तीच नाव विचारायचं राहीलच!
हि गोष्ट आहे १९९० ची, अमित मुंबईला मेडिकल एंट्रन्स साठी काकाकडे आला होता . खूप मन लावून अभ्यास केला होता त्याने.
त्याची परीक्षा संपली. त्या संध्याकाळी काकाच्या मुला सोबत तो फिरायला गेला. दोघांनी आधी शॉपिंग केली नंतर एक एक बिअर घेऊन स्वारी घराकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकल ला छोटासा अपघात झाला. दोघांनाही समोरच्याच एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमितच्या पायाला दुखापत झाल्याने फ्रॅक्चर लावण्यात आलं होत. अमितला आणि त्याच्या भावाला बऱ्यापैकी ओरडा पडला होता.
आता अमितला एक दोन आठवडे त्या बेड वरच काढावे लागणार होते. अमितला आता त्याच्या कक्षा मध्ये हलवण्यात आलं होत. त्याच्या कक्षा मध्ये अजून एक बेड होता जो रिकामाच होता. तिथे मग दिवस-दिवस त्याचे मित्र मंडळी, नातेवाईक सर्व बसून अमितशी गप्पा करू लागले. दोन तीन दिवस मजेत गेले. पण त्या रात्री १२ वाजता त्या बेड वर एका ५० वर्षाच्या माणसाला आणून ठेवण्यात आलं. अमित सोबत रात्री सोबतीसाठी थांबलेला गण्या ने त्या बेड वर अर्धी झोप काढली असेल पण प्रसंगावधान बघून त्यानेही पटकन बेड रिकामी करून दिला. त्या ५० वर्षाच्या माणसाचं नुकतच ऑपरेशन झालं असावं असा दिसत होत कारण तो माणूस शुद्धीवर नव्हता, पूर्ण खोली मध्ये इन्सुलिन चा वास दरवळत होता. त्या माणसाला त्या बेड वर टाकण्यात आलं. त्याच्या सोबत त्याची पत्नी आणि मुलगा असावा बहुतेक त्यांनी बिछाना नीट करून पेशंट ला वॉर्डबॉय च्या मदतीने बिछान्यात अलगद ठेवलेलं. तो मुलगा नर्स सोबत बोलत बाहेर गेला. त्या माणसाच्या पत्नीने माझ्याकडे बघत दमलेलया स्वरूपात हास्य दिल. अमित उठून बसला होता. आणि गण्या बेड ला टेकून उभा. त्या दोघांचे डोळे तारवटलेले होते. त्या माणसाची पत्नी म्हणाली सॉरी हा आमच्या मुळे तुमची झोप मोड झाली. गण्या तसा बोलण्यात हुशार तो ''काही नाही हो काकू आम्हाला सवय आहे झोप मोड व्हायची'' अमित ने त्याला चिमटा काढत काकूंकडे बघत बोलला 'काय झालं हो काकू यांना ? त्या माणसाच्या पत्नीने उत्तर दिल काही सिरिअस असं नाही त्यांचं छोटंसं अपेंडिक्स च ऑपरेशन झालय''. अमित त्यावर उगाच च्या काळजीच्या स्वरात ''काही टेन्शन नका घेऊ काकू सर्व नीट होईल''... काकूंनी पुन्हा त्याच्या कडे स्मित हास्य देत बघितल आणि त्यांच्या नवर्याच्या अंगावर पांघरून घालू लागल्या. अमित आणि गण्या बाहेर आले बाहेर व्हरांड्या मध्ये अमित गण्याच्या खांद्यावर हात ठेवत हळू हळू चालू लागला दोघांच्या मनात एकच प्रश्न आता खिशामधली सिगारेट फुकायची तरी कुठे? गंभीर प्रश्नावर विचार करत असताना एक सुंदर मुलगी त्यांच्या बाजूने चालत गेली आणि अमितच्याच कक्षामध्ये घुसली. गण्या बोलला डॉक्टर एवढ्या उशीर पर्यंत असते कारे? अमित बोलला अरे वेड्या ती डॉक्टर नाहीय.. चल आत जाऊया गण्या खिशातली सिगारेट काढून मग आता हीच काय करायचं? अमितने त्याच्या हातातून घेऊन स्वतःच्या खिशात टाकली आणि दोघेही पुन्हा चालत त्यांच्या कक्षा मध्ये आले. ते दोघे रूम मध्ये शिरतायत न शिरतायत तोवर ती हातात काही पेपर घेऊन घाईत बाहेर गेली. हे दोघे ती गेलेल्या दिशेने बघत राहिले फक्त. तेवढ्यात मागून काकूचा आवाज आला ''माझी मुलगी आहे ती''. गण्या आणि अमित ने काकूंकडे घाबरल्या नजरेने बघितल. अमित सावरत म्हणाला ''हो का? ते दोघे रूम मध्ये बेड वर येऊन बसले. गण्या सारखा सारखा खिशातली सिगारेट मागत होता आणि अमित मात्र त्याच्या विश्वात रमला होता. त्याला ती बघताच क्षणी आवडली होती.
