सूरपारंब्या (भाग १)

नमस्कार वाचकांनो!
मनापासून खूप खूप आभार.. तुम्ही माझ्या कथा आवडीने वाचत आहात आणि मला तुमच्या प्रतिक्रिया मिळताहेत.. या बद्दल खरंच मी तुमचा सर्वांचा कृपाभिलाषी आहे.. मला तुमच्या कडून अजून स्फूर्ती मिळतेय नवीन कथा लिहिण्यासाठी ..

सूरपारंब्या  (भाग १)

आज मी तुमच्या समोर एक नवीन थर्रारक कथा आणि नवा विषय घेऊन लिहीत आहे. कथेच शीर्षक तितकंच उत्कंठा वाढवणार आहे.
मला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा..


शाळेची घंटा वाजली... टन टन टन टन!

मुलांचा दंगा... एक गावच्या जिल्हापरिषद शाळेतील मुलांचा कल्लोळ...

म्हाद्या खूपदा नापास होऊन पुन्हा ४ थी  इयतेत शिकणारा. शरीराने  आडदांड पण बुद्धीने तेवढाच असक्षम.
मुक्या अभ्यासात हुशार पण उंचीने आणि रंगाने मार खाल्लेला म्हणजेच काळा कुट्ट आणि बुटका ..
वैशी नाकात सदैव वाहणारी गंगा आणि कोणी काही बोललं तर डोळ्यातून सुद्धा
आमल्या चुणचुणीत खोडकर टवाळ पण पैंजेसाठी काहीही करणारा
आणि मणी अभ्यास सोडून काहीही सांगा सर्व करू शकते लपून छपून आईची मशेरी सुद्धा लावते

अशे हे पाच जण नेहमी शाळा सुटल्यावर खेळा मध्ये गुंतून जायचे. आणि संध्याकाळी मातीमध्ये रंगून घरी परतायचे.

आज सुद्धा अशीच शाळेची घंटा वाजली.. टन टन टन टन!

सर्व मुले घराच्या दिशेने तर हि पाच टाळकी नेहमी प्रमाणे खेळायाला धावली..

त्यात त्यांची हि काही चूक नाही हो.. या पाच जणांच्या घरचे कोणीही घरामध्ये नसायचे. कोनी शेतात तर कोणी कारखान्यात पण घर दुपार पासून संध्याकाळ पर्यंत खाली. म्हणून सर्वच जण त्यांचा वेळ हा खेळण्यात घालवत असत. आणि सर्वांचा आवडता खेळ म्हणजे सूर पारंब्या....

आज सर्व जण खेळायला नेहमीच्या ठिकाणी गेली आणि सर्वांचा हिरमोड झाला तिथे सालाबाद प्रमाणे जत्रेसाठी एक चर्चा आयोजित झाली होती सर्व म्हातारे आणि वयस्कर मंडळी त्या मोठ्या आणि जास्त सावली देणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली जमले होती. सर्व जण त्या माणसांना बघून थांबले तरीही म्हाद्या बोलला ''अय काय नसत होत हि आपली जागा हाय आपणच खेळायचं हिकडं''.. आणि मुलांनी रिंगण आखल. आणि म्हाद्याने ढेंगे खालून काठी भिरकावली.. आणि ती काठी चक्क त्या चर्चा करणाऱ्या एक म्हाताऱ्या पुढे पडली म्हतार्याचा राग अनावर झाला त्याने काठी चे जेवढे तुकडे करता येतील तेव्हडे केले. म्हाद्या मात्र एक एक करून सर्वांच्या तोंडाकडे पाहू लागला. आता म्हाद्याचा राग अनावर झाला. त्याने सर्वांना खुणावलं सर्व आपापली बोचकी उचलायला पळाले आणि म्हाद्याने त्या म्हाताऱ्याला शिव्या द्याला सुरुवात केली. सर्वांनी टेकडीच्या दिशेने पळ काढला. सर्व पळालेले पाहुनमग म्हाद्या पण मागोमाग पळू लागला.

