भुताटकी कथा
पिंजरा
मुंबई मध्ये जॉब लागल्यामुळे सुरेश ला गावापासून लांब राहावं लागणार होत. त्याने हा जॉब मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याने त्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून हि नोकरी मिळवली. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि एक बहीण होती वडील लहानपनीच देवाघरी गेल्यामुळे आई ने त्याचा व त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. सुरेश दिसायला सावळा असला तरी उंचपुरा आणि दिसायला चांगल व्यक्तिमत्व होत. घरचे खूप खुश होते.
सुरेश ने रात्री ११ ची गाडी बस स्टॅन्ड वरून पकडली आणि त्याने मुंबईचा प्रवास चालू केला. दुसऱ्यादिवशी कामात रुजू व्हायचं असल्यामुळे त्याने गाडीतच आपली झोप पूर्ण करून घेतली आणि सकाळी ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेल वर जाऊन पोचला. त्याचे मामा मुंबई ला असल्या मुले त्याच अधून मधून येऊन जाऊन व्हायच त्यामुळे त्याला मुंबईची सर्व कल्पना होती आणि असंही त्याचा मामा चाळीतील १० बाय १० च्या रूम मध्ये त्याच्या फॅमिली सोबत राहायचा त्यामुळे सुरेश ने हॉटेल मध्ये तात्पुरती राहून नंतर लवकरच भाड्याने एखादी रूम घेऊन आई आणि बहिणीला पण तिकडे नेण्याचा निर्णय घेतला होता.
सकाळी लवकर उठून त्याने ऑफिस साठी तयारी चालू केली. होते थोडं लांबच होत पण काही पर्याय नव्हता.
पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये काही काम नसल्या मुळे सुरेश लवकरच निघाला आणि जवळच घर शोधायला चालू केल पण पगाराच्या मानाने फ्लॅट च भाडं काही परवडत नव्हतं मग त्याची स्वारी चाळी कडे वळली संध्याकाळचे ६ वाजले असतील तो ऑफिस पासून जवळ असणाऱ्या जुन्या अशा पण भक्कम चाळी समोर तो थांबला त्याने चाळीतील कोपऱ्याच्या खोली बाहेर एक पाटी पहिली त्यावर तो रूम भाड्याने देण्यासाठी एक नंबर होता सुरेश ने क्षणाचाही विलंब न करता त्यावर कॉल केला. तो माणूस गावाकडे होता आणि तो रूम भाड्याने देण्यास लगेच तयार झाला. त्याने फोन वर सांगितले कि नातेवाईक तुम्हाला उद्या चावी देतील. सुरेश ला ती रूम खूप कमी भाड्याने मिळाली होती. आज सुरेश खूप खुश होता त्याने दुसरायच दिवशी रूम कडे आपलं सामान हलवायला घेतलं हे सर्व काम तो ऑफिस सुटल्यानंतर करत होता. सामान घेऊन रूम पर्यन्त जाईपर्यंत त्याला रात्रीचे ७ वाजले. कश्याबश्या बॅगा सावरत तो चाळीच्या पायऱ्या चढत होता आणि चालीमधील सर्व लोक त्याच्या कडे कोणीतरी आतंकवादी भारतात प्रवेश करावा अशा नजरेने बघत होते कोपर्यावरची रूम घेतली याचा त्याला थोड्या वेळासाठी आनंदच झाला. त्याची रूम हि खूप लांब होती आणि तिच्या आसपासचे चार खोल्यांचे दरवाजे बंद होते म्हणजे त्यांना टाळाच होता.
त्याने रूम खोलली त्यातून खूप उग्र वास येऊ लागला रूम खोलताच बाकीच्यांचे दरवाजे बंद झाल्याचा आवाज झाला असा सुरेशला जाणवलं. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रित केलं त्याने रूमची साफसफाई केली आणि सर्व आवरा आवर करेपर्यंत त्याला रात्रीचे १० वाजले त्याला आता खूप भूक लागलेली त्याने पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी फोन हातात घेतला नेटवर्क नसल्यामुळे ते हि शक्य नव्हता मग त्याने टाळा लावून बाहेरून काहीतरी खाऊन आला खूप दमल्यामुळे त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. जेव्हा त्याला सकाळी जाग आली तेव्हा त्याच डोकं खूप दुखत होत.
