वावटळ
परसोडी गावातील हि गोष्ट आहे. गावातील अत्यंत साधा आणि सरळ असा रामा आपल्या पत्नी सह गुण्यागोविंदाने राहत होता.
रामा चे आई वडील तीन वर्षांपूर्वीच गेले होते. त्याचे नातेवाईक त्याच्या परिस्थिती मुळे त्याच्या घराकडे डुंकून सुद्धा पाहत नसत. रामा परसोडी गावातील ग्रामपंचायत मध्ये शिपायांच्या पदावर कार्यरत होता. तो आणि त्याची पत्नी एवढच काय ते त्याच कुटुंब होत. रामाची बायको कविता अत्यंत गरीब आणि प्रेमळ स्वभावाची. खूप वर्षे देवाला साकडं घातल्यानंतर देवाच्या कृपेने त्यांच्याही घरात आता पाळणा हलणार होता. ते दोघेही अत्यंत समाधानी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत दोघेही रमले होते. कविताला ९ वा महिना लागला होता. रामा तिची पुरेपूर काळजी घेत असे. पण कोणास ठाऊक नियतीच्या मनात काय आलं आणि तो दिवस ती काळ रात्र घेऊन आला.
त्या दिवशी सकाळी रामाच पाऊल काही घराबाहेर पडत नव्हतं. बाहेर सुद्धा मळभ आली होती . कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू शकत होता. त्यात कविताला कोणत्याही क्षणी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर ह्या काळजी पोटी त्याची घालमेल चालूच होती. कविता शांत बसून त्याच्या कडे पाहत होती. ती उठली त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाली '' आवो किती इचार करताय नेहमी प्रमाणे जा कि कामाला मला कायबी होणार नाय. आणि तसबी कावेरी ताय हायती कि माझ्या संगतीला एक हाक मारली कि पळत येत्यात त्या. त्यावर रामा कवितेकडे बघत काळजीच्या स्वरात बोलला " आग तस न्हाई ग ग्रामपंचायीतीत जायचं असत तर कायबी टेन्शन न्हायी बग पर मला आज शहराकडं धाडणार हायती. काय तरी आजच्या आज जमा करायचे हायती कसलं तरी लयी महत्वाचं पेपर हायती. कविता सुद्धा आता थोडी धास्तावली. तिने पुन्हा त्याच्या डोळ्यात बघत त्याला धीर दिला तुम्ही जा उगा मनात काय बी आणू नगा आज वर देवाने आपली काळजी घेतली नव्ह मग इथून पुढं बी घेईल कि. रामा तिला बोलला आग पर आज तुझी हालत काय आहे इथं कधी बी आपल्याला दवाखान्यात पळावं लागतंय बघ.. कविता रामाचं बोलणं कापत नाय नाय जा बिगी बिगी म्हंजी सांच्याला घरला लवकर याल. मला काय बी न्हाई होंणार . रामाने कस बस अंगावर शर्ट चढवलं आणि चप्पल पायात अडकवून निघून गेला . कविता मात्र दरवाजात उभी राहून त्याला जाई पर्यंत बघत राहिली. रामाने ११ वाजताची शहराकडे जाणारी एस टी पकडली. सकाळचे ११ च वाजले असतील पण काळोख मात्र संध्याकाळच्या ७ च्या सुमार सारखा भासत होता. रामा च पूर्ण लक्ष घराकडे लागलं होत. त्याला वाटत होत गाडी अजून जोरात धावावी आणि रामा शहरात लवकर पोहोचावा आणि काम उरकून पटकन घराकडे निघावं. तो दोनदा उठून एस टी ड्राइवर शेजारी जाऊन थोड्या हळू आवाजात च बोलला व साहेब जरा चालवा कि जोरात लयी हळू चाललीय बगा गाडी. जरा हाना कि कान कान. ड्राइव्हर त्याच्याकडे न बघतच तुम्हाला काय जातंय ओ सांगायला आणि काय बर वाईट झालं तर निस्तरणार कोण? रामा जागेवर येऊन बसला. त्याची घालमेल चालूच होती तो दुपारच्या अडीच च्या सुमारास शहरतल्या कचेरीत दाखल झाला. तिथे मात्र पावसाचं चिन्ह नव्हतं. पण तिथे जेवणाची वेळ चालू असल्यामुळे तो नुसताच बसून होता. त्याने खिशातून फोन काढला त्याच्या त्या जुनाट फोन ची बॅटरी बरयापैकी जास्त चालत असे म्हणून त्याने अजून कधी फोन चेंज नाही केला. त्याने शेजारी राहत असलेल्या कावेरी ताईंच्या घरी लँड लायन वर फोन केला. कोणीही उचलला नाही. बाहेर पाऊस चालू झाला. रामाला काम आटोपता आटोपता ५ वाजले. तो शहारातील एस टी स्थानकात उभा होता त्याच्या गावची बस अजून लागली नव्हती. त्याने लगबगीने फोन काढला पण आज त्याला फोन ने पण दगा दिला होता. फोन ची बॅटरी संपल्यामुळे तो बंद झाला होता नशिबाने त्याच्या बाजूच्या गावची गाडी लागली त्याने विचार केला. तीथवरचा पल्ला तरी सम्पवूया बाकी पुढचा प्रवास पायी चालत करता येईल. आणि तो त्या एस टी मध्ये चढला. आता एस टी गावाच्या दिशेने धावू लागली. त्याच पूर्ण लक्ष त्याच्या घराकडे लागलं होत. तेवढ्यात पावसाने थेयमान घालायला सुरुवात केली मुसळधार पाऊस झाला होता विजेचा कडकडाट होत होता. गावाकडच्या त्या चिंचोळ्या रस्त्यावरून बस ड्रायव्हर मात्र शिताफीने गाडी चालवत होता. रामा खडखड वाजणाऱ्या खिडकीतून बाहेर टक लावून बघत होता.
