लहान माझी बाहुली...
छोटस गावं होत. त्या गावात एक कुटुंब राहत होत. ते घर गावच्या वेशी पासून जवळच होत.
त्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुली आनंदाने राहत होते नवरा म्हणजेच हरिराम हा ग्रामपंचायत समिती मध्ये कामाला होता आणि त्याची बायको अनिता हि घरची काम करत असे आणि या दोन्ही मुलींना सांभाळत असे. हरिराम चे आई वडील त्याच्या मोठ्या भावाकडे दुसऱ्या गावात राहत असत. त्यामुळे यांच्या घरात या चौघांव्यतिरिक्त कोणी नसे. कधी तरी सणासुदी ला सर्व एकत्र येत असत.
हरिराम चा त्याच्या दोन्ही मुलींवर खूप जीव होता. त्यांचं घर गावाच्या शेवटी होत आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या आसपास वर्दळ थोडी कमीच असायची.
संध्याकाळची वेळ होती.
त्या दोघी खेळात रमल्या होत्या. त्यांच्या आईने आतून आवाज दिला. ''चला बस झालं आता अभ्यासाला बसा बाबा यायची वेळ झालीय. आणि त्या दोघी बाथरूमकडे पळाल्या अनिता ने बाहेर येऊन टीव्ही चालू केला आणि तिची आवडती सीरिअल लावून स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. सायंपाक घरातल्या खिडकीतून वेशीवर असेल वडाच मोठं झाड स्पष्ट दिसत असे. रातकिड्यांचा आवाज दिवस असताना पण किर्र्र्र रात्री सारखा भास करून देत असे पण अनिता ला त्याची सवय झाली होती. ती टीव्ही वरची सीरिअल ऐकत आणि कधी डोकावून बघत बघत फोडणी देऊ लागली आणि चहा सुद्धा ठेवला तितक्यात हरिराम ने दरवाजा वाजवला. सर्व काही नेहमी सारखाच घडत होत. हरिराम ने आल्यावर नेहमी प्रमाणे चहा घेतल्यानंतर मुलीना अभ्य्साला बसवला आणि त्यांचा अभ्यास घेऊ लागला टीव्ही बंद झाला होता आता रात्रीचे ८ वाजले होते. बाहेर वातावरण थोडं पावसाचं झालाच होत विजांचा आवाज पण येत होता. अनिताने स्वयंपाक घरातून आवाज दिला ''ताट घेऊ का वाढायला'' हरिराम ने होकार देत मुलींना दप्तर आवरायला लावलं आणि तेवढ्यात घरातली वीज गेली . अनिता थोडी घाबरली होती कारण वीज चमकल्यावर ते वडाच झाड काहीतरीच विद्रुप दिसत होत तिने हरिरामला आत बोलावलं आणि मेणबत्ती शोधायला लावली. हरिराम मुलींची दप्तर खुंटीवर टांगत होता तो मोबाईलच्या टॉर्च च्या प्रकाशात आत गेला त्याने अनिता कडे पाहिलं ती एकटक खिडकीतून बाहेर बघत उभी असलेली दिसली तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या खान्द्यावर हात ठेवून तिच्याकडे पाहताच तो हडबडला तिच्या तोंडावर एक वेगळाच हास्य होत ती वेगळीच दिसत होती विजेच्या कडकडाटाच्या प्रकाशात ती अजूनच भयावह दिसत होती तो मागे सरकला आणि त्याचा तोल भांड्यांच्या मांडणीवर गेला आणि तो आदळला त्याने तिच्या हातात काहीतरी धार धार हत्यार पाहिलं होत क्षणाचा विलंब न करता तो त्या रूम मधून बाहेर पडणार तोच त्याच्या मानेवर खूप जोराचा वार झाला होता तो स्वयंपाक घराच्या बाहेरच्या खोलीत जाऊन मुलींसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला दोन्ही मुलींना कळायला काही मार्गच नव्हता अचानक जे काही घडला होत त्यात फक्त रडणं आणि आरडा ओरडा होता फक्त. आणि बाहेरही जोराचा पाऊस चालू झालेला त्यामुळे गावकऱ्यांना लवकर त्या आवाजाच्या दिशेने मदतीसाठी धाव घेता आली नाही.