सुरेश ने रूम घेतल्यापासून त्याचे दिवस खूपच बोअरिंग चालले होते त्याने शनिवारी सुट्टी असल्यामुळे त्याच्या गावच्या मित्राला त्याच्या घरी बोलवले होते.
लहानपणीच मित्र शश्या येणार म्हणून सुरेश खूप खुश होता आज खूप धमाल करायची असा त्याने ठेवलेलं.
शनिवारी सकाळीच त्याचा मित्र गावावरून आला होता त्या दोघांनी दिवस भर खूप गप्पा मारल्या रात्र झाली सुरेश ने बॅग मधला व्हिस्कीची त्याला विचारले
''शश्या बसायचं का आता'' त्यावर शश्या म्हणाला '' अरे चकणा ?'' आणि सुरेश किचन मध्ये फरसाण आणायला गेला. त्याने पहिले तर अगोदरच किचन वर
दारू साठी दोन ग्लास आणि एका डिश मध्ये फरसाण होत सुरेश थोडा गडबडला पण नंतर त्याला वाटलं कि कदाचित मीच हे काढून ठेवला असावं.
सुरेश आणि शशी दोघांनी पेग वर पेग चढवले गप्पन हि खूप चेव आलेला, आता गप्पा पहिल्या प्रेमावरून कधीच पुढे सरकल्या होत्या आता रोमंचाक आणि थर्रार चारच्या चालू झालेल्या शश्या त्याच्या शेजारच्या मुली विषयी सांगत होता '' अरे तुला माहिताय काय ती आपली हि रे' सुरेश सुद्धा आतुरतेने विचारात होता ''कोण कोण रे'' शश्या सांगू लागला अरे ती काळ्यांची मंजू'' तिला अरे एक मुलगा आवडायचा त्याने तिचा फायदा घेतला ना तिने ती विहीर माहितेय का रानातली सुरेश बोलला हो हो माहितेय शश्या सांगू लागला तिकडे जीव दिला ना तिसऱ्या दिवशी फुगून बाहेर तरंगत होती ना ... आणि एकाच महिन्यात तो फसवणारा पण गेला ना ढगात'' सर्व बोलतात तिने सूड घेतला.. सुरेश थोडा गंभीर झाला होता त्याने विचारला पण तिनेच मारलं कशावरून ! त्यावर शशी बोलला सिगारेट काढ बाहेर फुकत सांगतो तो कदाचित घाबरला असावा म्हणून सुरेश ने पण जास्त री नाही ओढली दोघेही बाहेर कॉमन बाल्कनी मध्ये उभे राहून लागले त्या दिवशी बाहेर गॅल्लरी मध्ये सर्व दिवे बंद होते. बहुधा सर्व जण झोपले असावेत. मग सुरेश आणि शशी दोघे रूम मध्ये गेले रात्रीचे २ वाजले असतील शशी अचानक सुरेश ला उठवू लागला आणि सुरेश ला गाढ झोप लागली होती शशी त्याला सारखा सांगत होता अरे घरात कोण तरी आहे असा भास होतोय माझ्या कानात कोण तरी कुजबुजताय सुरेश ओरडून त्याला बोलला झोप रे बाबा आता सॅम्पलप्या स्टोर्या आता आणि तुला जे आवाज येतायत ना ते बाजूच्या खोलीतून येत असतील मला रोज येतात काही नसतं झोप आता आणि सुरेश डोक्यावर उशी घेऊन झोपला इकडे शशी हनुमान चालीसा पुटपुटायला चालू केलं होत त्याची दारू पूर्ण उतरली असावी. त्याने डोळे घट्ट मिटले पण त्याला सारखा भास होत हित कि इकडे अजून कोण तरी तिसरं आहे. आता तर त्याला ती किचन मध्ये भांड्याचा आवाज करताना स्पष्ट जाणवू लागला शशी ने पण त्याच्या मंत्रांचा आवाज वाढवला आणि घड्याळाकडे पाहत राहिला एकदाचे ६ वाजले त्याने सुरेश ला हलवून उठवले आणि निघतो असा सांगू लागला कसा बस सुरेश ने त्याला थांबवून घेतल.
