असतो किती गप्पा मारल्या किती भांडलो किती वाट पाहायचो त्यावर. सर्व कसं क्षणात विरून गेलं नाही. आता तर मी सुद्धा निघून जाईन. आणि तू सुद्धा. पण मी तुला पत्र मात्र पाठवत राहीन. तुझा नवरा चांगला दिसतो पाहिलंय मी त्याला आणि मोठ्या ठिकाणी काम करतो ऐकलंय मी सुखात ठेवेल तुला. कधी कधी घातल्याचे निर्णय पण बरोबरच असतील मी अजून शिकतोयच काही करू शकेन तुझ्यासाठी पुढे देवास ठाऊक पण यामुळे माझा तर देवावरचा विश्वास उडालाय.

असो तू जास्त रडू नकोस हसताना छान दिसतेस.

तुझा आता असेंन  कि नाही माहित नाही पण मित्र म्हणून तरी राहू शकतो

- अमित

ती अजून चिठ्या शोधू लागली. तितक्यात खिडकी बाहेर माणसांचा आवाज येतोय आणि खूप गर्दी झालीय अस तिला जाणवलं. ती खिडकी जवळ गेली खिडकी खोलून पाहिलं तर खूप माणसं जमली होती काहीतरी कार्यक्रम पार पाडत होती. तिने खिडकी पुन्हा लावून घेतली आणि पुन्हा चिठ्यांकडे लक्ष दिल तिला पुढे काय झालं हेच बघायचं होत.

तिने खूप शोधून तिला एक चिट्ठी मिळाली कदाचित ती शेवटची असावी.

त्यात त्याने तिला लिहिलं होत -

प्रिय कविता,

खूप महिन्यांनी चिट्ठी लिहितोय. क्षमा असावी मी पण कामाच्या रगाड्यात इतका अडकलोय कि स्वतःसाठी वेळ देऊच शकत नाहीय. आज खूप वेळ काढून तुझ्या साठी लिहायला बसलोय. आपण आप आपल्या आयुष्यात किती पुढे निघून आलोत ना हे आता कळतंय. पण आपण अजून हि आपल्या नात्यामधल्या त्याच पुलावर थांबलोय असच सारखं वाटत राहत.

तितक्यात दरवाज्यावर च्या थापेच्या आवाजाने तीच लक्ष वेधलं. ती उठली दरवाजा खोलून तिने पाहिलं बाहेर अमित उभा होता तिचा तो समोर उभा आहे ह्यावर विश्वास बसेना ती खूप खुश झाली तिने त्याला जोरात मिठी मारली. तिला थोडासा अगरबत्तीचा सुगंध येऊ लागला. तिने मिठीमध्ये असताना त्याला विचारलं. कुठल्या देवळात गेलेलास का. तू हसला तिला त्याने घट्ट पकडलं आणि तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला ''पटकन तयारी कर मी आपल्या पुलावर जाऊन थांबतो तू लवकर तिथे पोहोच ती  खुश झाली ती  मिठी तुन बाहेर पडली आणि अचानक तिला खूप गरम होऊ लागले तिच्या अंगातून वाफ येतेय असा तिला जाणवू लागलं . आता तिला तिच्या  आजूबाजूला खिडकीतून पाहिलेली पांढऱ्या कपड्यातला माणसांचा गोंधळ दिसू लागला होता. तिची नजर अमितला शोधू लागली. तिला आता सर्व अंधुक होत गेलं. तिला पुन्हा ओढ होती त्या पुलावर जाण्याची तिला माहित होत तो सर्व सोडून आलाय आणि त्याच पुलावर तिची वाट पाहतोय.

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)