Posts

Showing posts from October 20, 2017

बघ ना ग आई

Image

माणूस झालाय दगडं...

Image
दगडं... माणूस झाला दगड, दगड झाला देव. माणुसकी आता जरा बाजूलाच ठेव पडतोय त्याला पडू दे मरतोय त्याला मरू दे वाचवण्याचं सोंग घेऊन कोणी दागिनेच चोरू दे लोकल च्या टायमिंग वर लक्ष तू ठेवं पण माणुसकी आता जरा बाजूलाच ठेव बघणार्यांना मरण आता मोबाईल मध्ये टिपू दे सोशल मीडिया वर थोडं त्यांना सोशल वर्क करू दे लाईक शेअर करून कमेंट मात्र तू टाकून ठेव सोड ना गरबा खेळ जाऊन माणुसकी जरा बाजूलाच ठेव नवस किती केले होते रंग नऊ वेगळे होते शेवटचाच रंग का नाही भावला राक्षस त्या दिवशी असा का धावला चिरडल गेलं क्षणात सर्व म्हणून प्रशासनाला तू मुस्काडीत ठेव अरेरे दसऱ्याची खरेदी राहूनच गेली आता तरी माणुसकी बाजूलाच ठेव गर्दी मधल्या अफवांना उधाण आता येऊ दे धडकी भरून कोणाला तरी कोलमडून पडू दे अफवेच्या धुराळा हवेत उडवून ठेव तीच बातमी बघायला मात्र टीव्ही तू लावून ठेव टीव्हीवर जाहिरात येताच चहा भजी ऑर्डर कर माणुसकी काय असते तिला जरा बाजूलाच ठेव पाच लाख देण्यापेक्षा एक लक्ष माणसांकडं दे त्याच वोट घेऊन झालं आता त्याच्या आयुष्याचाच घोट घे सर्व काही कळून सुद्धा कसायाच्या हातात मान तू ठेव आता ...

मिसु

Image
मिसु ------------------------------------------------------------------------------------- सकाळी १० वाजता फोन ची रिंग झाली अवंतिका टीव्ही वर योगा पाहून स्वतः घरात प्रात्यक्षिक करत होती. तो फोन तिला डिस्टर्ब करत होता अखेर तिने फोन उचलला जो रिया च्या शाळेतून होता. रिया च्या टीचर ने सांगितलं कि मॅम आज स्कुल बस नाही येऊ शकतंय तर कृपया तुम्ही रिया ला शाळेतून पीक अप कराल का रागाच्या स्वरात अवंतिकानेही उत्तर दिल ''का काय झालं आज मला खूप काम आहेत तुम्ही असे कसे गहाळ राहू शकता आधी सांगता येत नाही का? त्यावर टीचर खालच्या स्वरात सॉरी मॅम पण आज स्कूल बस मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे आंम्हाला पेरेंट्स ना पर्सनली कॉल करून सांगाव लागतं आहे. यावर अवंतिका ''ठीकंय पण पुन्हा असं चालणार नाही मी आज माझी सर्व महत्वाची काम टाकून येतेय '' असं बोलून फोन रिसिव्हर वर आपटते. थोड्या वेळाने आटपून ती ड्राइवर ला गाडी काढायला सांगते. त्याच दरम्यान तीच मैत्रिणीशी बोलणी चालू असतात अवंतिकाच लक्ष स्कूल बाहेरील एका गोळे वाल्याकडे जात तिच्या मनात एक विचार येऊन जातो शी किती गलिछ आहे हा गोळा...

परी ...

Image
परी ... एक होती परी, दिसायला होती बरी उडत नसली तरी, धावायची खरी. लोकलची वेळ, हा तर रोजचाच खेळ लोकलमध्ये होतो पर्यांचा मेळ लेटमार्क नको म्हणून असते ती घाईत ट्रेनचा पास संपला तिला नसतं माहीत पर्यांच्या राज्यात असते खूप काम रात्री घरी पोहचल्यावर डोक्याला असतो बाम मुलांचा अभ्यास घेताना होते तिची दमछाक भागाकार, गुणाकार आणि हातचा एक देऊन टाक कुकरची शिटी आणि घडाळ्यावर तीच लक्ष डाळ सुद्धा फोडणी साठी झाली होती सज्ज खरंच तिच्याकडे असती एखादी जादूची छडी नसती करावी लागली तिला एवढी मेहनत कधी आरश्यात बघायलाहि वेळ नसतो परीला कपाटातून कपडे काढले असतात तिने इस्त्रीला बिछान्यावर पडताच लागतो तिचा डोळा अलार्म सुद्धा झोपायला वेळ देतो थोडा कारण उद्या पुन्हा असणार रोजचाच खेळ आता स्वप्नांमध्ये जायला नाही परीला वेळ ---------------------------------------- राजन गायकवाड