पहाटेच्या ६ वाजता नर्स चा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. अमितला जाग आली तेव्हा कळलं गण्या आणि अमित दोघे एकाच बेड वर झोपल्यामुळे आणि गण्याने अमितच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर स्वतःची तंगडी ठेवून झोपल्याने नर्स चिडली होती. अमितच्या हे सर्व लक्षात येतंय ना येतंय तोच त्याला समोर ती मुलगी समोरच्या बेड शेजारी असलेल्या खुर्चीत बसलेली दिसली अमित केस सरळ करू लागला. त्याने गण्याला हाताने मारून मारून उठवू लागला पण गण्या अजून साखर झोपेत होता. त्याने गाण्याच्या पार्श्व् भागावर लाथ दिली आणि गण्या बेड वरून खाली कोसळला. गण्या डोळे चोळत अमितकडे बघून शिवी देणार तोच त्याने नर्स ला बघितलं आणि शिवी तोंडातल्या तोंडात ठेवत खुर्चित त गप्प जाऊन बसला. घडला प्रकार बघून तिच्या तोंडावर हसू आलं होत. थोड्याच वेळेत त्या काकू आल्या आणि तिच्या हातात रिकामे डब्बे देत तिला दुपारच्या जेवणा विषयी सांगत होत्या. अमित मात्र टक लावून तिच्याकडे पाहत होता. ती काकुंशी बोलता बोलता अमितकडे तिरक्या नजरेने बघत होती. तेवढ्यात गण्याने येऊन अमितला सिगारेट मागितली. अमित त्याला ओरडला अरे तुला कितीदा सांगितलं नको पित जाऊ हे हॉस्पिटल आहे. मी कालच नाही का काढून घेतली तुझ्याकडून तुझ्या स्वास्थासाठीच बोलतोय मी तुला'' असं म्हणत अमित तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत होता. तिने तिच्या आईकडून डब्बे घेतले आणि निघाली. अमित स्तब्ध तिच्याकडे बघत राहिला. ती गेली इथे गण्या तोंडावर मोठा प्रश्न चिन्ह घेऊन रागात अमित कडे बघत होता. अमित त्याच्याकडे बघताच गडबडला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत ''चल आता जाऊयात '' म्हणत चालू लागला.
