हडळ (भुताटकी कथा भाग १)

  रात्री फलाट क्रमांक ७ वरून मुंबई साठी ९. ३० वाजताची एस टी होती. मोजकेच प्रवासी एस टी स्टॅन्ड वर दिसत होते. कडाक्याच्या थंडी मुळे सर्वांनी घोंगड शाल कानटोपी मफलर अश्या पद्धतीचा पोशाख केला होता. एकदाची मुंबईची एस टी तिच्या नेहमीच्या जागेवर येऊन उभी राहिली ड्राइवर खाली उतरून  काचेवर पाणी मारू लागला आणि नंतर त्याने त्याच्या तोंडावर हि पाणी मारून झोप उडवली. तोवर ४ ते ५ प्रवासी एस टी मध्ये चढले त्यातला एक जण चढायच्या आधी कंडक्टर ला विचारू लागला '' काय हो मास्तर रिसेर्व्हशन हाय व्हयं''. कंडक्टरने तंबाखू तोंडामध्ये ठेवत नुसती नंदी बैलासारखी नकारार्थी मान हलवली आणि कुठं बी बसा फक्त माझी सीट सोडा. असं म्हणत तो एसटी पुढे जाऊन शिट्टी मारू लागला आता एसटी चालू झाली अजून एक नवीन लग्न झालेलं जोडपं धावत एसटी जवळ येऊन एसटी थांबवली आणि त्यात चढलं. एसटीचा दरवाजा जोरात बंद झाला गाडीतले अंधुक दिवयाच्या प्रकाशात ते जोडपं बसण्यासाठी जागा शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांनी थोडी मधोमध आणि एकांतातली सीट पकडली. त्यांचं हसणं खिदळणे चालूच होत. त्यांच्या अशा वागण्यामुळे बाकी प्रवासी त्यान्च्याकडे भुवया उंचवून बघत होते जणू ह्यांनी लग्न करून असा वेगळ काय केलय हेच विचारात असावेत मनातल्या मनात. असो एकदंरीत प्रवास चालू झाला कंडक्टर सुद्धा आत आला होता त्याने तिकीट विचारण्यास चालू केलं. सर्व आपापली स्टेशन सांगू लागले आणि कंडक्टर नेहमी प्रमाणे सुट्टे पैसे मागू लागला. सर्वांच्या तिकिट्स आटपून कंडक्टर त्याच्या सीट वर जाऊन बसला आणि बाकी लाईट ऑफ झाल्या आणि फक्त हिशोबासाठी कंडक्टर ची लाईट चालू राहिली. आणि काही वेळानंतर ती सुद्धा बंद झाली आता गाडीत ह्या जोडप्यांच्या कुजबुजशिवाय आणि गाडीच्या आवाजाशिवाय काही जिवंत वाटत नव्हतं.

गाडी खंबाटकी घाटातून वरातीत चालल्या सारखी चढ चढत होती. आणि घाटाच्या मधोमध गाडी बंद पडली ड्रायव्हरने तीन चार वेळा चावी फिरवून स्टार्टर मारला पण गाडी थंड एकाच जागेवर निपचित उभी. ड्राइवर खाली उतरला कंडक्टर सुद्धा त्याच्या पाठोपाठ खाली उतरला खूप वेळ खाटखूट करून गाडीला तपासण्यात आलं हळू हळू गाडीतले एक एक करून खाली उतरून आपापली शक्कल लढवू लागले. सर्वांचं एकमत झालं आणि गाडीला धक्का मारून स्टार्ट करायचं ठरलं. जोडपं मात्र गाडीतून हलायला तयार नाही हे बघताच ड्राइवर नि आवाज दिला गाडीमधून सर्वांनी खाली उतरा गाडीला धक्का मारायचाय. जोडप्याच्या बाजूच्या सीट वर बसलेला आडदांड माणूस जो खूप उशीर त्यांच्याकडे टक लावून बघत होता तो उतरू लागला आणि जोडपं सुद्धा त्याच्या मागोमाग उतरलं.

