Posts

Showing posts from April 26, 2018

तीच नाव विचारायचं राहीलच!

हि गोष्ट आहे १९९० ची, अमित मुंबईला मेडिकल एंट्रन्स साठी काकाकडे आला होता . खूप मन लावून अभ्यास केला होता त्याने. त्याची परीक्षा संपली. त्या संध्याकाळी काकाच्या मुला सोबत तो फिरायला गेला. दोघांनी आधी शॉपिंग केली नंतर एक एक बिअर घेऊन स्वारी घराकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकल ला छोटासा अपघात झाला. दोघांनाही समोरच्याच एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमितच्या पायाला दुखापत झाल्याने फ्रॅक्चर लावण्यात आलं होत. अमितला आणि त्याच्या भावाला बऱ्यापैकी ओरडा पडला होता. आता अमितला एक दोन आठवडे त्या बेड वरच काढावे लागणार होते. अमितला आता त्याच्या कक्षा मध्ये हलवण्यात आलं होत. त्याच्या कक्षा मध्ये अजून एक बेड होता जो रिकामाच होता. तिथे मग दिवस-दिवस त्याचे मित्र मंडळी, नातेवाईक सर्व बसून अमितशी गप्पा करू लागले. दोन तीन दिवस मजेत गेले. पण त्या रात्री १२ वाजता त्या बेड वर एका ५० वर्षाच्या माणसाला आणून ठेवण्यात आलं. अमित सोबत रात्री सोबतीसाठी थांबलेला गण्या ने त्या बेड वर अर्धी झोप काढली असेल पण प्रसंगावधान बघून त्यानेही पटकन बेड रिकामी करून दिला. त्या ५० वर्षाच्या माणसाचं नुकतच ऑपरेशन झाल...