हडळ (भाग ४) शेवट...

ती उतरली चंद्र प्रकाशात आली. ती हळू हळू पावलं टाकत सर्वांजवळ जाऊ लागली. सर्व जण पाठी सरकत होते. तिच्या तोंडावर हास्य होत. तिने तिचे दोन्ही हात सरळ रेषेत आडवे केले जणू ती सर्वना आलिंगन देण्यासाठी येत आहे. ती जवळ आली तिने एक हात मागे ठेवून मोठ्या बोटाने गाडीकडे इशारा केला ती सर्वांना गाडीत येण्यास खुणवत होती. इथे सर्वांचा थरकाप उडाला होता. ती अजून जवळ येऊन तिच्या मागे असणारा हात बाहेर काढून आता दोन्ही हाताने आत जाण्यास खुणावू लागली. आता मात्र ऐकणं सर्वांना भाग होत कारण तिच्या दुसऱ्या हातात मोठा सुरा होता त्याला बऱ्यापैकी रक्त लागलं होत. सर्व जण एकत्रच दबकत दबकत गाडीच्या दिशेने जाऊ लागले ती तशीच उभी तिच पूर्ण लक्ष नव्या नवरी कडे होत जस ते जोडपं जवळ आलं तास तीच मोठं असणार वाकड बोट तिच्या दिशेने पुढे आलं. त्याने ते झिडकारलं. तिला खूप राग आला तिने त्याच्याकडे रागाने बघितलं परत हसत तिने आत जाण्याचा इशारा केला.

कसे बसे सर्वजण गाडीत शिरले सर्वांनी पाहिलं कि आत मध्ये मागे तो आडदांड माणूस शांत बसला आहे.  दुसऱ्या सीट वर जोडपं आणि त्याच्या मागचये सीट वर ड्राइव्हर, कंडक्टर आणि बाकी दोघे बसले. मागोमाग ती आत शिरली तिने आत येताच खिडकी लावायला चालू केलं ती मागे मागे जात खिडक्या लावू लागली आणि तिच्या इशाऱ्यावर मागे बसलेला त्या माणसाने खिडक्या लावण्यास सुरुवात केली तो आता खिडक्या लावत लावत पुढे आला होता त्याला जेव्हा जवळून बघितला तर त्याच्या कपाळावर काळ्यारंगाचा मोठा टिळा होता. नवी नवरी घाबरलेली होती तिने तिच्या नवऱ्याला घट्ट पकडलं होत तिला बाहेर बघण्याचीही हिम्मत नव्हती होत. ती सारखी त्याला हळू आवाजात बोलत होती आता काय करायचं. आपल काय होणार आता? ती माझ्याकडेच बघतेय...
तो तिचा हात हातात घेऊन तिला धीर देत होता.

हडळ मागच्या सीट वर जाऊन बसली होती ती अडकित्याने सुपारी फोडत होती, तिच्या चेहऱ्यावर हसू कायम होत आणि अचानक तिच्या आवाजात आता तो आडदांड माणूस बोलू लागला. ''मला हि सवाशीण पायजेल... म्या तिला घेतल्या बिगर न्हाई जायची'' असं बोलताना त्याचे हावभाव बायकांप्रमाणेच होते. तिचा नवरा ओरडला हे काय चाललंय तुम्ही मूर्ख आहेत का सर्वांना वेड लागलाय तो रागाने उठला आणि मागे बघताच मागे कोणीही नव्हतं सर्वांचं लक्ष मागे गेलं. आता मागची सीट रिकामी होती सर्वजण घाबरले होते आणि आडदांड माणूस जो हे सर्व बोलत होता तो एवढेच शब्द बोलून स्थिर झाला होता. थोड्या वेळाने तो निमूटपणे खाली उतरला आणि गाडीच्या मागच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात दिसेनासा झाला. सर्वजण चक्रावून गेले हे अस कस झालं हडळ एवढ्या सहजासहजी कशी गेली त्यावर खेडेगावातल्या माणसाने परत त्याची अक्कल पाजळली त्याच्या मते आज आमच्या देवीचा वार चालू झाला आणि तो तिचाच जप
करत असल्यामुळे देवीचं आपल्या पाठी उभी राहिली आणि हडळ नाहीशी झाली. सर्वांना त्याच्या ह्या गोष्टीवर पण विश्वास बसला सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला घड्याळात आता साडेतीन पाऊणे चार ची वेळ असेल. ड्राइवर कंडक्टर ला घेऊन पुन्हा गाडी सुरु होतेय का त्यासाठी प्रयत्न करू लागला आणि गाडी सुरु झाली सर्वांना आनंद झाला. गाडीचा आवाज कित्त्येक वर्ष ना ऐकल्या सारखा सर्व जण तो ऐकून खुश झाले अस वाटत होत. खेडेगावातल्या याने देवीचे खूप आभार मानले आणि सर्वांनी मिळून त्याला धन्यवाद दिले.