सकाळचे ७ वाजले असतील बऱ्यापैकी उजेड घरात येत होता आणि शशी ला डोळा लागला होता सुरेश ने विचार केला खाली जाऊन काहीतरी खाण्यासाठी आणि वाचायला पेपर घेऊन येऊया त्याने उठून घरातून एक पिशवी घेतली आणि चप्पल पायात अडकवून निघून गेला. सुरेश गेल्यानंतर ५ मिनिटामध्ये साक्षी ला जाग आली त्याला कळलं होत कि सुरेश बाजारात गेला असावा कारण तो रात्री पण बोलत होता उद्या सकाळी पेपर आणायला चाल कट्टयावरचा चहा मस्त असतो.
शशीची भीती आता थोडी कमी झालेली कारण खूप सारा उजेड घरात पसरलेला आणि खाली बऱ्यापैकी वर्दळ चालू होती. शशी आरामात उठला स्वतः कालचा प्रकार आठवून स्वतःवरच हसत होता त्याने बिछान्याच्या घड्या घालून ठेवल्या आणि किचन मध्ये गेला सर्व भांडी लक्ख घासून ठेवली होती तो तसाच किचन ला लागून असणाऱ्या बाथरूम कडे वळला आणि ब्रश वर टूथपेस्ट घेऊन बाहेर व्हरांड्यात जाऊन आरामात दात घासू लागला. त्याच लक्ष चार खोल्या सोडून जी खोली होती तिकडे उभे असलेल्या एक म्हाताऱ्या माणसाकडे गेलं तो माणूस पेपर आड लपून लपून इकडे बघतोय हे शशी ला काळात होत शशी ने लांबून त्याच्याकडे बघून एक स्मित हास्य केलं आणि त्याच्या दिशेने चालत निघाला. तो म्हातारा नंतर असा भासवत होता कि त्याने शशी ला बघितलंच नाही तो म्हातारा त्याच्या खोलीत शिरणार तोच शशी ने त्यांना आवाज देऊन थांबवले. तो म्हातारा थांबला शशीने त्यांना विचारले काय हो काका इकडच्या चार खोल्या बंद का आहेत तो म्हातारा तिरसट पाने म्हणाला कि सर्व गावी असतात. नंतर त्याम्हत्र्याने अजून आवाज चढवून विचारले तुम्ही काय त्या खोलीत जी राहायची तिचे नातेवाईक काय?
शशी ने नकारार्थी मन हलवत सांगितले ''नाही हो माझ्या मित्राने भाड्याने घेतली आम्ही साताऱ्याचे आहोत,''
म्हातारा उद्धट पाने बोलू लागला तुम्हाला हि खोली घ्यायला कोणी सांगितलेलं तुमचं डोकं ठिकाण्यावर होत का. चौकशी का नाही केली?
मरा आता भोग कर्माची फळ आम्हाला काय?
त्यावर शशी ने आतुरतेने विचारल का हो असा काय झालाय चांगली तर खोली आहे छान प्रकाश आहे. मच्छरांचा त्रास नाही ना उंदीर आणि अशी पण तो त्याची आई आणि बहीण इकडेच आणणार आहे.
तो म्हातारा म्हणाला तुम्ही जर का चौकशी केली असती तर तुम्ही इकडे फिरकला पण नसता, आमचा नाईलाज आहे मी आणि माझी म्हातारी बायको आणि माझी आई इकडे राहतो. मुलगा कधीच वेगळा राह्यला गेला आम्ही आता कुठे बदलणार खोली. ''पण ती चेटकीण तुम्हाला गिळून टाकेल'
म्हाताऱ्याच्या शेवटच्या वाक्याने शशी ला हादरवून सोडला त्याने कसा बस त्राण आणून त्यांना परत विचारल ''काय बोलता कोण चेटकीण?''
म्हाताऱ्याने मग हळू आवाजात सांगायला सुरुवात केली.
या मजल्यावर आधी खूप लोक राहायला होते खूप चांगला होता त्या खोलीतील ते जोडपं उंच पुरा तो आणि त्याला शोभेल अशी ती त्याची बायको.