थोड्या वेळाने पाऊस थोडा मंदावला गावकरी घरातून एक एक करून बाहेर पडू लागले त्या घरात शांतात होती पण त्याच घरात काहीतरी विचित्र घडलय हे प्रत्येकाला कळलेलं होत. त्या घराच्या आसपास माणसं जमू लागली दरवाजा खिडक्या वाजवू लागली. पण आतून त्या दोन मुलींचा तोंड दाबून रडण्याचा आवाज येत होता. गावकऱ्यांनी नंतर शक्कल लाडावून वरची कौल काढून आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दोघे जण छपरावर चढून घराच्या वरची कौलं काढू लागले त्यातल्या एकाने आत डोकावून पहिलतर तर टाळा नीट असं काही दिसलं नाही त्याने दुसऱ्याचा आधार घेत थोडा अजून खाली डोकावल आणि त्याला जे दृश्य दिसलं ते काळीज पिळवटून टाकण्यासारखं होत. अनिता जी स्वभावानं एकदम गरीब आणि सर्वांशी मनमिळावू पणे वागणारी तिच्या नवऱ्याचा मृतदेह तिच्या दोन मुलिंदेखत विळी ने कापत होती. आणि त्या दोन्ही मुली कोपऱ्यात एकमेकांना घट्ट पकडून उभ्या होत्या आणि आपल्या निपचित पडलेल्या बापाचे तुकडे होताना बघून हमसून दुंसून रडत होत्या. ज्या वहीवर अर्ध्या तासापूर्वी गणित सोडवली होती त्यावर रक्ताचा सडा पडून मोठं कोड निर्माण केलं होत.
वरून दोघांनी प्रवेश करायचा प्रयत्न केला होता त्यांनीही काढता पाय घेऊन बघितलेली सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली.
गावच्या सरपंचानी पोलिसाना फोन करून सर्व कल्पना दिली पोलीस सुद्धा तातडीने हजर झाले आणि थोड्याच वेळात दरवाजा तोडण्यात आला. पोलिसांनी अनिताला ताब्यात घेतले व तिला गाडीत कोंबण्यात आले आणि मृतदेहाचा पंचनामा चालू केला त्या मुली आता मोठमोठ्याने रडू लागल्या. पोलीस त्यांना घडलेल्या प्रकाराविषयी विचारू लागले पण त्या दोघी सावरल्याचं नव्हत्या. हरिराम चा भाऊ आणि आई वडील घटनास्थळी पोहोचले त्यांना हरीची अशी अवस्था बघून रडू कोसळलं. त्यांनी त्या दोन्ही मुलींकडे धाव घेतली. त्याही आता जोबांना बिलगून मोठमोठ्याने रडू लागल्या. गावच्या सरपंचानी पोलिसांना विनंती केली ''कृपया तुम्ही उद्या मुलीना प्रश्न विचार त्या आता खूप घाबरल्यात त्या लहान असल्यामुळे त्यांना थोडा वेळ द्या. पोलिसांनी विनंती मान्य करत ठीकाय आम्ही उद्या येतो. असा म्हणत त्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवून निघून गेले.
हरिराम चे आईवडील आणि भाऊ त्या दोन मुलींना घेऊन त्याच गावातल्या त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. पोलिसांचा फोन आला आणि हरिरंच्या मोठ्याभावाला पोलिसांनी चौकी वर बोलवून घेतलं. रात्रीच एक प्रहर सरला होता कोणालाही झोप लागत नव्हती आखा गाव या घटनेमुळे थरारला होता.
ज्या नातेवाईकांकडे हरिरंचे आईवडील मुलींना घेऊन गेले होते त्याच्या खिडकीतून दूर दिसणार हरिच घर त्या लहान मुलींच्या मनाला खूप यातना देत होत.
हरिराम च्या आईच रडणं थांबता थांबत नव्हतं. त्या मुलींपैकी लहान मुलीने खूप मोठा धक्का घेतला होता. ती खिडकीत उभी राहून त्या घराकडे टक लावून बघत होती. तीला अजून विश्वास बसत नव्हता घडलेल्या प्रकारावर. तेवढ्यात तिच्या आजोबा नी तिला घडल्या प्रकाराविषयी विचारणा केली तिने आजोबांचा हात घट्ट पकडला आणि रडत रडत घडला प्रकार सांगू लागली.