काही वेळातच त्याचा स्टॉप आला . कंडकटर ने रामा कडे बघत आवाज दिला. तुम्हाला इकडचं उतरायचं होत ना? रामा हडबडून उठला तो विसरला होता त्याने बाजूच्या गावची बस पकडली होती. तो ज्या ठिकाणी फाटा लागतो तिथे लगबगीने उतरला. गाडीचा दरवाजा बंद झाला गाडी निघून गेली. आता रामा पावसात आडोसा शोधण्यासाठी धावू लागला. पण त्याला काही आडोसा मिळत नव्हता. त्याने तसाच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्या वाटेने सहसा दुपारच्या वेळी पण कोण जात नाही कारण अक्ख्या गावाला माहित होत कि त्या वाटेने जरी लवकर पोहोचता येत असल तरी तिथे खूपच दाट जंगल आहे आणि तिथल्या भुताटकीच्या कथा आसपासच्या गावात प्रसिद्ध होत्या. परंतु रामा ने त्या वाटेने जायचा निर्णय घेतला. तो जीव मुठीत धरून त्या वाटेवरून धावू लागला. छोट्याशा पाय वाटेवरून तो धावू लागला पावसाने पण जोर धरला होता वीज कडाडत होती तस तस रामाचे काळजाचे ठोके चुकत होते. तो धावता धावत ठेच लागून त्याचा तोल गेला आणि चिखलात घसरून तो एका झुडुपावर जाऊन आदळला. त्याला जबर दुखापत झाली होती. तो कण्हत उठला त्याला अंधारात काहीही दिसत नव्हतं पण एक मोठी वीज गडगडली आणि त्याला समोर मोठं झाड दिसलं. त्याने झाडाचा आडोसा घेतला त्याने पायाला लागलेली जखम पहिली त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहत होत. पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. तितक्यात एक मोठी वीज गडगडली रामाला ठाऊक होत कुठे तरी वीज पडली असणार त्याने घट्ट डोळे मिटले.. तेवढ्यात त्याला एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याला वाटलं इथे आसपास घर असावं म्हणून तो त्या दिशेने बघू लागला. पण त्याला काहीही दिसत नव्हते. तो हळू हळू पुढे सरकून पाहू लागला बाळाचा आवाज स्पष्ट स्पष्ट होत होता. तो आवाजाच्या दिशेने चालू लागला.
त्याला विजेच्या प्रकाशात कोन्हीतरी पावसात बसल्या सारखं दिसलं त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याची पावलं थांबली. तो मागे फिरणार तोच पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज तो आता त्या आकृतीच्या दिशेने चालू लागला. त्याचे पाय लटलट कापत होते. तो त्या व्यक्तीच्या थोड्या अंतरावर पोहचुन उभा राहिला. ती बाई होती पाठमोरी बसलेली तिने तिच्या मांडीवर बाळाला घेतलं होत. आणि बाळ रडतय हे बघून रामा ने लांबूनच आवाज दिला ''कोण हायसा तुमि आन, एवढ्या पावसात बाळाला घेऊन इकडं का म्हण बसलायसा. त्याचा आवाज ऐकून काहीच उत्तर नाही आलं. तो थोडा अजून पुढे सरकला. त्याने तिला धीर करून अजून एक प्रश्न विचारला. आव एवढ्या राती तुमि बाळाला घेऊन इकडं काय करताय. बाळ आजारी पडलं कि वो अशानं.. तिने बाळाला अलगद थोडं वर उचललं आणि त्याला दाखवलं रामा त्या बाळाकडे बघत बोलला आवो आताच जन्मलेलं बाळ दिसतंय पावसात नगा भिजऊसा माझी बी बायको असा म्हणत असताना त्या बाईने मागे पहिले ती त्याची बायको कविता होती तिच्या डोळ्यात पाणी होत तिने रडत रडत ते बाळ त्याच्या पुढे केलं. हा सर्व प्रकार पाहून रामा ची बोबडी वळली तो रस्ता दिसेल तिकडे धावू लागला तो जीव मुठीत धरून धावला तो गावात पोहोचला त्याचा जिवंत जीव आला होता. तो क्षण भर थांबला आता थोडा पाऊस उघडला होता. तो गुढग्यावर हात ठेवून श्वास घेऊ लागला सर्व गाव शांत होत. रामा धापा टाकत त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला.