दोघे सुखाने नांदत होते दोघे कोकणातलेच होते आमच्या गावापासून जवळच्याच गावात राहणारे. आमचे त्यांचे चांगले संबंध होते. तीच नाव सरिता होत.
ती दिसायला खूप सुंदर होती तिचे डोळे खूप बोलके होते ती पूर्ण चाळभर फिरायची तीच तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होत तिचा नवरा कन्स्ट्रुकशन लाईन मध्ये होता तो एकेदिवशी कामावरून घरी आलाच नाही ती त्याची खूप वाट बघत होती नंतर खबर आली कि तो सीतेवर बिल्डिंग वरून खाली कोसळला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला. आता हि खबर तिच्या पर्यंत पोहचवण्याचं धाडस कोणाकडे नव्हतं तरीही मी तिला सांगायला पुढे झालो. ती गॅलरी मध्ये त्याची वाट बघत उभी होती रात्रीचे ११ वाजले असावेत मी पुढे जाऊन तिच्या डोक्यावरच कुंकू पुसलं तिने इतक्या तिरस्काराने माझ्याकडे बघितला आणि मोठ्याने ओरडली तिचा आवाज आजू घुमतोय माझ्या कानात. तिने खूप आरडा ओरडा केला तिला चाळीतील सर्व बायका समजावत होत्या पण ती रडायला तयार नव्हती तिचा नवरा मेलाय यावर तिचा विश्वास बसतच नव्हता. कसाबसा तिला आत नेवून झोपवलं रात्री ३ च्या दरम्यान तिच्या नवऱ्याची बॉडी चाली खाली आणण्यात आली ऍम्ब्युलन्स चा आवाज शांत झाला आणि सर्वीकडे भयाण शांतता आम्ही त्याच्या अंत्यविधीची तयारी करू लागलो आता हिला आणायला म्हणून दरवाजा वाजवला ती ड खोलात नव्हती मी खिडकी च्या फटीतून आत बघितला असता मला जे दिसला ते खूप विचित्र होत तिने भाला मोठा तिला तिच्या कपाळावर लावलेला आणि खूप सर काजल तिने डोळ्याखाली लावला होत. आणि घराच्या मधोमध बसून ती काहीतरी पुटपुटत होती. नंतर आम्ही सर्वजण तिला आवाज देऊ लागलो पण टीकाही बाहेर आली नाही आणि ओरडायला लागली माझा नवरा तर इकडे बसलाय आणि तुम्ही असे खोटं बोलताय चला जा आता आम्हाला झोपू द्या हि काही मस्करी करायची वेळ आहे का उद्या यांना कमला पण जायचंय. आम्ही प्रेत सकाळच्या ७ वाजेपर्यंत हलवल नाही वाटलं हिला थोडा वेळाने का होईना कळेल आणि ती बाहेर येईल आणि त्याच अंत्यदर्शन घेईल पण नाही मग चाळीतील रहिवाशाने पुढाकार घेऊन अंत्यविधी साठी स्मशानाकडे जाण्याचा निर्णय झाला. आम्ही जेव्हा अंत्यसंस्कार उरकून परत आलो तेव्हा हि तिच्या नवऱ्याचे कपडे बाहेरच्या र्सशिवार वाळत घालत होती आणि तीच रोजच गाणं पण तिच्या ओठावर होत. ती नेहमी सारखीच नटलेली. आम्हाला कळून चुकलेलं कि नक्कीच हिच्या डोक्यावर परिणाम झाला असावा
पण आता दिवसेंदिवस तीच वागणं चांगले होत चाललेलं तीचा तिच्या खोलीतून नवऱ्याशी गप्पा मारण्याचा आवाज येऊ लागले तासंतास त्याच्याशी फोने वअक़र बोलू लागली काही लोकांनी तर अफवा पसरवली कि हीच बाहेर लफडं होत बार झालं मेला तो. पण ती रात्र खूप भयानक ठरली. अमावस्या होती ती
तिच्या घरातून रात्री मंत्रांचे खूप आवाज येऊ लागले सर्व जण तिच्या मोठमोठ्याने मंत्र बोलल्यामुळे भयभीत झाले होते पण कोणाचं धाडस झालं नाही तिला जाऊन रोकण्याचं आणि तिचा आवाज कर्कश्श होऊन अचानक थांबला. पहाटे ४ ल खूप खूप धूर झालेला चाळीत मी बाहेर आलो तर तिच्या खोलीतूनच धूर येत होता मी तातडीने अग्निशमन दलाला कळवलं आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून तीच जळालेला प्रेत बाहेर काढल. तिच्या तोंडावर एक हास्य होत. घराची अवस्था खूप विचित्र केलेली तिकडे एक काली बाहुली होती . आणि घरामध्ये आग पण पेटवली होती. सहा महिन्यांनी तिच्या लांबच्या नातेवाईकाने येऊन रूम
ती खोली साफ करून रंग रंगोटी करून भाड्याने द्यायचे ठरवलं अन कोणीही भाडेकरू अद्याप भेटला नव्हते ती अजूनही चाळीत फिरते आणि तिचा नवरा परत येईल हि तिला खात्री होती. आता सांग मी तुम्हाला मूर्ख म्हणू कि काय म्हणू.
