Posts

Showing posts with the label horror story

लहान माझी बाहुली...

Image
छोटस गावं होत. त्या गावात एक कुटुंब राहत होत. ते घर गावच्या वेशी पासून जवळच होत. त्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुली आनंदाने राहत होते नवरा म्हणजेच हरिराम हा ग्रामपंचायत समिती मध्ये कामाला होता आणि त्याची बायको अनिता हि घरची काम करत असे आणि या दोन्ही मुलींना सांभाळत असे. हरिराम चे आई वडील त्याच्या मोठ्या भावाकडे दुसऱ्या गावात राहत असत. त्यामुळे यांच्या घरात या चौघांव्यतिरिक्त कोणी नसे. कधी तरी सणासुदी ला सर्व एकत्र येत असत. हरिराम चा त्याच्या दोन्ही मुलींवर खूप जीव होता. त्यांचं घर गावाच्या शेवटी होत आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या आसपास वर्दळ थोडी कमीच असायची. संध्याकाळची वेळ होती. त्या दोघी खेळात रमल्या होत्या. त्यांच्या आईने आतून आवाज दिला. ''चला बस झालं आता अभ्यासाला बसा बाबा यायची वेळ झालीय. आणि त्या दोघी बाथरूमकडे पळाल्या अनिता ने बाहेर येऊन टीव्ही चालू केला आणि तिची आवडती सीरिअल लावून स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. सायंपाक घरातल्या खिडकीतून वेशीवर असेल वडाच मोठं झाड स्पष्ट दिसत असे. रातकिड्यांचा आवाज दिवस असताना पण किर्र्र्र ...

हडळ (भाग ४) शेवट...

Image
ती उतरली चंद्र प्रकाशात आली. ती हळू हळू पावलं टाकत सर्वांजवळ जाऊ लागली. सर्व जण पाठी सरकत होते. तिच्या तोंडावर हास्य होत. तिने तिचे दोन्ही हात सरळ रेषेत आडवे केले जणू ती सर्वना आलिंगन देण्यासाठी येत आहे. ती जवळ आली तिने एक हात मागे ठेवून मोठ्या बोटाने गाडीकडे इशारा केला ती सर्वांना गाडीत येण्यास खुणवत होती. इथे सर्वांचा थरकाप उडाला होता. ती अजून जवळ येऊन तिच्या मागे असणारा हात बाहेर काढून आता दोन्ही हाताने आत जाण्यास खुणावू लागली. आता मात्र ऐकणं सर्वांना भाग होत कारण तिच्या दुसऱ्या हातात मोठा सुरा होता त्याला बऱ्यापैकी रक्त लागलं होत. सर्व जण एकत्रच दबकत दबकत गाडीच्या दिशेने जाऊ लागले ती तशीच उभी तिच पूर्ण लक्ष नव्या नवरी कडे होत जस ते जोडपं जवळ आलं तास तीच मोठं असणार वाकड बोट तिच्या दिशेने पुढे आलं. त्याने ते झिडकारलं. तिला खूप राग आला तिने त्याच्याकडे रागाने बघितलं परत हसत तिने आत जाण्याचा इशारा केला. कसे बसे सर्वजण गाडीत शिरले सर्वांनी पाहिलं कि आत मध्ये मागे तो आडदांड माणूस शांत बसला आहे.  दुसऱ्या सीट वर जोडपं आणि त्याच्या मागचये सीट वर ड्राइव्हर, कंडक्टर आणि बाकी दोघे बसल...

हडळ (भाग ३)

Image
सर्वांना हूर हूर लागून राहिलीय आता काय घडणार याची... तितक्यात सर्वात आधी ज्याने तिला जवळून बघितले होते तोच तो आडदांड माणूस अचानक हळू हळू गाडीच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो आधी हळू हळू पुट पुटत होता. नंतर त्याचा आवाज वाढू लागला तो त्या हाडळीच वर्णनच जणू करत होता, त्याचा आवाज थोडा बाई सारखा येऊ लागला होता त्याने केलेलं वर्णन जास्तच भयानक वाटू लागलं. घडायला १२ चा प्रहर झाला होता तो आता मोठमोठ्याने बोलू लागला. ''पुनवेच्या रातीला, घाटामधल्या वाटला'' यल ती साथीला, घेऊ नगा आत तिला... हसत हसत बगल ती, यड वंगाळ वागलं ती, तिच्या नजरमंदी हाय रातीची धुंदी रात आज तिचीच हाय इसरू नगा ... येशीपाशी बस्तीय ती, झाडामाग दडलीय ती, कावळ बी आल्यात आज तिच्या साथीला तुमच्या बिगर जाणार नाय आज इथंच हाय वस्तीला हडळ हाय ती हडळ, कधीबी नजरेला पडलं, बघू नगा तिच्याकडं समद ईपरीत घडलं...  असं म्हणत म्हणत तो आडदांड माणूस गाडीपाशी जाऊन उभा राहिला कावळ्यांची काव काव थांबली होती जेव्हा ह्याच हाडळीचा वर्णन चालू झालं होत. तो माणूस आता गाडीच्या शेवटच्या खिडकी कडे उभा होता. तो तिची आतुरते...