आता पुढचा प्रवास चालू झाला. खूप छान पहाट झालेली ती मस्त त्याच्या कुशीत झोपली होती थंडी लागू नये म्हणून त्याने तीच तोंड शॉल ने झाकलं होत तो खिडकीतून बाहेर बघत होता आणि त्याला काल रात्री पासून चा प्रवास स्वप्नच वाटत होता. हळू हळू दुकान दिसू लागली रस्त्यावरचे दिवे विझू लागले आणि सूर्याचा प्रकाश वाढू लागला पहाटेचे ६ वाजले असतील बऱ्यापैकी उजेड पसरला होता. तेवढ्यात ....
मागून आवाज आला . ओ मास्तर जरा वाईच गाडी थाम्बवाकी घोट भर चहा घेऊ! कंडक्टर ने मागे बघितलं तो खेडे गावातला माणूस पूर्ण गाडीला त्याने वाचवल्यामुळे आता मोठ्या आवाजात बोलत होता. कंडक्टर  ने हि लगेच घंटी वाजवली आणि रस्त्यालगतच्या एका टी स्टॉल जवळ गाडी उभी झाली.
कंडक्टर ने फक्त १० मिनिट गाडी थांबेल असं सांगून उतरण्यास सांगितलं. सर्व जण एक एक करून गाडीतून उतरून गेले. त्याने तिला उठवायला एक दोनदा आवाज दिला ती खूप शांत झोपलेली त्याने अलगद तिच्या तोंडावरची शॉल बाजूला सरकवली आणि जे दिसल त्याच्यामुळे त्याची बोबडी वळली.
तिच्या कपाळावर खूप मोठी काळ्यारंगाची चंद्रकोर होती आणि नाकाच्या मधोमध जाडसर रिंग ओवली होती तिच्या तोंडावर पण हाडळीच हास्य होत. त्याने तिला ढकलल. तिने डोळे उघडले. त्याच्या तोंडातून आवाज फुटेना. त्याला दरवाज्यापर्यंत पोहचण्यासाठी फक्त दोन पावल जोरात जायचं होत पण त्याच्या अंगातला त्राण पूर्ण पणे गेला होता. तो एकही पाऊल न टाकताच समोरच्या सीटवर कोसळला.  ती उठली ती जवळ आली. त्याच्या काना पाशी गेली. आणि हळू आवाजात गुणगुणू लागली.

हडळ हाय म्या हडळ, कधीबी नजरेला पडलं,
बघू नग माझ्याकडं समद ईपरीत घडलं...

कावळ्याचं रगात, भिनलंय माझ्या अंगात
येळ भरली तुझी आता चल तू माझ्या संगट

असं म्हणत तिने तिच्या नखाने त्याच्या गळ्यावर हळुवार वर केला आणि ती सहज चालत बाहेर गेली. तो तिला जाई पर्यंत बघत होता. ती उतरली तिने दरवाजा ढकलताना एकदा परत मागे वळून त्याच्याकडे बघत प्रेमाने हसली. आणि दरवाजा आपटला. त्याच्या कानात फक्त आता कावळ्यांचा आवाज येत राहिला आणि त्याने डोळे बंद केले.


Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)