हडळ (भाग ३)
सर्वांना हूर हूर लागून राहिलीय आता काय घडणार याची...
तितक्यात सर्वात आधी ज्याने तिला जवळून बघितले होते तोच तो आडदांड माणूस अचानक हळू हळू गाडीच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो आधी हळू हळू पुट पुटत होता. नंतर त्याचा आवाज वाढू लागला तो त्या हाडळीच वर्णनच जणू करत होता, त्याचा आवाज थोडा बाई सारखा येऊ लागला होता त्याने केलेलं वर्णन जास्तच भयानक वाटू लागलं. घडायला १२ चा प्रहर झाला होता तो आता मोठमोठ्याने बोलू लागला.
''पुनवेच्या रातीला, घाटामधल्या वाटला''
यल ती साथीला, घेऊ नगा आत तिला...
हसत हसत बगल ती, यड वंगाळ वागलं ती,
तिच्या नजरमंदी हाय रातीची धुंदी
रात आज तिचीच हाय इसरू नगा ...
येशीपाशी बस्तीय ती, झाडामाग दडलीय ती,
कावळ बी आल्यात आज तिच्या साथीला
तुमच्या बिगर जाणार नाय आज इथंच हाय वस्तीला
हडळ हाय ती हडळ, कधीबी नजरेला पडलं,
बघू नगा तिच्याकडं समद ईपरीत घडलं...
असं म्हणत म्हणत तो आडदांड माणूस गाडीपाशी जाऊन उभा राहिला कावळ्यांची काव काव थांबली होती जेव्हा ह्याच हाडळीचा वर्णन चालू झालं होत.
तो माणूस आता गाडीच्या शेवटच्या खिडकी कडे उभा होता. तो तिची आतुरतेने वाट बघत होता असच दिसत होत. बाकी सर्व जण चंद्राच्या प्रकाशात उभे राहून त्या मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीत जे काही घडतंय ते सर्व निमूटपणे बघत होती. त्याच वेळी मधोमध उभा असलेला एक माणसाने हळू आवाजात सांगितलं
झपाटलं वाटत याला तिने, सर्वात आधी ह्योच तिच्या नजरला पडलेला.
अखेर ती खिडकी खोलली गेली सर्वांचा उत्कंठा वाढल्या, त्या खिडकीचा कर्कश आवाज शांतता चिरत होता. त्या खिडकी तुन एक हात बाहेर काढण्यात आला त्यात हाताच पाहिलं बोट बाकी बोटांपेक्षा फार मोठं भासत होत त्याला बोटाला कापड गुंडाळला होता आणि त्याच्या पुढच्या बाजूने एक मोठं नख जे आतल्या बाजूला वळलेल होत. तिने हात बाहेर काढताच त्या बोटावर एक मोठा डोम कावळा येऊन बसला. तिने अलगद त्याला आत घेतला आणि काही क्षणात तिने
एक छोटं वाडगं बाहेर काढलं आणि तिने ते त्या आडदांड माणसाच्या दिशेने पुढे केलं त्याने हि ते घेतला आणि तो पिऊ लागला. ते कदाचित त्या कावळ्याचं रक्त असावं, आणि तिने त्याला त्या मोठ्या बोटाने आत येण्याचा इशारा केला तो निमूटपणे गाडीच्या दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. इकडे जोडप्यातल्या त्याने त्या आडदांड माणसाला आवाज देण्यासाठी तोंड उघडलं '' ओ अहो एक नका जाऊ इकडे या परत फिरा'' तो फिरण्या ऐवजी पुन्हा खिडकीच उघडली गेली आता तिने तीच मुंडक बाहेर काढलं. त्याच्या बायकोनं त्याच तोंड दाबलं. तिने बाहेर बघितलं तीच लक्ष आता त्याच नववधू कड गेलेलं होत हडळीच्या कपाळावरची चंद्रकोर जाड आणि मोठी असल्या मुळे आणि तिच्या तोंडावरचा हसण्यामुळे लांबून पण ती खूप विचित्र आणि भयानक दिसत होती. तिने सावज हेरलं होत. तिचा प्रहर होता आणि तिचंच साम्राज्य.
नक्की वाचा पुढील कथा (हडळ भाग 4) मध्ये..
Comments