मिसु


मिसु
-------------------------------------------------------------------------------------
सकाळी १० वाजता फोन ची रिंग झाली अवंतिका टीव्ही वर योगा पाहून स्वतः घरात प्रात्यक्षिक करत होती. तो फोन तिला डिस्टर्ब करत होता अखेर तिने फोन उचलला जो रिया च्या शाळेतून होता. रिया च्या टीचर ने सांगितलं कि मॅम आज स्कुल बस नाही येऊ शकतंय तर कृपया तुम्ही रिया ला शाळेतून पीक अप कराल का रागाच्या स्वरात अवंतिकानेही उत्तर दिल ''का काय झालं आज मला खूप काम आहेत तुम्ही असे कसे गहाळ राहू शकता आधी सांगता येत नाही का?
त्यावर टीचर खालच्या स्वरात सॉरी मॅम पण आज स्कूल बस मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे आंम्हाला पेरेंट्स ना पर्सनली कॉल करून सांगाव लागतं आहे.
यावर अवंतिका ''ठीकंय पण पुन्हा असं चालणार नाही मी आज माझी सर्व महत्वाची काम टाकून येतेय '' असं बोलून फोन रिसिव्हर वर आपटते.
थोड्या वेळाने आटपून ती ड्राइवर ला गाडी काढायला सांगते. त्याच दरम्यान तीच मैत्रिणीशी बोलणी चालू असतात अवंतिकाच लक्ष स्कूल बाहेरील एका गोळे वाल्याकडे जात तिच्या मनात एक विचार येऊन जातो शी किती गलिछ आहे हा गोळा देणारा आणि हि लहान मुलं तो गोळा आवडीने का खातायत ती विचार करते कि याविषयी स्कूल प्रिंसिपल शी बोलावच लागेल आणि त्या गोळेवाल्याचा बंदोबस्त करावाच लागेल. ती तिच्या गाडी मधून उतरून थेट प्रिंसिपल च्या केबिन कडे चालत सुटते तेवढ्यात मिस तिच्या पुढं येवन तिच्या हातात रिया ला देतात अवंतिका टीचर ला म्हणते 'मला प्रिंसिपल ला भेटायचं आहे' टीचर थोडी घाबरते आणि बोलते ''जाऊ द्या ना मॅम परत अस नाही होणार आम्ही सर्व नीट मॅनेज करू अस कधी झालं तर आणि तसंहि प्रिंसिपल आज लवकर गेलेत'' प्लिज तुम्ही सोमवारी त्यांना भेटलात तर बर होईल. आता प्रिंसिपल नाहीयत तर काहीही थांबण्यात अर्थ नाहीय असा स्वतःशीच पुटपुटत अवंतिका रिया ला घेऊन कार कडे येते मुलीला बघून अवंतिकाचा राग ती विसरून गेलेली असते ती आता रिया ला अभ्यास विषयी प्रश्न विचारत गाडीत बसते. गाडी घराच्या दिशेने धावू लागते आणि गाडी मध्ये रिया तिच्या स्कूल मधल्या गप्पा चालू करते ''मम्मी आज ना मिसु ने मला विमान बनवायला शिकवलं.. आणि आम्ही एकत्र डब्बा पण खाल्ला त्याला कि नाही तू दिलेला पास्ता खूप आवडला. त्यावर अवन्तिका रिया कडे हसत बघत म्हणाली ''अग तो मिसु तोच ना तुझा नवीन मित्र''
हो ग मम्मी. छान छान असं म्हणत अवंतिका म्हणत अवंतिका ''घरी पोचल्यावर फ्रेश होऊन थोडी झोप काढ आता कार्टून नको बघत बसू''असं रियाला सुचवते. अवंतिकाला पुन्हा मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती पुन्हा गप्पामध्ये रंगून जाते.