हडळ (भुताटकी कथा भाग २)

Image
हडळ (भाग २) ड्राइव्हर गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याचा राम नाम जप चालूच होता. तितक्यात सायकलच्या घंटीचा आवाज आला ड्राइवर ने बोलावलेला गाडी रिपेअर करणारा धापा टाकत आला होता. त्याने लांबूनच मोठ्या आवाजात विचारलं कशी काय बंद पडली ड्राइवर त्याच्या दिशेने वळला आणि प्रॉब्लेम सांगू लागला सर्वांना त्या सायकलवरच्या रिपेअर मन ला बघून थोडा धीर आला होता. त्याने गाडीचं बोनेट उघडलं आणि त्याच्याकडच्या टूल्स ने तो काही पार्ट खोलू लागला कंडक्टर ने बॅटरी पकडली होती आणि सर्व जण आशेने सर्व बघत होते. रिपेअर मन गाडी च्या खाली झोपून खाटखुट करत होता तेवढ्यात कंडक्टर ने विषय काढायचा म्हणून बोलला अहो आमच्या गाडीत एक येडी शिरलीय ती काही केल्या खाली उतरत नाहीय. गावातलाच असावी कोणीतरी. नाय का? तो हे ऐकून रिपेअर मन गाडी खालून थोडा बाहेर आला आणि त्याने विचारलं काळी साडी हाय का तिची? कंडक्टर ने नेहमीप्रमाणे मान हलवून होकार दिला. नंतर म्हणाला तुम्हाला कस माहित हो? रिपेअर मन थोडा अजून बाहेर आला आणि विचारलं ति च्या कपाळावर काळ्या रंगाची मोठी चंद्रकोर हाय काय? कंडक्टर ने होकार द्यायच्या आतच क्षणाचाही विलंब न करता तो...

हडळ (भुताटकी कथा भाग १)

Image
  रात्री फलाट क्रमांक ७ वरून मुंबई साठी ९. ३० वाजताची एस टी होती. मोजकेच प्रवासी एस टी स्टॅन्ड वर दिसत होते. कडाक्याच्या थंडी मुळे सर्वांनी घोंगड शाल कानटोपी मफलर अश्या पद्धतीचा पोशाख केला होता. एकदाची मुंबईची एस टी तिच्या नेहमीच्या जागेवर येऊन उभी राहिली ड्राइवर खाली उतरून  काचेवर पाणी मारू लागला आणि नंतर त्याने त्याच्या तोंडावर हि पाणी मारून झोप उडवली. तोवर ४ ते ५ प्रवासी एस टी मध्ये चढले त्यातला एक जण चढायच्या आधी कंडक्टर ला विचारू लागला '' काय हो मास्तर रिसेर्व्हशन हाय व्हयं''. कंडक्टरने तंबाखू तोंडामध्ये ठेवत नुसती नंदी बैलासारखी नकारार्थी मान हलवली आणि कुठं बी बसा फक्त माझी सीट सोडा. असं म्हणत तो एसटी पुढे जाऊन शिट्टी मारू लागला आता एसटी चालू झाली अजून एक नवीन लग्न झालेलं जोडपं धावत एसटी जवळ येऊन एसटी थांबवली आणि त्यात चढलं. एसटीचा दरवाजा जोरात बंद झाला गाडीतले अंधुक दिवयाच्या प्रकाशात ते जोडपं बसण्यासाठी जागा शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांनी थोडी मधोमध आणि एकांतातली सीट पकडली. त्यांचं हसणं खिदळणे चालूच होत. त्यांच्या अशा वागण्यामुळे बाकी प्रवासी त्यान्च्याक...

भुताटकी कथा

पिंजरा  मुंबई मध्ये जॉब लागल्यामुळे सुरेश ला गावापासून लांब राहावं लागणार होत. त्याने हा जॉब मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याने त्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून हि नोकरी मिळवली. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि एक बहीण होती वडील लहानपनीच देवाघरी गेल्यामुळे आई ने त्याचा व त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. सुरेश दिसायला सावळा असला तरी उंचपुरा आणि दिसायला चांगल व्यक्तिमत्व होत. घरचे खूप खुश होते. सुरेश ने रात्री ११ ची गाडी बस स्टॅन्ड वरून पकडली आणि त्याने मुंबईचा प्रवास चालू केला. दुसऱ्यादिवशी कामात रुजू व्हायचं असल्यामुळे त्याने गाडीतच आपली झोप पूर्ण करून घेतली आणि सकाळी ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेल वर जाऊन पोचला. त्याचे मामा मुंबई ला असल्या मुले त्याच अधून मधून येऊन जाऊन व्हायच त्यामुळे त्याला मुंबईची सर्व कल्पना होती आणि असंही त्याचा मामा चाळीतील १० बाय १० च्या रूम मध्ये त्याच्या फॅमिली सोबत राहायचा त्यामुळे सुरेश ने हॉटेल मध्ये तात्पुरती राहून नंतर लवकरच भाड्याने एखादी रूम घेऊन आई आणि बहिणीला पण तिकडे नेण्याचा निर्णय घेतला होता. ...