Posts

Showing posts from November 21, 2017

टवाळ

घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक चाराण्याच्या कोंबडीला बाराण्याचा मसाला लावून टाक आयटम ला फिरवायसाठी थोडा पैशाचा झोल करून टाक मित्राच्या गाडीत पेट्रोल भरून तिला पाणी पुरी देऊन टाक दिसायला काळी असली तरी सेल्फीने ने गोरी करून टाक सोनू,बाबू,बच्चा पुढे हॅशटॅग लाव आणि अपलोड करून टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक कशात नाय काय पण फाटक्यात पाय घालून टाक मित्राच्या मॅटर मध्ये पुढच्याला कानफटात पेटवून टाक पोलिसांनी पकडल्यावर त्याच्याकडून दोन रिटर्न घेऊन टाक तुझ्या साठी नडलोय भावा बोलत खांद्यावर हात ठेवून टाक उगाच पडलो लफड्यामध्ये असं मनात एकदा बोलून टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक आईच्या गावात आणि बाराच्या भावात विकून टाक सिम कार्ड ला लिंक करायला आधार कार्ड देऊन टाक आधार कार्ड ला लिंक करायला पॅन कार्ड पण देऊन टाक देशाचा खरा नागरिक झालायस एकदा खात्री करून टाक  खूप मोठं काम केलं बोलत एक दोन बिअर घेऊन टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक आईची कैची काना बरोबर मात्रा पण जोडून टाक कट्ट्यावरच्या मित्रांना दोन चार बिझनेस प्लान सांगून टाक टाटा बिर्ला ...