एवढी मोठी टेकडी वरून कशी दिसते कोण्ही कधी विचारच नव्हता केला कारण सर्वच आळशी.
पण आज सर्वांनी त्या टेकडीच टोक गाठलं.म्हाद्याने मात्र एकदा वळून पाठी पाहिलं तो म्हातारा दगड भिरकावत काही तरी ओरडत होता. म्हाद्याने त्याच्याकडे बघत एक मोठा दगड भिरकावला.. आणि टोकाच्या दिशेने धावत सुटला आता सर्व मंडळी टेकडीच्या माथ्यावर असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली शाळेची बोचकी टाकून विसावत होते. तेवढयात म्हाद्या तिथे पोचला शर्टाच्या कोपऱ्याने घाम पुसत बोलला.. ए मुक्या आख कि रिंगण'' आणि सर्वांकडे बघत म्हणाला अय असं का म्हण बसलायसा उठा सूरपारंब्या खेळायचं नव्ह.. त्यावर मणी म्हणाली '' ये म्हाद्या थोडी भाकर खाऊ अन मग खेळू कि... म्हाद्या तिच्याकडं बघत बर चालतंय खाऊन खेळुयात. ये मुक्या झाडाला उंबर लागलीत कि र .. मुक्या व्हय आर पण आस बी खेळताना झाडावर चढायचं हायचं कि तवा काढू मग सांच्याला करू उंबराची पार्टी . म्हाद्या होकारअर्थी डोकं हलवत शाळेच्या बोचक्यातुन रुमालात बांधलेली भाकरी खोलू लागला. सर्व जण आता खाण्यात गुंग झाले. त्यात मुक्या नाकवारचा घाम आणि शेमबुड पुसत म्हाद्याला म्हणाला ''व्हय आपण आदी का नाय र आलो हिकडं'' म्हाद्या त्यावर उत्तर देत म्हणाला'' आर त्यो म्हातारा आदी कधी भेटलाय व्हय .. आर माझा दगुड जर का नेमावं बसला असता ना आज चिंद्याच होत्या बग त्या म्हाताऱ्याच्या.. मणी हसत म्हणाली ''व्हय व्हय लयी मोठा नेमबाज तू '' तिच्यावर चिडत म्हाद्या '' ये मने बघायचंय का तुला कूट बी सांग नेम लावायला तिकडं आपला निशाणा लागला म्हंजी लागला. त्यावर आमल्या ठेचा भाकरी ला लावून तोंडात घालत बर एक पैज लावतो का तुझं पैल राज्य आता रिंगणातून तू काठी जीव खाऊन फेक. आन आमी जर का ती काठी तुझ्या १० म्हणायच्या आत आणली तर तू आमच्या ढेंगे खालंन जायचं.. बोल हाय का मंजूर!.. ???
म्हाद्या आमल्याकडं बघत'' चल लागली पैज.. सर्व जण जेवण आटोपून झाडाच्या सावलीत सज्ज झाले. मुक्याने तोवर एक काळी बाभळीची काठी तोडून आणली म्हणजे माती मध्ये पटकन ओळखता येईल. मुक्याने मग रिंगण आखलं. आता म्हाद्या रिंगणात उभा काठी गर्वाने स्वतःच्या  मांडीवर आपटत आणि नजरेने  सर्वांकडे  रोखून पाहत होता बाकी सर्व सैरा वैरा धावू लागले. उंबराच्या झाडाच्या सावलीत उभा म्हाद्या  मोठ्याने ओरडला'' अय टाकू का? आमल्या ओरडला थांब कि जरा वाईच लयी पेटलाय नव्ह. असं म्हणत आमल्याने मुक्याला इशारा केला आता मुक्या टेकडीच्या कोपऱ्याकडे पळाला. आता सर्वांचं लक्ष म्हाद्याकडे लागलं होत. आमल्या ओरडला '' टाक अय आता.. कोणाची वाट बघतुयास? म्हाद्याला राग आला आणि खरंच त्याने त्याच्या ढेंगेखालून काठी जीव खाऊन भिरकावली. पण ती भर उन्हात उंचावर तिच्याकडे बघताना कोणाला नीट अशी दिसलीच नाही. परंतु ती मुक्याच्या दिशेने गेली होती. आमल्याने आवाज दिला ''मुक्या आर पळ तिकडं , आन लवकर आन १० म्हणायच्या आत... मुक्या शर्टच्या बाहीने घाम आणि शेमबुड पुसत धावला.. थोडा टेकडीचा उतार होता मुक्या धावत होता. त्याच्या कानावर म्हाद्याचे एक दोन तीन ऐकू येत होते. पण त्याला उन्हाने सुकलेल्या पिवळ्या गवतावर ती काळ्या बाभळीची काठी काही केल्या मिळत नव्हती... मुक्या नुसताच जीव खाऊन धावत होता ती काठी शोधत होता .. आता तो टेकडीच्या अशा भागावर आला जिथे म्हाद्याची आकडे मोजणी ऐकूच नव्हती येत... मुक्या खूप दमला होता. टेकडीच्या कोपऱ्यातून उगवणाऱ्या करवंदीच्या जाळीच्या दिशेला होता आता त्याला उंबराचे झाड दिसेनासे झाले होते.  आणि दमल्यामुळे श्वास पण फुलाला होता. तो एका करवंदाच्या झुडुपाच्या सावलीत बसला. आणि  बसून काठी कुठं दिसते का याचा सुगावा घेऊ लागला ..
तेवढ्यात त्याला गवतावरून कोणी तरी जवळ येतंय असा भास झाला त्याने गुढग्यावर उभं राहून इकडे तिकडे पाहिलं. आणि तो हबकला. एक काळीकुट्ट मुलगी त्याच्या समोर उभी होती. तिच्या हातात तीच बाभळीची काठी. ती काठी ती मुलगी मुक्याच्या दिशेने पुढे करत. मुक्या थोडा वेळ स्तब्ध होऊन तिला पाहू लागला. तिने अजून हात पुढे करून काठी त्याच्या अजून जवळ केली.
------------------------------------------------------------------------------
पुढील कथा सूर पारंब्यांच्या पुढच्या भागात.. तो पर्यंत धन्यवाद!

Comments

Unknown said…
Please upload second part

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)