ज्या नातेवाईकांकडे हरिचे आईवडील मुलींना घेऊन गेले होते त्याच्या खिडकीतून दूर दिसणार हरिच घर त्या लहान मुलींच्या मनाला खूप यातना देत होत.
हरिराम च्या आईच रडणं थांबता थांबत नव्हतं. त्या मुलींपैकी लहान मुलीने खूप मोठा धक्का घेतला होता. ती खिडकीत उभी राहून त्या घराकडे टक लावून बघत होती. तीला अजून विश्वास बसत नव्हता घडलेल्या प्रकारावर. तेवढ्यात तिच्या आजोबा नी तिला घडल्या प्रकाराविषयी विचारणा केली तिने आजोबांचा हात घट्ट पकडला आणि रडत रडत घडला प्रकार सांगू लागली.
४ दिवसापूर्वी ........
दुपारची वेळ होती आम्ही दोघी खेळत होतो. आई नेहमी प्रमाणे बाथरूम मध्ये कपडे धुण्यात मग्न होती तितक्यात दरवाजा वाजला. मी धावत जाऊन दरवाजा खोलला तर बाहेर एक काळी कुट्ट म्हातारी आजी उभी होती तिला बघून मी थोडी घाबरले तेवढ्यात त्या आजीने हसत मला आत येऊ का विचारले मी काही बोलायच्या आत आजी आत सुद्धा आली तितक्यात आईने आतून आवाज दिला ''कोण आहे ग ?'' मी काहीच उत्तर दिले नाही आई स्वतःच हात पुसत बाहेर आली आई सुद्धा त्या आजीला बघून ना थोडी दचकलीच कारण ती आजी दिसतच थोडी विचित्र होती. तिचे विस्कटलेले केस आणि कपाळावर गोंदलेल आणि तोंडावर विचित्र हास्य होत तिच्या. आई ने स्वतःला सावरून त्या आजीला विचारलं कोण आहेत तुम्ही काही काम होत का. त्यावर त्या म्हातारीने हसतच शांत पणे उत्तर दिल
''आग बाय थोडं पाणी मिळलं का घसा लयी कोरडा पडलाय बग'' आईने मला पाणी आणायला लावलं मी धावत स्वयंपाक घरात गेली आणि पाणी आणलं त्या म्हातारीचं लक्ष माझ्यावर खिळलं तिने हात पुढे केला मी लांबूनच तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि मी तिला आईच्या मागे दिसणार नाही अशी उभी राहिली. तिने गटागट पाणी पिल्यावर मोठा श्वास घेतला. आई ने तिला पुन्हा प्रश्न केला काही काम होत का कोण आहात तुम्ही? त्या म्हातारीने तिच्याकडे बघत तोंडावर हास्य कायम ठेवत आई ला म्हणाली ''मुली लय ग्वाड हायत तुला, बापाव गेल्यात न्हाई. आईचा आता राग अनावर झाला आई थोडा आवाज चढवून म्हणाली ''तुम्ही कोण आहात आणि अशा घरात कशा काय आलात एक काम करा संध्याकाळी या आता हे घरात नाहीयत. माझी काम पडलीयत खूप चला निघा बर ? त्यावर ती म्हातारी आईला चिडवून आईने बोललेलं वाक्य तिला हसत हसत बोलू लागली आईचा संताप वाढला तिने तिच्या हाताला धरलं आणि चल बाहेर निघ अशी म्हणाली तेवढ्या हसणारी ती म्हातारी रडू लागली ती म्हणाली आग माझी तुझ्या एवढीच कि ग लेक हाय. मेली कि मागच्या महिन्यातच. आज तिची आठवण लयी येत होती बघ म्हणून मी समशानात जाऊन लय रडलीय बघ तुला बघितलं आन तिची आठवण झाली. आई हे सर्व ऐकून थोडी सुन्न झाली तिच्याकडे पाहतच राहिली. म्हतारी पुढे म्हणाली हे बग बाय उन्ह लय पडलंय जरा वायचं उन्ह उतरू दे मग म्या आपली एस टी पकडून माझ्या गावाकडं जायन . तुला काय बी तरास न्हाई देणार निपचित ह्या कोपऱ्यात बसून ऱ्हाईन. आई काही न बोलता बाथरूम मध्ये कपडे धुण्यास निघून गेली आणि आतून मला आवाज देऊन दरवाजा लावून घेण्यास सांगितलं.
