सूरपारंब्या (भाग १)
नमस्कार वाचकांनो! मनापासून खूप खूप आभार.. तुम्ही माझ्या कथा आवडीने वाचत आहात आणि मला तुमच्या प्रतिक्रिया मिळताहेत.. या बद्दल खरंच मी तुमचा सर्वांचा कृपाभिलाषी आहे.. मला तुमच्या कडून अजून स्फूर्ती मिळतेय नवीन कथा लिहिण्यासाठी .. सूरपारंब्या (भाग १) आज मी तुमच्या समोर एक नवीन थर्रारक कथा आणि नवा विषय घेऊन लिहीत आहे. कथेच शीर्षक तितकंच उत्कंठा वाढवणार आहे. मला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.. शाळेची घंटा वाजली... टन टन टन टन! मुलांचा दंगा... एक गावच्या जिल्हापरिषद शाळेतील मुलांचा कल्लोळ... म्हाद्या खूपदा नापास होऊन पुन्हा ४ थी इयतेत शिकणारा. शरीराने आडदांड पण बुद्धीने तेवढाच असक्षम. मुक्या अभ्यासात हुशार पण उंचीने आणि रंगाने मार खाल्लेला म्हणजेच काळा कुट्ट आणि बुटका .. वैशी नाकात सदैव वाहणारी गंगा आणि कोणी काही बोललं तर डोळ्यातून सुद्धा आमल्या चुणचुणीत खोडकर टवाळ पण पैंजेसाठी काहीही करणारा आणि मणी अभ्यास सोडून काहीही सांगा सर्व करू शकते लपून छपून आईची मशेरी सुद्धा लावते अशे हे पाच जण नेहमी शाळा सुटल्यावर खेळा मध्ये गुंतून जायचे. आणि संध्याकाळी मातीमध्...