असा म्हणत त्याने शशी कडे बघितला असता शशी ने सुद्धा त्याचा काल रात्रीचा अनुभव सांगितला म्हाताऱ्याने सांगितलं शक्य तेवढ्या लवकर खोली सोडा
शशी च्या तोंडच पाणी पाळाल होत त्याचा ब्रश आणि त्याचे ओठ टूथ पेस्ट ने पांढरे पडले होते तो खोलीच्या दिशेने वळला त्याने खूप धाडसाने हनुमान चाळीस पुटपुटत घरात प्रवेश केला त्याने बाथरूम मध्ये जाऊन कसाक्बास तोंड धुतलं त्याला त्यावेळी सुद्धा किचन मधल तीच अस्तित्व जाणवत होत आणि हलका हलका बांगड्यांचा आवाज पण येत होता त्याने हातातून पाण्याने भरलेला जग पण पडला आणि बाहेर च्या खोलीत पळत सुटला एक पाय दरवाजायला लावून ठेवून त्याने कसे बसे कपडे घातले आणि बॅग उचलून त्याने टीकडूवून पळ काढला.
त्याला जाऊन १० मिनटं झाली असतील तोवर सुरेश बाजारातून दूध अंडी आणि पेपर घेऊन आला. त्याला वाटलं शशी अजून झोपला असावा म्हणून सुरेश बाहेर उभा राहून कडी वाजवू लागला पण जेव्हा त्याच्या लक्षात आला कि दरवाजा उघड आहे आणि आत कोण नाही त्याने शशी ला फोन लावायला सुरुवात केली पण त्याचा फोने स्विच ऑफ येत राहिला ''च्यामायला घाबरतो तर भुताच्या स्टोर्या सांगतो कशाला देव जाणे'' असं सुरेश स्वतःशीच बोलत किचन मध्ये आला आणि त्याने किचन कट्ट्यावर आपल्या हातातील पिशवी ठेवत अंघोळी साठी बाथरूम मध्ये गेला बाहेर येऊन त्याने बघितले कि त्याचे कपडे काढून ठेवले होते तो थोडा वेळासाठी विचारात पडला पण त्याला वाटलं कि त्यांचं बहुदा कॉल करता करता काढले असावेत. त्याने ते कपडे घातले आणि पेपर वाचत पडला आणि त्याला झोप कधी लागली कळलंच नाही त्याला जेव्हा जाग आली तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले असतील तो स्वतःशीच बडबडू लागला आईला एवढा कसा झोपलो त्याने बिछाना उचलला आणि परत एकदा शशी ला कॉल लावला आता पण त्याचा फोने स्विच ऑफ च होता. मग ताईने आईला फोन लावून खूप गप्पा मारल्या आणि आईला शशी चा किस्सा पण सांगितला आईने त्याला मारुतीच्या देवळात जाऊन येण्यास विनंती केली आणि ह्याने पण आईला
