Posts

Showing posts from July 18, 2019

वावटळ

Image
 परसोडी गावातील हि गोष्ट आहे. गावातील अत्यंत साधा आणि सरळ असा रामा आपल्या पत्नी सह गुण्यागोविंदाने राहत होता. रामा चे आई वडील तीन वर्षांपूर्वीच गेले होते. त्याचे नातेवाईक त्याच्या परिस्थिती मुळे त्याच्या  घराकडे डुंकून सुद्धा पाहत नसत. रामा परसोडी गावातील ग्रामपंचायत मध्ये शिपायांच्या पदावर कार्यरत होता. तो आणि त्याची पत्नी एवढच काय ते त्याच कुटुंब होत. रामाची बायको कविता अत्यंत गरीब आणि प्रेमळ स्वभावाची. खूप वर्षे देवाला साकडं घातल्यानंतर देवाच्या कृपेने त्यांच्याही घरात आता पाळणा हलणार होता. ते दोघेही अत्यंत समाधानी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत दोघेही रमले होते. कविताला ९ वा महिना लागला होता. रामा तिची पुरेपूर काळजी घेत असे. पण कोणास ठाऊक नियतीच्या मनात काय आलं आणि तो दिवस ती काळ रात्र घेऊन आला. त्या दिवशी सकाळी रामाच पाऊल काही घराबाहेर पडत नव्हतं. बाहेर सुद्धा मळभ आली होती . कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू शकत होता. त्यात कविताला कोणत्याही क्षणी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर ह्या काळजी पोटी त्याची घालमेल चालूच होती. कविता शांत बसून त्याच्या कडे पाहत होती. ...