घरी पोचल्यावर रिया बॅग हॉल मध्येच सोफ्यावर टाकून टीव्ही लावायला धावते. अवंतिका टिलॉर्डनर तोच पुन्हा मैत्रिणीचा कॉल येतो आणि अवंतिका फोन वर बोलत रियाची बॅग हातात घेऊन ठेवायला जाणार तोच बॅग च्या साईड च्या कप्प्यामधून दोन चॉकलेट पडतात तिला आश्चर्य वाटत ती पटकन मैत्रिणीचा कॉल थांबवते आणि तशीच रिया कडे जाते रिया टीव्ही वर कार्टून बघण्यात मग्न ना तिने तिचे कपडे बदललेले असतात ना हात पाय धुतलेले असतात अवन्तिकाच संताप अनावर होतो खूप मोठ्या आवाजात ती तिला विचारते ''रिया आताचा आता तो टीव्ही बंद कर. रियाच्या न ऐकण्यामुळे अवंतिका स्वतः जाऊन तो बंद करते आणि ती रिया वर प्रश्नाचा भडीमार करते ''मी तुला काय सांगितलेलं गाडीमध्ये तुला फ्रेश होऊन झोपायला सांगितलेलं ना आणि कोणी दिले हि चॉकलेट तुला? मी काय विचारतेय सांग भर भर सांग नाहीतर आज बाबांना संध्याकाळी तुझं नाव सांगेन. त्यावर रिया तिला सांगायला लागते '' अग मम्मी मला ना हे चॉकलेट मिसु च्या मम्मी ने दिलीयत आणि ती मला नेहमी देत असते त्यात काय एवढं ती मिसूला पण देते मला पण देते. तू अशी कशी ग? सारखं हे करू नको ते करू नको. त्यावर अवंतिका शांत होऊन तिला बोलते ठीकाय पण बाळा आपण परवाच डेंटिस्ट कडे गेलो होतो ना आणि आपल्याला डॉक्टर बोलले पण आहेत कि चॉकलेट गोळ्या एकदम बंद विसरलीस काय आता इथून पुढे नाही घ्यायची हा बाळा जा आता अभ्यास कर किव्हा झोप बेडरूम मध्ये जाऊन जा.
रिया मन हलवते आणि तिला काहीतरी आठवत आणि ती बेडरूम मध्ये धावत जाते. मग अवंतिका नवऱ्याला कॉल करते आणि बोलत बोलत बाल्कनी मध्ये उभी राहते. तेवढ्यात तिला खाली एक बोहारिन दिसते अवंतिका त्या बाई ला हाक मारून वर येण्याचा इशारा देते. ती बाई वर येऊन दाराची बेल वाजवते अवंतिका नवर्यासला नंतर फोन करते सांगून फोन बंद करत दरवाजा खोलते एक काळी केस विस्कटलेली हातात कपड्याचा गाठोडं आणि दुसऱ्या हातात प्लास्टिक ची भांडी अवंतिका विचारते माझ्याकडे खूप जुने कपडे आहेत इथेच थांब तुला आणून देते. अवंतिका बेडरूम मध्ये जाऊन कपाटामधली काही जुन्या साड्या काही शर्ट आणि रिया चे फ्रॉक्स असे काढून बेड च्या दिशेने भिरकावत असते रिया बेडरूम मध्ये विमान उडवत असते अवंतिका तिला म्हणते बाळा आता हे काय नवीन टीचर ने शिकवलं का ? रिया म्हणते नाही मम्मी मला हे सुद्धा मिसु ने शिकवलं अवन्तिकाच्या तोंडावर मोठा प्रश्न चिन्ह असतो. ती विचार करते पहिल्यांदा हे कपडे देऊया मग हिला विचारूया नेमका कोण आहे मिसु. अवंतिका कपडे शोधण्यात मग्न असताना रिया विमान उडवत बाहेर जाते. आणि दरवाज्यात त्या बाईशी बोलतेय असा अवंतिकाच्या लक्षात येत. अवंतिका थोडी घाबरते कारण हल्ली किडनॅपिंग चे प्रकार जास्त घडत असल्यामुळे ती जेमतेम कपडे उचलते आणि घाईत बाहेर हॉल मध्ये यऊन तीच दरवाज्यात लक्ष जात तेव्हा तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. ती जोरात ओरडते ''रिया काय करतेयस'' रिया त्या बोहारणीच्या मांडीवर बसलेली असते आणि ती बोहारिन तिचे पापे घेत असते आणि रियाच्या केस वरून हात फिरवत असते.