दुपारी मस्त जेवण झालं. अमित आणि गण्या बाहेरून आत आले त्यांनी पाहिलं तो पेशंट शुद्धीवर आला होता आणि त्या काकू त्यांना काहीतरी भरवत होत्या. अमित ने हसत हसत विचारलं ''कसंय आता काकांना''? त्या माणसाने स्मित हास्य देत मान हलवली आणि काकू म्हणाल्या तुम्ही बाहेर कुठे गेलेला नर्स विचारत होती तुम्हाला? अमितने गण्याला जाऊन बघून येण्यास सांगिलते. गण्या गेला. अमित त्यांच्या जवळच असलेल्या खुर्चीत जाऊन बसला. आता अमितच्या आणि काका काकूंच्या गप्पा रंगल्या होत्या मस्त तेवढ्यात अमितचे काका आणि भाऊ आले. गण्या ला काकांनी जायला सांगितलं आता दिवस भर काकांचा मुलगा अमितसोबत असणार होता. नंतर रात्री पुन्हा गण्या होताच. दुपारी अमितच लक्ष तिच्या वाटेवरच लागलं होत. आणि ती ५ वाजता आली पण ती ज्याच्या सोबत आली होती त्यावर अमितचा विश्वास बसत नव्हता ती चक्क गण्या सोबत बोलत येताना दिसली. अमित गण्याकडे आश्चर्याने बघत होता, आता अमित गण्याला बोलू लागला गण्या जरा बाहेर चल ना पण गण्या अमितचा ऐकायला तयार नव्हता गण्या तिच्याशी गप्पा मारण्यात गुंग शेवटी अमितने गण्याला त्याच्या जवळची खिशात लपवलेली सिगारेट दाखवली आणि मग त्याला खुणावत म्हणाला नकोय का तुला मी एकटाच जातो. गण्या पटकन उठला आणि तिला आलोच हा असं म्हणत अमित बरोबर बाहेर आला. अमितने रागाने गण्याला प्रश्न केला तू तिच्या सोबत काय करत होता रे? आणि कुठे भेटली ती तुला? त्यावर गण्या हसत हसत बोलला अरे हो ऐकशील तरी ती तुझ्या विषयीच विचारात होती'' हे ऐकून अमित च्या तोंडावर एक वेगळीच चमक आली तो लाजला ए चल हा काही पण सांगतोयस ती का बरं विचारेल माझ्याविषयी? त्यावर गण्या त्याला म्हणाला बिल्ली आंख बंद करके अगर दूध पी रहि है इसका मतलब ये नही उसको कोई नही देख रहा समझे ... तो पुढे बोलणार तेवढ्यात अमित ने विचार ए सांग ना काय बोलत होती ती? गण्या बोलला अरे काही नाही रे विचारात होती अपघात कसा झाला खूप लागला होता वैगेरे वैगेरे.. पण तू का नाही बोलत तिच्याशी त्यावर अमित बोलला ''अरे यार काय माहित का भीतीच वाटते अंगावर शहारा येतो जेव्हा आमची नजरा नजर होते मला काहीच बोलता येत नाही '' अमित आणि गण्याचं बोलणं बाहेर चालू असतानाच ती त्यांच्याजवळ येते अमित स्तब्ध होऊन उभा राहतो ती गण्याला विचारते ब्लड टेस्ट चे रिपोर्ट मला डॉक्टरांना द्यायचेत इकडे डॉक्टर देशपांडे कुठे बसतात तुला माहित आहे का? गण्या मान डोलावत बोलला अरे तू कशाला देतेस आण ते इकडे मी नेवून देतो मला माहितेय ते कुठे बसतात. गण्या हातात रिपोर्ट घेऊन निघू लागला त्याने वळून तिची नजर चुकवत अमितला डोळ्याने इशारा केला अमित ने लक्ष नसल्याचं दाखवत गण्याकडे दुर्लक्ष केलं. तिने आता अमित कडे पाहिलं अमित तिच्याकडे स्मित हास्य देत पाहत होता. अमित ने तिला विचारलं कसे आहेत बाबा आता? तिने हसत उत्तर दिल हो आता खूप बरे आहेत बहुतेक आम्हाला या आठवड्यात डिस्चार्ज मिळेल.
त्यावर अमित प्रश्नार्थक अविर्भावात तिला म्हणाला ''का? एवढ्या लवकर का?
ती त्याच्या प्रतिक्रियेवर हसली. आणि म्हणाली तुम्हाला कधी देणार आहेत डिसचार्ज? अमित म्हणाला काय माहित पण आता कुठं बर वाटायला लागलं होत.
ती पुन्हा हसली. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आता दोघे हि एखाद्या जुन्या मित्रासारखे बोलायला लागले होते. गण्या आल्यावर तिघे रूम मध्ये गेले.
तेवढ्यात तिच्या बाबानी तिला बोलावलं तिला विचारलं काय ग तुला मुलगा पसंत आहे का? अमित भारावून गेला त्याला विश्वास बसत नव्हता तो पुरता लाजला.
