परी ...







परी ...


एक होती परी, दिसायला होती बरी
उडत नसली तरी, धावायची खरी.
लोकलची वेळ, हा तर रोजचाच खेळ
लोकलमध्ये होतो पर्यांचा मेळ
लेटमार्क नको म्हणून असते ती घाईत
ट्रेनचा पास संपला तिला नसतं माहीत
पर्यांच्या राज्यात असते खूप काम
रात्री घरी पोहचल्यावर डोक्याला असतो बाम
मुलांचा अभ्यास घेताना होते तिची दमछाक
भागाकार, गुणाकार आणि हातचा एक देऊन टाक
कुकरची शिटी आणि घडाळ्यावर तीच लक्ष
डाळ सुद्धा फोडणी साठी झाली होती सज्ज
खरंच तिच्याकडे असती एखादी जादूची छडी
नसती करावी लागली तिला एवढी मेहनत कधी
आरश्यात बघायलाहि वेळ नसतो परीला
कपाटातून कपडे काढले असतात तिने इस्त्रीला
बिछान्यावर पडताच लागतो तिचा डोळा
अलार्म सुद्धा झोपायला वेळ देतो थोडा
कारण उद्या पुन्हा असणार रोजचाच खेळ
आता स्वप्नांमध्ये जायला नाही परीला वेळ
----------------------------------------
राजन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)