हडळ (भुताटकी कथा भाग २)
हडळ (भाग २)
ड्राइव्हर गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याचा राम नाम जप चालूच होता. तितक्यात सायकलच्या घंटीचा आवाज आला ड्राइवर ने बोलावलेला गाडी रिपेअर करणारा धापा टाकत आला होता. त्याने लांबूनच मोठ्या आवाजात विचारलं कशी काय बंद पडली ड्राइवर त्याच्या दिशेने वळला आणि प्रॉब्लेम सांगू लागला सर्वांना त्या सायकलवरच्या रिपेअर मन ला बघून थोडा धीर आला होता. त्याने गाडीचं बोनेट उघडलं आणि त्याच्याकडच्या टूल्स ने तो काही पार्ट खोलू लागला कंडक्टर ने बॅटरी पकडली होती आणि सर्व जण आशेने सर्व बघत होते. रिपेअर मन गाडी च्या खाली झोपून खाटखुट करत होता तेवढ्यात कंडक्टर ने विषय काढायचा म्हणून बोलला अहो आमच्या गाडीत एक येडी शिरलीय ती काही केल्या खाली उतरत नाहीय. गावातलाच असावी कोणीतरी. नाय का? तो हे ऐकून रिपेअर मन गाडी खालून थोडा बाहेर आला आणि त्याने विचारलं काळी साडी हाय का तिची? कंडक्टर ने नेहमीप्रमाणे मान हलवून होकार दिला. नंतर म्हणाला तुम्हाला कस माहित हो? रिपेअर मन थोडा अजून बाहेर आला आणि विचारलं ति च्या कपाळावर काळ्या रंगाची मोठी चंद्रकोर हाय काय? कंडक्टर ने होकार द्यायच्या आतच क्षणाचाही विलंब न करता तो बाहेर निघून सायकल्या दिशेने धावला कोणालाही काही कळायच्या आत त्याने सायकलवर टांग टाकली आणि लगबगीने निघू लागला सर्व जण त्याच ते वागणं बघून अवाक झाले होते कंडक्टर ने त्याला रोखण्याच्या सुरात आवाज दिला अहो असा झालं तरी काय कोण आहे ती? त्या रिपेअर मन ने थोड्या अंतरावर जात मागे वळून ओरडला हडळ हाय ती हडळ साधी सुधी ब्याद नाय ती तिच्या विषयी ऐकून सर्व गाडी पासून लांब पळत सुटले त्यातल्या एकाने सांगितलं आपण सर्वानी झाडाच्या सावली पासन थोडं लांब हुबा राहील पायजे.ती काय एस ओलंडत नसतेय बघा. सर्वांनी त्याच ऐकून त्याच्या बरोबर जाण्यात धन्यता मानली.
ती रात्र पौर्णिमेची होती चंद्राचा लक्ख प्रकाश पडला होता. घडाळ्यात ११ चा सुमार झाला होता आता तर गाडी नीट होईल याचा काहीही नेम नव्हता सकाळ पर्यंत तिथेच थांबण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता सर्वांचं लक्ष गाडीवर खिळलेलं होत गाडीमधून कसलीही हालचाल अद्याप तरी नव्हती जोडप्या मधल्या त्याने तिला खूप जवळ धरलं होत आणि तो सर्वांकडे वळून म्हणाला किती उशीर असं थांबणार आपण कदाचित तिच्या विषयी गैरसमज असावा आपण या सर्वावर विश्वास नाही ठेवलं तर बर होईल. माझा एका सर्वजण आत जाऊ आणि तिला बाहेर काढू. तितक्यात गाडीमध्ये मिणमिणती आग दिसू लागली जणू तिने आत दिवा लावला असावा आणि आतून कुजबुजण्याचा थोडा आवाज येऊ लागला थोड्याच क्षणात कावळ्यांचा आवाज वाढू लागला आणि कावळे एक एक करून गाडीच्या टपा वर येऊन बसू लागले सर्व प्रकार भीतीदायक घडत होता.
आता १२ वाजायला काही मिनिट उरली होती. जोडप्यातल्या त्याने तिला प्रश्न विचारला तू मघाशी झाडावर काय बघितलंस आणि घाबरून आमच्याकडे पळत का आलीस तू तिला बघितलं होतस का? तिने घाबरलेल्या आवाजात तिथला प्रकार सांगण्यास सुरु केला. ''त्या झाडाच्या लांब लांब पारंब्या कडे माझं लक्ष गेलं मी नीट निरखून बघितलं तर तिथे पारंबी ला कोणीतरी उलट लटकून माझ्याकडे बघतय अस मला जाणवलं आणि मला कानात काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला मी घाबरले आणि तुमच्या दिशेने धावले, त्यावर मागे उभे असलेल्या खेडेगावातल्या प्रवाश्याने तोंड उघडलं ''हा मंग हडळ च असणार बघा ती हाडळीला नवी कोरी सवाशीण लय आवडतीय बघा ती बी तुमच्याच माग आली आन गाडीत शिरलीय. तितक्यात तिच्या नवऱ्याने त्याला झीडकारलं आओ काहीही काय सांगताय सर्व थोतांड असत असा काही नाहीय तुम्ही उगाच का घाबरताय तो तीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाला तू अजिबात घाबरू नको मी आहे ना? ती त्याचा हात अधिक घट्ट धरून त्याला म्हणाली तू आहेस तर मला कसलीही भीती नाहीय.
नक्की वाचा पुढील कथा (हडळ भाग 3) मध्ये..

Comments