आईला बर वाटावं म्हणून होकार दिला. आता सुरेश ला कडकडूनु भूक लागली होती त्याने फ्रेश होऊन खालच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये जाऊन मस्त ऑम्लेट पाव आणि चहा घेतला आणि मोबाइल मध्ये नेट चा रिचार्ज मारून आता चांगला साऊथ हिंदी डब मूवी बघूया असं ठरून त्याने चाळीच्या पायऱ्या चढायला चालू केल्या आता रात्रीचे ७-८ चा प्रहर असेल पायऱ्या चढताना मस्त मराठी सीरिअल ची गाणी ऐकायला येत होती जस जसा तो त्याच्या खोलीकडे चालू लागला तस तसा गाण्याचा आवाज दूर होत गळा आणि एक भयाण शांतता जवळ येऊ लागली आणि तिच्याच अंधार पण शांतपणे आपले हात पाय पसरत होता सुरेश ने टाळा उघडला आणि खोली तुन पुन्हा तोच कुबट वास त्याने घरात उजेड केला आणि पंखा लावला पंख्याचा तो भयानक आवाज हळू हळू हवा पण देत होता सुरेश बॅगेमधला हवेत सुगंध पसरवणारा स्प्रे हवेत मारला, आणि थोड्यावेळ साठी त्याला बर वाटलं आता ताणें चटई टाकली आणि किचन मध्ये जाऊन कढई मध्ये मस्त बुर्जी बनवली आता ती बुर्जी पावामध्ये भरून कढई तशीच ठेवून तो बाहेरच्या खोलीत आला आणि त्याने कानात हेडफोन टाकून युट्युब वर मूवी सर्च करायला चालू केलं खाली कोणची तरी वरात निघाली असावी त्याचा आवाज डिस्टर्ब करत असल्यामुळे ह्याने हाही मोवीचा आवाज वाढवला काही वेळात तो त्या फायटिंग च्या सिन मध्ये मुग्ध झाला तो त्याच आवडत बुर्जी सॅन्डविच आणि आवडता मूवी खूप एन्जॉय करत होता गरज नसल्याने त्याने किचनचा दिवा घालवला होता मूवी बघता बघता त्याचा सहज लक्ष किचन कडे गेलं त्याला जाणवल कि त्या किचन च्या अंधारात कोण तरी व्यक्ती बसलीय भिंतीला टेकून. त्याने निरखून पाहायला सुरुवात केली त्याने मूवी पॉस केला आणि मोबाइलला ची लाईट थोडी कमी केली त्याला ती व्यक्ती बाई असल्यासारखं वाटू लागला कारण तिची साडी आणि ब्लाउस च्या हातावरची नक्षी थोडी थोडी दिसत होती तिला पण बहुदा कळलं असावं ती बाई तिथून उठली मी आणि किचन मधल्या बाथरूमच्या दिशेने गेली. आणि हाक हलका बांगडयांचा आवाज येऊ लागला आणि पाण्याचा आता सुरेश ने मोबाईल ची टॉर्च चालू केली आणि तो हि किचन च्या दिशेने चालू लागला सुरेश चा श्वास फुलला होता त्याला माहित नव्हता पुढे काय आहे. त्याने धाडसाने किचन मध्ये प्रवेश केला आणि सर्वत्र प्रकाश टाकला आतमधल्या दिव्याचा स्विच बाथरूम ला लागून असल्यामुळे सुरेश ने मोबाईलच्या टॉर्च नेच सर्वत्र पहिले आणि त्याच लक्ष त्याने नुकत्याच गॅस वर बुर्जी केलेल्या कढई कडे गेले. ती कढई व्यवस्थित धुवून ठेवली होती आणि ओटा पण स्वछ दिसत होता.
