Posts

Showing posts from November 10, 2017

हडळ (भुताटकी कथा भाग १)

Image
  रात्री फलाट क्रमांक ७ वरून मुंबई साठी ९. ३० वाजताची एस टी होती. मोजकेच प्रवासी एस टी स्टॅन्ड वर दिसत होते. कडाक्याच्या थंडी मुळे सर्वांनी घोंगड शाल कानटोपी मफलर अश्या पद्धतीचा पोशाख केला होता. एकदाची मुंबईची एस टी तिच्या नेहमीच्या जागेवर येऊन उभी राहिली ड्राइवर खाली उतरून  काचेवर पाणी मारू लागला आणि नंतर त्याने त्याच्या तोंडावर हि पाणी मारून झोप उडवली. तोवर ४ ते ५ प्रवासी एस टी मध्ये चढले त्यातला एक जण चढायच्या आधी कंडक्टर ला विचारू लागला '' काय हो मास्तर रिसेर्व्हशन हाय व्हयं''. कंडक्टरने तंबाखू तोंडामध्ये ठेवत नुसती नंदी बैलासारखी नकारार्थी मान हलवली आणि कुठं बी बसा फक्त माझी सीट सोडा. असं म्हणत तो एसटी पुढे जाऊन शिट्टी मारू लागला आता एसटी चालू झाली अजून एक नवीन लग्न झालेलं जोडपं धावत एसटी जवळ येऊन एसटी थांबवली आणि त्यात चढलं. एसटीचा दरवाजा जोरात बंद झाला गाडीतले अंधुक दिवयाच्या प्रकाशात ते जोडपं बसण्यासाठी जागा शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांनी थोडी मधोमध आणि एकांतातली सीट पकडली. त्यांचं हसणं खिदळणे चालूच होत. त्यांच्या अशा वागण्यामुळे बाकी प्रवासी त्यान्च्याक...