लहान माझी बाहुली...

छोटस गावं होत. त्या गावात एक कुटुंब राहत होत. ते घर गावच्या वेशी पासून जवळच होत. त्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुली आनंदाने राहत होते नवरा म्हणजेच हरिराम हा ग्रामपंचायत समिती मध्ये कामाला होता आणि त्याची बायको अनिता हि घरची काम करत असे आणि या दोन्ही मुलींना सांभाळत असे. हरिराम चे आई वडील त्याच्या मोठ्या भावाकडे दुसऱ्या गावात राहत असत. त्यामुळे यांच्या घरात या चौघांव्यतिरिक्त कोणी नसे. कधी तरी सणासुदी ला सर्व एकत्र येत असत. हरिराम चा त्याच्या दोन्ही मुलींवर खूप जीव होता. त्यांचं घर गावाच्या शेवटी होत आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या आसपास वर्दळ थोडी कमीच असायची. संध्याकाळची वेळ होती. त्या दोघी खेळात रमल्या होत्या. त्यांच्या आईने आतून आवाज दिला. ''चला बस झालं आता अभ्यासाला बसा बाबा यायची वेळ झालीय. आणि त्या दोघी बाथरूमकडे पळाल्या अनिता ने बाहेर येऊन टीव्ही चालू केला आणि तिची आवडती सीरिअल लावून स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. सायंपाक घरातल्या खिडकीतून वेशीवर असेल वडाच मोठं झाड स्पष्ट दिसत असे. रातकिड्यांचा आवाज दिवस असताना पण किर्र्र्र ...