सुरेश ने आता पावले मागे टाकायला सुरुवात केली त्याला कळून चुकले होते कि खूप वाईट शक्ती या घरामध्ये आहे त्याने धावत जाऊन बाहेरच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि त्याने चार खोल्या सोडून जी म्हातारीची खोली होती तिकडे धाव घेतली. त्याने त्यांचा दरवाजा जोर जोरात वाजवायला सुरुवात केली पण बाहेर च्या वारातीतल्या बँड मुले आत त्याचा आवाज पोहचू शकत नव्हता. सुरेश दरवाजा वाजवताना रूम कडे सारखा बघत होता त्याला असा वाटत होत त्याच्या पाठोपाठ ती येतेय त्याला घेऊन जायला म्हतारीने दरवाजा उघडला आणि इकडे सुरेश चा जीव भांड्यात पडला त्याला म्हाताऱ्याने आत येण्यास मनाई केली पण त्याची बायको दयाळू दिसक्त होती तिने त्याला आता घेतलं आणि त्याला पाणीही दिल त्यांच्या घरात गायत्री मंत्र सुरु होते आणि एक ८० वर्षाची म्हातारी माळ घेऊन एका कोपर्यत जप करत बसलेली सुरेश ने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं त्यावर त्यांनी त्याला धीर दिला आणि त्या रात्री तिकडेच झोपण्याचा सल्ला दिला त्याने मनाशी पक्का केलेलं कि उद्याच गावाला जायचं आता यायचा तर आई आणि बहिणी सोबत रात्रीचे ११ वाजले असतील सुरेश ला सुद्धा झोपायला बिछाना दिला होता तो त्यावर पडला होता त्याला झोप लागत नव्हती आता सुरेश ला पण कानामध्ये कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला त्याने त्या आवाजाकडे लक्ष ना देता हनुमान चाळीसा चालू केलं आता त्याला बाहेर कोणतरी येरझाऱ्या घालताय हे स्पष्ट जाणवत होत तो डोळे घट्ट मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या अंगावरून तिचा हात फिरतोय असं त्याला वाटू लागला आणि आता आवाज स्पष्ट त्याच्या कानात येऊ लागला ती त्याला विनवत होती '' नको ना इकडे झोपू चल ना हे आपला घर नाहीय... लवकर घरात ये हा मी आपला बिछाना टाकतेय. सुरेश उठून बसला तो म्हातारा त्याच्याकडेच बघत बसला होता हळू हळू पहाट झाली ६. ३० वाजले असतील सुरेश ने दरवाजा उघडला त्याने ऐकलं होत सर्व वाईट शक्ती सकाळच्या उजेडासोबत नाहीश्या होतातअसा विचार म्हातारा त्याचायकडे बघत राहिला तो त्याला माहिती होत वेळ सरून गेलीय सुरेश बाहेर गॅलरीमध्ये आला आणि त्याने चार खोल्या सोडून असलेल्या त्याच्या दरवाज्याकडे पाहिलं त्याने त्याच्या खोलीच्या दिशेने चालायला सुरुवात केली थोड्या अंतरावर जाताच त्याच्या खोलीचा दरवाजा आतून कोणीतरी खोलला सुरेश थबकला त्याच्या काळजात चर्रर्रर्र झालं तो स्तब्ध उभा राहिला त्याच सर्व लक्ष खोलीच्या उघडलेल्या दरवाजाकडे होत त्या दरवाजातून एक सुंदर स्त्री ने डोकं बाहेर काढलं तिने डोक्याला टॉवेल गुंडाळला होता गोरी पान अशी बोलके डोळे आणि तिच्या तोंडावर स्मित हास्य तिने तिच्या कपाळावर मोठा असा कुंकवाचा टिळा लावला होता. तिने तिचा एक हात बाहेर काढून सुरेश ला त्याचायकडे येण्यासाठी खुणावले आणि मिश्किल पणे हसत त्याला बोलली ''अरे असा काय करतो येना!.. आणि सुरेश वश झाला कारण तो सुद्धा तिच्याच दिशेने चालत होता तो एकटक तिच्याकडे बघत चालला होता ती आत गेली आणि थोड्याच वेळा सुरेश ने आत जाऊन दरवाजा बंद केला.
सुरेश आता तिकडे वर्षानु वर्ष राहतोय आता चाळीतली मांस त्याला सुद्धा घाबरतात. सुरेश सुद्धा तिच्या नवऱ्यासारखा पोशाख करून कामाला जात असे आणि खाली जाऊन एकदा खोली कडे बघून हात हलवत असे.
१८ वर्षानंतर.....
खोलीचा दरवाजा उघडतो सुरेश खूप वयस्कर दिसत होता नेहमी प्रमाणे हातात पिशवी आणि दरवाजात येऊन तिच्याशी काहीतरी खुणवुऊन बोलला आणि हळू हळू चालत गेला.....
Comments