अवंतिका धावत बाहेर येते आणि रियाला तिच्या मांडीवरून खेचते. ती बोहारिन मोठ्याने बोलते ''आव असा नका करू लहान लेकरू हाय ते! त्येला काय कळतंय. अवंतिका तिलाच ओरडून बोलते ''तिला नाही कळत तर तुला तरी कळतंय ना.'' तू तिला जवळ का घेतलास मी थांब आता पोलिसांना फोन करते तुम्ही अशी फूस लावून ना मुलाना किडनॅप करता आणि अवंतिका वॉचमॅन ला हाक मारू लागते तोवर रिया ओरडून बोलते अग मम्मी ती मिसु ची आई आहे असं का करतेयस. अवंतिकाला थोडा वेळ काही काळत नाही ती स्तब्ध होऊन तिच्याकडे आणि रियाकडे बघत राहते. अवंतिका हातातले कपडे त्या बोहारणीच्या अंगावर फेकते आणि बोलते ''चल चालती हो इथून' माझ्या मुलीच्या आसपास पण नको दिसूस. ती बिचारी मिसु ची आई हटले कपडे तिथेच ठेवून निघून जाते. अवंतिका जोरात दार आपटते आणि रिया ला घट्ट पकडून खेचत सोफ्यावर नेवून बसवते. तिला विचारते हीच मुलगा मिसु का? आणि तू झाला आठवडा भर त्याच्या विषयी आणि त्याच्या घरच्यांविषयी बोलतेयस तरी मला कळलं नाही तुझे मार्क का कमी झाले होते मागच्या महिन्यात... थांब आज बाबांना सांगून तुला बरोबरच करते. आणि आता तुझं स्कूल सुद्धा चेन्ज करावं लागणार बहुतेक. रिया ओरडून बेडरूम मध्ये झोपायला पाठवते. थोडा वेळ शांत बसून घडला प्रकार मैत्रिणीला फोने वर सांगू लागते मग नातेवाईक मग नवरा मग आई सर्वांशी अशा प्रकारे सांगते जणू तिच्या वर खूप मोठा अत्याचार झालाय. सर्व जण आप आपल्या परीनं तिला उपाय सांगत असतात. पण तिला मैत्रिणीचा सल्ला जास्त उत्तम वाटतो. आणि ती निर्णय घेते.
सोमवारी सकाळी ती स्वतः रिया ला सोडायला जाते.
त्या दिवशी ती तडख प्रिंसिपल च केबिन गाठते ''मे आय कमिंग सर'' असं म्हणत ती आत घुसते प्रिंसिपल तिच्याकडे आश्चर्याने बघत राहतो. प्रिंसिपल ने बसा म्हणायच्या आधीच ती खुर्ची खेचून बसते. आणि काही विचारायचा आत अवंतिका तिचा प्रश्नाचा भडीमार चालू करते. ती विचारते अर्थातच खडसावून ''तुम्ही या एवढ्या मोठ्या शाळेत कमी जातीतल्या मुलांना ऍडमिशन देताच कसं? माझ्या मुळीच भविष्य तुम्ही धोक्यात टाकत नाहीय का? आम्ही मुलांना शाळा चांगलीय म्हणून मोठं मोठाले डोनेशन देऊन पाठवतो ना. मग हे असा का चाललंय. त्यावर प्रिंसिपल नम्र पने म्हणतो मॅम तुम्ही आधी शांत व्हा मला सांगा नक्की काय झालय. ती भानावर येऊन प्रिंसिपॉल ला घडला प्रकार सांगते आणि विचारते कोण आहे मिसु? तो माझ्या मुलीला बिघडवतोय तिचे मार्क त्याच्या मुळे कमी झाले आहेत. तुम्ही आताच्या आता त्याला शाळेतून काढून टाका. अन्यथा मी माझ्या मुळीच ऍडमिशन रद्द करते खप शाळा आहेत अजून... प्रिंसिपॉल पुन्हा तिला शांत करत बोलतो अहो हे जे तुम्ही नाव घेताय हे टोपण नाव असावं कारण असा कोणत्याही नावाने आम्ही ऍडमिशन केलेलं नाही असो पण आम्ही त्याला नक्कीच शाळेतून काढून टाकू जर का तो तुमच्या मुलीला बिघडवत असेल तर त्याने शाळा सोडणं योग्यच राहील. अवंतिका काहीशी शांत झाली. प्रिंसिपॉल तिला विचारतो थांबा आपण ना रियालाच विचारुयात कोण आहे मिसु तितक्यात रियाचे क्लास टीचर तिथे येतात. त्या रियाच्या मम्मी ला बघून बोलतात अहो सॉरी हो मॅम इथून पुढे बस वेळेवर सोडू आम्ही आम्ही असाही अजून एक बस स्कूल साठी घेण्याचं प्रयोजन करतच आहोत हो ना हो सर. प्रिंसिपॉल मन हलवत '' हो