तिचे बाबा आणि आणि ती दोघे अमित कडे एक कटाक्ष टाकून पुन्हा विषयावर आले. बाबानी विचारलेल्या प्रश्नावर तिने सांगितलं ''बाबा मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे''. बरं ठीकाय असं म्हणत तिच्या बाबानी वृत्तपत्र हातात घेऊन त्यात डोकं घालून वाचू लागले. अमित ला राहवलं नाही तिने त्याच्या कडे हसून पाहिलं अमित ने तिच्याकडे बघून हसायच्या ऐवजी खिडकीतून बाहेर बघू लागला. तो रागाने बाहेर जाऊन बसला गण्याला तू अजिबात बाहेर नको येवूस अस बजावून तो बाहेर गेला होता. गण्याला काहीच कळत नव्हतं काय झालं तरी काय? थोड्या वेळाने गण्याच्या लक्षात सारा प्रकार आल्यावर गण्या बाहेर गेला. अमितला तोंड फुगवून बाहेरच्या बाकड्यावर बसलेला पाहून गण्या त्याच्याकडे गेला आणि सांगू लागला अरे वेड्या तिचे बाबा तुझ्या विषयी नव्हते बोलत काही ते तिला लग्नासाठी आलेल्या मागणीसाठी बोलत होते. आणि तिला इतक्यात लग्न करायचं नाहीय.. हे ऐकून अमित च्या तोंडावर पुन्हा चमक आली. तो ताडकन उठला आणि रूम च्या दिशेने चालत सुटला. तो आत येताच तिच्याकडे त्याने पाहिलं पण आता तिला राग आला होता कदाचित, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अमितला तिच्या रागावर पण प्रेम होऊ लागलं. संध्याकाळी ६ वाजता ती निघून गेली. तिने जाताना पण अमित कडे पाहिलं नाही. आणि थोड्या वेळात नर्स आली तिने अमितच्या काकांना दोन दिवसाने डिसचार्ज मिळेल असं सांगितलं काका खुश झाले पण अमित दुखी होता. त्याच लक्ष आता तिच्याच वाटेकडे लागलं होत.
रात्र कशी बशी गेली. दिवस उजाडला गण्या आणि अमित तिचीच वाट पाहत बसले होते. गण्याने अमितच्या सांगण्यावरून आत जाऊन तिच्या बाबाना ती आज येणार आहे कि नाही विचारल पण तिच्या बाबाना हि त्याची काही कल्पना नव्हती. दिवस भर अमित ने बाहेर बाकड्यावर बसून काढला पण ती काही आली नाही. अमित उदास झाला अमित च सर्व लक्ष दरवाजाकडे होत. तो राहून राहून तिच्या आईला विचारत होता घरी सर्व ठीक आहे ना? त्याच ना जेवणात लक्ष होत ना कोणाशी बोलण्यात त्याचे मित्र काका भाऊ सर्व येऊन त्याला भेटून गेले पण त्याच चित्त काही थाऱ्यावर नव्हतं.