आता मी माझी लहान बहीण आणि ती विचित्र म्हातारी बाहेर च्या खोलीत होतो. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा बहिणीसोबत खेळण्यास चालू केलं पण तिची नजर आमच्या वर होती जेव्हा जेव्हा माझं तिच्याकडं लक्ष गेलं तेव्हा तेव्हा तिने हसत मला तिच्या जवळ येण्याचा इशारा केला मी दुर्लक्ष करत राहिली शेवटी तिने बटव्यातुन बाहुली काढली... तिने तीला तिच्या मांडीवर बसवली आणि तिला आमच्याकडं बोट दाखवून काहीतरी सांगू लागली आता मात्र आमचं लक्ष तिच्याकडेच होत. तिने बोलवलं आम्हाला जवळ आणि ती बाहुली माझ्या हातात देत म्हणाली हि बघ तुम्हाला तिसरी भन जश्या तुम्ही दोघी तशीच हि बी हाय
हिला संभाळा बर का पोरीनो लय जीव लावा हिला बी अर्धी भाकर द्या तुमच्या ताटातली.
मी काही बोलायच्या आत लहान बहिणीने ती बाहुली हातात घेतली आणि तिने म्हातारीला प्रश्न केला ''पण आजी हीच नाव काय? मी तिच्यावर रागावले.. तितक्यात आजीने माझ्या लहान बहिणीला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तीच नाव विचारलं आणि बहिणीनं सांगितलं ''माझं नाव कि नाही
स्वरा आहे'' म्हातारी तोंड वाकड करत काय एवढं अवघड नाव ठेवत्यात कोण काय बया. तेवढ्यात मी बहिणीला म्हातारीकडून खेचलं म्हातारी माझ्या कडे आधी रागाने आणि नंतर परत हसून बोलली असू असू दे'' फकस्त माझ्या मातीवर तेवढं लक्ष ठिवा. म्या निघते असा म्हणत गुढग्यावर हात ठेवत ती उठली. मी चटकन दरवाजा उघडला ती म्हातारी बाहेर गेली तिने डोळे बारीक करत बाहेर दूरवर नजर टाकली. आणि पुन्हा मागे वळून मला जवळ घेण्यासाठी हात पुढे केला. मी मागे सरकले तिने त्या काळ्याकुट्ट बाहुलीकडे एक कटाक्ष टाकला आणि आईला मोठ्याने आवाज दिला निघते बार का पोरी आनंदानं गुण्या गोविंदान ऱ्हावा. असा म्हणत ती तिची बाहेर असलेली काठी घेऊन हळू हळू चालत गेली. मी दरवाजा लावला आणि स्वराला ओरडले आता आई तुला मारणार तू बाहुली का घेतली
आम्ही त्या बाउली कडे बघू लागलो काळी कुट्ट बाहुली तीच ठिगळ लावून शिवलेला फ्रॉक आणि तिचे विस्कटलेले केस तिला जास्तच विद्रुप बनवत होते. आम्ही तिला समोरच्या टेबलावर ठेवून पुन्हा खेळण्यात मग्न झालो .