हो नक्कीच'' अवंतिका शांत पाने सांगते पण मी आज त्यासाठी आलेच नाहीय. तुम्ही जरा रियाचं रिपोर्ट कार्ड दाखवा. त्यात तिचे मार्क्स खूपच कमी झालेलं दिसतायत .. त्यावर टीचर स्पष्टीकरण देत सांगतात. अहो असा काही नाहीय हा एक महिन्या पूर्वी रिया थोडी अभ्यासात वीक होती पण तिची आम्ही जागा चेंज केल्यापासून तिचे मार्क्स उलट वाढतायत तिच्या बाजूला जो विद्यार्थी बसतो तो अत्यंत गुणी आणि अभ्यासात हुशार आहे, थांबा मी तुम्हाला तीच रिपोर्ट कार्ड दाखवते. जेव्हा अवंतिका रिपोर्ट कार्ड बघते तेव्हा तेव्हा तिला सुद्धा पटत कि या महिन्यात युनिट टेस्ट मध्ये तिला चांगले मार्क्स आणि तिच्या खूप साऱ्या पोएम्स पण पाठ झाल्यात. अवंतिका थोडी गोंधळते आणि सावरत पुन्हा तिच्या मूळ मुद्द्यावर येते अहो पण मला काय म्हणायचंय कि खालच्या जातीची मुलं सुद्धा शिकतात का या शाळेत एकतर त्यांना काढा किव्हा मग आम्ही शाळा चेन्ज करतो. कारण आम्ही यासाठी नाही ना एवढी मोठी डोनेशन देत. त्यावर टीचर म्हणतात ठीकाय आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही नक्कीच जो कोण असेल त्याला काढून टाकू किव्हा त्याची डिव्हिजन चेंज करू. त्यावर प्रिंसिपॉल म्हणतो तुम्ही निशचिन्त राहा आम्ही यावर नक्कीच काय तो तोडगा काढू. तोवर शिपाई रियाला घेऊन येतो प्रिंसिपल रियाला विचारतात बाळा हा मिसु कोण आहे. त्याच खार नाव काय सांगशील. रिया म्हणते ''आम्ही सर्व त्याला मिसूच बोलतो कारण त्याची आई त्याला त्या नावाने हाक मारते. तेवढ्यात टीचर म्हणते ''जाऊ द्या हो तिला जास्त प्रश्न नका विचारू आता तिची जागा चेंज केलीय ना तिच्या बाजूला बसणार मुलगा अत्यंत हुशार आहे. तो हिला अभ्यासात खूप मदत करतो. तिचे मार्क्स वाढण्यासाठी त्याचा सुद्धा सहभाग आहे मीच त्याला तिला अभ्य्सात मदत करायला सांगितलेली. तेवढ्यात रिया तिच्या मम्मीची ओढणी खेचू लागते. तिची मम्मी तिला पुन्हा डोळे वटारून अरे बाळा मोठी मानस बोलताना असं मध्ये नाही बोलायचं थांब आपण नंतर बोलू.. अवंतिका टीचर आणि प्रिंसिपॉल कडे बघत निरोप घेत बोलते ''ठीकाय मी येते आता पण कृपा करून हे मिसु प्रकरण लवकर मितवा खूप त्रास झालाय डोक्याला नाहीतर मला हे हिच्या बाबांच्या कानावर घालावं लागेल. प्रिंसिपॉल तिला मन हलवत ''नक्की, नक्की मॅडम असं म्हणत तोही बाहेर निघून जातो. आता अवंतिका रियाला घेऊन बाहेर येते आणि स्कुटी जवळ गेल्यावर हेल्मेट घालत रियाला बोलते हा बोल काय सांगत होतीस आत... रिया बोलू लागते अगं मम्मी तू मिसु विषयी बोलत होतीस ना तोच माझ्याबाजूला बसतो तोच मला सर्व शिकवतो खूप हुशार आहे ग तो. अवंतिका रियाकडे पाहतच राहते. अवंतिका यावर काहीच बोलत नाही तीच लक्ष वर्षाकडे जात तेव्हा तिचा चेहरा बघून तिलाच लाजल्यासारखं होत. गेले दोन दिवस तिने मिसु ला शाळेतून काढण्यासाठी खूप आटापिटा केला असतो तिला आता स्वतःचीच किंव येऊ लागली तिने रिया ला वर्गात जायला सांगितले आणि ती शांतपणे निघून गेली.
काय माहित प्रत्येक वेळी मिसु हुशारच असेल. जर का तो अभ्यासात कमी असता तर त्याला खालच्या जातीमुळे शाळा गमवावी लागली असती.
-------------------------------------------------------------------------------
राजन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)