दुसऱ्यादिवशी पण तेच. ती आलीच नाही.. त्या दिवशी अमितला डिसचार्ज मिळणार होता अमितचे काका सर्व वस्तू एका बॅग मध्ये भरत होते. गण्याला अमितच दुःख कळत होत पण तो तरी काय करणार? गण्याने टॅक्सी आणली. अमितचा त्या रूम मधून पाय बाहेर पडत नव्हता. त्या काळात मोबाईल फोन वगैरे काही नसल्यामुळे पत्र पाठवणे हाच प्रकार उपलब्ध किव्हा टेलिफोन आणि टेलिफोन पण फारश्या लोकांकडे नव्हता. तिच्या वडिलांनी बोललेल्या वाक्याने अमित अजून उदास झाला, तिच्या वडलांनी अमितला आणि त्याच्या काकांना तिच्याच लग्नासाठी पत्रिका पाठवू म्हणून अमितच्या काकांचा पत्ता सुद्धा घेतला होता. अमित ने सुद्धा पत्ता मागितला पण तेवढ्यात अमितचे काका म्हणाले चल आता टॅक्सी उभी आहे. गाण्याने अमितला खांदा दिला तिघे चालत हॉस्पिटल खाली आले. अमित टॅक्सित बसला गण्या पुढे जाऊन बसला. काका सामान आत ठेवून टॅक्सी वाल्याला बोलले'' चलो भय्या शिवाजी पार्क लेलो''. टॅक्सी चालू झाली तितक्यात अमितच लक्ष हॉस्पिटलच्या फाटकातून आत येत असलेल्या तिच्या कडे गेलं अमित ने डोकं बाहेर काढलं आणि आवाज देऊ लागला पण त्याला तीच नावही माहित नव्हतं तेच विचारायचं राहून गेलं होत. टॅक्सी वाल्याने विचारल ''रोकना है क्या साब? काका त्यावर म्हणाले "नही! भैया आप चलाओ'' टॅक्सी सुसाट रस्तयाला लागली भरधाव वेगाने शिवाजी पार्कच्या दिशे धावू लागली. अमित आणि गण्या एकमेकांकडे बघत राहिले अमित हळूच गण्याला म्हणाला ''गण्या अरे माझं हॉस्पिटलच्या रूम मध्ये काहीतरी राहिलाय जातोस का रे ? गण्या मान डोलावत ''हो हो आता जातो ना भैय्या गाडी रोको'' भैया ने आधी गण्याकडे आणि मग अमितच्या काकांकडे बघितलं. अमितच्या काकाने मोठ्या आवाजात ''काहीही राहील नाहीय, ये भय्या तू चालव रे नको लक्ष देऊ ह्यांच्याकडे... आधीच उपद्व्याप काही कमी नाही केलेत तुम्ही लोकांनी गप्प घराकडे चलायचं. गण्या पुन्हा नंदी बैलासारखी मान डोलावत पुढे बघत राहिला. अमितला तिला फाटकातून आत जाताना बघयला मिळालं आणि तिला बघितल्या मूळ अमितला तिला भेटायची इच्छा अजून वाढली. पण नाईलाज होता त्याचा.
दुसऱ्या दिवशी न राहवून काका बाहेर गेल्याच बघताच. अमितने गण्याला हाक मारली आणि मित्राची मोटरसायकल आणायला सांगतली दोघे त्यावर आरूढ होऊन थेट हॉस्पिटलच्या दिशेने गेले. पण चौकशी दरम्यान त्यांना कळलं होत कि त्यांना सुद्धा डिस्चार्ज मिळालाय. आता अमितच्या आशेचा किरण विझला तो उदास अंतकरणाने पुन्हा घरी गेला. त्याच गण्याने सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिचा चेहरा काही केल्या अमितच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.
दिवसा मागून दिवस गेले. अमितचा मेडिकल एंट्रन्स चा निकाल लागला. अमित चांगल्या मार्काने पास झाला होता आणि त्याला त्याच्या आवडत्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार होता.
अमितने ऍडमिशन घेतलेल्या कॉलेज मध्ये अमितचा पहिला दिवस आणि अमितने कॉलेज च्या फाटका तुन आत जाताना तिलाच पाहिलं. तो धावत तिच्याकडे गेला. धापा टाकत तिच्या समोर जाऊन फक्त उभा राहिला. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तिने सुद्धा त्याच कॉलेज मध्ये प्रवेश घेतलाय त्यावर.
तिने त्याचा हात हातात घेतला. आणि सांगितलं माझं नाव सरिता. अमित हसला. त्याला आठवल जेव्हा त्याने तिला हॉस्पिटलच्या फाटकातून आत जाताना पाहिलं होत तेव्हा तो डोकं बाहेर काढून मोठं मोठ्याने आवाज देत होता पण तीच नाव माहित नसल्यामुळं ती सुद्धा त्याच्याकडे अवाक होऊन बघत उभी होती. तिने पुढे सांगितलं मी सुद्धा मेडिकल साठी एंट्रन्स दिली होती पण मला गण्याने सांगितलं होत तुझं आवडत कॉलेज हेच आहे म्हणून मी सुद्धा इथेच प्रवेश घेतला. अस म्हणत तिने त्याच्या हाताला घट्ट पकडत त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याचे डोळे भरून आले होते.
Comments