आई काम उरकून बाहेर आली आणि नेहमी प्रमाणे टीव्ही वरची ठरलेली मालिका चालू करून आम्हाला समोर बसवून डोक्यात तेल लावून आमचे केस विंचरू लागली तितक्यात तीच लक्ष टेबलावरच्या बाहुली कडे गेलं. ती हडबडली तिने माझ्या पाठीत जोरात धपाटा दिला आणि मला त्या बाहुली विषयी विचारलं. मी सर्व घडलेली हकीकत तिला सांगितली आई उठली आणि ती बाहुली उचलून स्वयंपाक घरातल्या खिडकीतून बाहेर भिरकावली. ती बाहुली त्या वडाच्या झाडाखाली जाऊन पडली. आई ने खिडक्या बंद करून घेतल्या. मे महिन्याचा शेवट असलयामुळे थोडी थोडी पावसाची चिन्ह दिसत होती. ढगांचा गडगडाट अधून मधून होत होता. आई आत आली आणि स्वराला ओरडली. आणि पुन्हा तिच्या आवडत्या मालिके मध्ये गुंग झाली. संध्याकाळी नेहमी प्रमाणे बाबा आले माझ्यासाठी ८ विच गणिताचं पुस्तक आणलेलं त्यामधून मला गणित शिकवणार होते संध्याकाळ पासून. आम्ही अभ्य्साला बसलो . सर्व काही नेहमी प्रमाणे घडत होत. त्या रात्री आई सर्व काम आटपून स्वयंपाक घरातून बाहेर आली आमची बाबांसोबत गप्पा चालूच होत्या आई ने बाबांना सांगितलं अहो झोपा तुम्ही ह्यांना काय नुसत्या दिवस भर खेळत असतात आणि आई बिछान्यावर पडताच बाबानी तिला लाईट घालवून डिम लाईट लावण्यास सांगितलं आणि आई पुन्हा उठली तिने स्वयंपाक घरातली लाईट चालूच ठेवलेली ती विझवली आणि तीच लक्ष खिडकीतून त्या झाडाकडे गेलं आणि तिने जे बघितल ते पाहून ती जोरात किंचाळली. बाबा धावत स्वयंपाक घरात गेले. आईने त्याच म्हातारीला वडाच्या झाडाखाली ती बाहुली घेऊन झोपवताना पाहिलेलं पण बाबांना तस काही दिसलं नाही. आईला रात्री सारखा भास होत राहिला. आईला कधी लहान मुलीच्या रडण्याचा तर कधी म्हातारीच्या आवाजात अंगाई गायल्याचा आवाज येऊ लागला. माझी आणि स्वराची तर झोपच उडाली होती त्या म्हातारीने आम्हाला तिच्या बाहुलीवर लक्ष द्याला लावलं होत. तीन दिवसात तिचा हा प्रकार वाढला होता तिने बाबांना वारंवार ती म्हातारी झाडाखाली उभी आहे बघा ती ओरडतेय रडतेय तिच्या हातात ती बाहुली आहे . सांगायचं प्रयत्न केला पण बाबांना काहीच दिसलं नाही बाबानी आज निर्णय घेतला होता कि थोडे दिवस आपण आजी आजोबांकडे जाऊन राहूया उद्या बाबा आम्हाला घेऊन जाणार होते म्हणून सुट्टी सुद्धा टाकलेली. पण आज रात्री असं काही घडणार याची कल्पना नव्हती बाबांना. आई स्वयंपाक घरात असताना लाईट गेली आईने बाबांना मेणबत्ती शोधण्यास सांगितले आम्ही बाहेरच्या खोलीत घाबरलो होतो. बाबा आत गेले त्यांनी पाहिलं तेव्हा आईच्या तोंडावर त्या म्हातारी सारखं हास्य होत तिने बाबांवर धारधार सुरीने वार केला बाबा बाहेर येऊन आमच्या वह्या पुस्तकांवर आदळले आई बाहेर आली आणि आमच्याकडे बघून त्या म्हातारी प्रमाणेच म्हणाली'' काय ग पोरींनो म्या तुमास्नी माझ्या नातींवर ध्यान ठिवाय लावलं हुत ना मंग असं का मन केलं. असं म्हणत आई ने बाबांच्या गळ्यावरून आमच्या समोर तो सुरा फिरवला आणि मी स्वराला घट्ट आवळून घेतल आणि डोळे मिटून किंचाळू लागले मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा भयाण शांतता पसरली माझा बाबा माझ्या नवीन गणिताच्या पुस्तकावर निपचित पडला होता . आई आमच्या कडे हसत बघत बघत बाबांचे तुकडे करत होती. सर्व प्रकार आमच्या डोळ्यासमोर घडत होता आणि मी जीव मुठीत घेऊन सर्व पाहत होते. आणि माझं लक्ष टेबलावर च्या बाहुलीकडे गेलं ती बाहुली तिथेच होती जिथून आईने तिला उचललं होत आई सुद्धा सारखी तिच्याकडे बघत तोंडावरच रक्त पुसत होती. आणि मग वरून कोणीतरी कौल काढली आणि ते सुद्धा घाबरून पळून गेले आणि नंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. कदाचित आई बाबानंतर आम्हाला मारणार होती हो ना हो आजोबा अस म्हणत आजोबांना बिलगून खूप मोठं मोठ्याने रडू लागली.
Comments