भुताटकी कथा
पिंजरा मुंबई मध्ये जॉब लागल्यामुळे सुरेश ला गावापासून लांब राहावं लागणार होत. त्याने हा जॉब मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याने त्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून हि नोकरी मिळवली. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि एक बहीण होती वडील लहानपनीच देवाघरी गेल्यामुळे आई ने त्याचा व त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. सुरेश दिसायला सावळा असला तरी उंचपुरा आणि दिसायला चांगल व्यक्तिमत्व होत. घरचे खूप खुश होते. सुरेश ने रात्री ११ ची गाडी बस स्टॅन्ड वरून पकडली आणि त्याने मुंबईचा प्रवास चालू केला. दुसऱ्यादिवशी कामात रुजू व्हायचं असल्यामुळे त्याने गाडीतच आपली झोप पूर्ण करून घेतली आणि सकाळी ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेल वर जाऊन पोचला. त्याचे मामा मुंबई ला असल्या मुले त्याच अधून मधून येऊन जाऊन व्हायच त्यामुळे त्याला मुंबईची सर्व कल्पना होती आणि असंही त्याचा मामा चाळीतील १० बाय १० च्या रूम मध्ये त्याच्या फॅमिली सोबत राहायचा त्यामुळे सुरेश ने हॉटेल मध्ये तात्पुरती राहून नंतर लवकरच भाड्याने एखादी रूम घेऊन आई आणि बहिणीला पण तिकडे नेण्याचा निर्णय घेतला होता. ...