कसा बस घरापर्यंत पोहचत त्यांने जोरजोरात दरवाजा वर थाप मारली.. ये कवे दार उघड.. थोड्यच क्षणात कविताने दार उघडले. कविताला पाहून रामा आश्चर्य चकित झाला . तिने तीच साडी नेसली होती आणि कानाला रुमाल गुंडाळला होता. कविता मात्र त्याची हालत बघून हडबडली होती. तिने बाहेर जाऊन त्याला आत घेतलं. रामाला घरात प्रवेश करताच अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तेच बाळ आता मऊ गोधडी वर शांत झोपलं होत. तो कविताला काही सांगणार तोच कविता त्याला सांगू लागली '' मघाशी ८ वाजता याचा जल्म घरातगच झालाय राधा जीजी होत्या म्हणून बर. सर्व्या बायका म्हणत होत्या मरणाच्या दारातून परत आली. त्याने काळजीच्या स्वरात विचारलं का काय झाल्त तुला? कविताने उत्तर दिल आव माझा श्वास बंद झाल्ता बाळाचा जन्म झाला आणि माझा श्वास बंद झाला होता माझं तर डोळ बी उघडत नव्हतं. पण लयी लयी उपकार देवाचे मी मरणाच्या दारातून परत आले. मला तुमची काळजी लागली होती. असा म्हणत ती रामाच्या पुढे आली तिने प्रकाशात नीट निरखून पाहिलं. आणि म्हणाली आव हे किती लागलंय तुम्हाला थांबा मी औषध आणते. रामा ने मान डोलावली कविता आत जाऊन काहीतरी शोधू लागली. रामा बाळाकडे गेला त्याच्या तोंडावर स्मित हास्य होत. रामाने अलगद बाळाला उचलल. त्याला आता कोड उलगडलं होत.
तेवढ्यात दरवाजावर कोणीतरी जोर जोरात थाप दिली.. कविता धावत दाराकडे गेली तिने दार उघडलं. बाहेर राधा जीजी आणि काही बायका जमल्या होत्या. पुरुष मंडळी सुद्धा होती मागोमाग उभी. कविताने प्रश्न केला आव काय व काय झालं ? राधाजीजी रडू आवृ शकल्या नाही त्यांनी हंबरडा फोडला . आग आपला रामा गेला ग. असं म्हणून रडू लागल्या. कविताला आता खप राग आला अवो हे काय बोल्तायसा जीजी आव ते तर कधी आलेत बाळा ला घेऊन बसले बगा आत असं म्हणत तिने आत डोकावलं आव बाहेर या हि बगा समदी काय म्हनत्याती. पण आतून काहीच हालचाल नाही झाली ती आत गेली आत कोण्हीच नाही. तिची बोबडी वळली ती बाहेर आली राधा जीजी कडे जाऊन म्हणाली आता तर होते बसलेले बाळाला खेळवत होते. सर्व बायका तिच्या कडे आश्चर्याने पाहू लागल्या तितक्यात गर्दीची पांगापांग झाली दोन तीन माणसांनी चादरीत गुंडाळलेल्या रामा च शव अंगणात ठेवल. आता मात्र हे बघून ती मटकन खाली बसली. ती त्या रामा कडे एक ताक लावून पाहत होती . राधा जीजीने तिला सावरत त्याच्या जवळ नेलं. आणि तिला सांगू लागले आग ती वाट लयी खराब हाय बघ रामा घरी लवकर येण्या साठी त्या वाटणं आला. आन ज्या झाडाखाली त्यो थांबला होता त्यावर वीज पडली. आणि आपला रामा तिथे आपल्याला सोडून गेला.. कविताने मोठ्या ने रामा ला हाक मारली आणि तिला रडू कोसळलं.

Comments