आता ड्राइवर स्टिअरिंग हातात घेऊन बसला आणि सर्वांना मागे जाऊन धक्का मारायला सांगितलं. जोडप्या मधल्या त्याने तिला सांगितलं तुझी काही गरज नाही तू त्या कठड्यावर जाऊन बस ती सुद्धा मान डोलावून त्या दिशेने  गेली सर्वांनी गाडी ढकलायला सुरुवात केली पण चढावर असल्यामुळे गाडी काही केल्या हालत नव्हती. इथे मागे तीच लक्ष झाडाकडे गेलं तिने बघताच ती ताडकन उभी राहिली आणि धावतच गाडी कडे गेली. तिने नवऱ्याचा हात पटकन पकडला आणि त्याला गाडीत खेचू लागली सर्व त्या दोघांकडे बघू लागली आणि तितक्यात वाऱ्याच्या वेगात कोणीतरी त्यांच्या बाजूने जाऊन गाडीत शिरलं.
ते काय होत कोणालाही त्याचा थांग पत्ता लागत नव्हता. सर्वांचं लक्ष आता  गाडीमधल्या असणाऱ्या अंधाराकडे खिळलं. गाडी मध्ये काहीच हालचाल नव्हती सर्व काही स्तब्ध आणि शांत.

 कंडक्टर ने धीर करत आवाज द्यायला चालू केलं'' कोण हाय रे. शुउउउउक कोण हाय आणि कंडक्टर गाडीच्या थंड पत्र्यावर हात आपटू लागला पण आतून काहीही प्रतिक्रिया नाही. मग कंडक्टर त्या आडदांड माणसाकडे वळून म्हणाला ओ जरा बघा कि कोण शिरलंय आत त्या माणसाच्या तोंडावर काहीही हवं भाव नव्हते तो गाडी मध्ये चढला आणि मागे चालत जाऊ लागला. तो प्रत्येक सीट कडे डोकावून बघत होता. त्याच्या पण डोळ्यात थोडी भीती दिसत होती. तो मागे गेला आणि जोरात ओरडला. त्याचा आवाज पूर्ण भीतीदायक वाटत होता. सर्व जण गाडी पासून लांब झाले त्या माणसाने शेवटच्या दोन सीट च्या मधोमध एका बाईला बसलेलं बघितल तिने कपाळावर काळ्या रंगाची चंद्रकोर काढली होती तिच्या चेहऱ्यावर खूप मार लागल्याचे निशाण होते.
तिने काळ्या रंगाची साडी घातल्यामुळे अंधारात तिचा हसणारा चेहरा जास्तच भीतीदायक वाटत होता तो माणूस थोड्या वेळात सावरला आणि तिला बाहेर जाण्यास सांगू लागला'' ए उठतिस का न्हाई का घालू लाथ, चाल निघ खाली. असा म्हणत तो तिच्या जवळ जाऊ लागला पण ती त्याच्या कडे बघताना हसत होती तिच ते हसणं खूपच भयानक होत तो जसजसा तिच्या जवळ जाऊ लागला तिने हातवारे करण्यास चालू केले त्या माणसाच्या अंगावर शहारा आला त्याने पावल मागे घेतली आणि तडख गाडीच्या दरवाजाकडे चालत सुटला. त्याने घडला प्रकार खालच्या लोकांना सांगितलं सांगतांना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते. तो पूर्णपणे विचलित झालेला. सर्वांचं लक्ष त्याच्यावर खिळलं होत तो घडला प्रकार सांगताना सारखा मागे बघत होता. सर्व घाबरले होते ड्राइवर थोडा धीट पणा दाखवत म्हणाला बाहेर खूप थंडी आहे मला वाटतंय आपण सर्व आत जाऊन बसुया, बघू तरी कोण तरी येडी बाय असलं तिला बाहेर काढू. आपण का म्हण बाहेर ताठायचं असं म्हणत ड्राइवर गाडीच्या दिशेने चालू लागला पण चालत चालत त्याच्या तोंडात राम नाम चालू होत थंडीमधल्या थरथरत्या आवाजात ते अजूनच थर्रारक वाटत होत.

नक्की वाचा पुढील कथा (हडळ भाग २) मध्ये... 




Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)