वन पीस ..

वन पीस ..

(नवरा दारातून आत येत चप्पल काढता काढता लाडात येऊन बायकोला एकदम प्रेमात बोलतो)

नवरा : आग ए ऐकलस का ? तुझ्या साठी एक गम्मत आणलीय
          तुला लय आवडलं बघ लयी झाक हाय.

(बायको झाडू मारत मारत नवऱ्याला उत्तर देते )
बायको : म्हंजी आस आणलंय तरी काय म्हणायचं

नवरा : थांब हा जरा वाईच दम धर लगिचच आलो
 
(नवरा लगबगीने आतल्या खोलीत जातो आणि बाहेर येऊन)
नवरा : म्या का न्हाय तुझ्यासाठी गम्माडी जम्मड आणलीय
 तू तर बघून पार येडीच होशील बघ आन नाय झालीस तर नाव नाय आपलं...

त्याच बोलणं कापत ती झाडू मारायचा थांबवून त्याच्याकडं वळून म्हणते
बायको : आता ग बाय आज दिस कुणीकड उजाडला म्हणायचं. (डोक्यावर हात ठेवत) आता माझ्या समद ध्यानात येतंय
             ठरलं असलं मित्रांच्या संगट ढोसायचा प्रोग्राम.
             आन मित्रांच्या संगत प्याचा पोरोग्राम केल्यामुळं जर मस्का लावत असाल तर गाठ माझ्याशी हाय सांगून ठिवते. झाडू दिसतोय का हातात?

नवरा : आग ए का उगा वचा वचा कराया लागलीसा इकडं मी कधी नव्ह ते रोम्यांस च्या मूड मधी...

बायको : (नवऱ्याचं बोलणं कापत) व्हयं ह्यो रोम्यांस कसला असतो. एवढी वर्ष झाली कधी दिसला न्हाई त्यो.

नवरा : आग सोड इंग्लिश हाय तुला नाय कळायचं तू आपली मराठीत बोल..

बायको : हो ढोसा कि देशी आणि घरी झाडा इंग्लिश. (तोंडात ल्या तोंडात पुटपुटते) म्हणे रोम्यांस त्वांड बघ आधी...  इंग्लिश बोलतया ...
            (असं म्हणत ती पुन्हा झाडू मारायला लागते)

नवरा : आता शेवटचं इचारतोय तुला मी आणलेलं गिफट घ्याच हाय का नाय तेवढं बोल बाकी गेलं गाढवाच्या.....

बायको : काय गाढवाच्या कुठं? बोला आव बोला कि?

नवरा:  मी काय इचारलं त्याच उत्तर दे आधिगर बाकी गाढवाचं बघू पुढं.

बायको : बर आता दावाच काय हाय तुमची गम्माडी जम्माड...

नवरा : आता कस.. (प्रेमात ) आग म्या का न्हाई. म्या का न्हाई. म्या का...

बायको : आवं आता हि काय लावलसा म्या का न्हाई म्या का न्हाई. ते तुमचं काय ते गिफट असलं देऊन टाका लयी काम पडल्यात. का म्हण गाढवा गत ओरडून राहिलासा.

नवरा : आग हो हो लयी घाई झालीय नव्ह तूला. (बायको नुसती कमरेवर हात ठेवून डोकं हलवते) (पुन्हा नवरा लाजत ) म्यां का न्हाई ... (बायको : आर आता बऱ्या बोलान सांगा न्हायतर बस म्या का न्हाई करत कोकलत मी काम करते)

नवरा : आग म्या तुझ्या साठंन वन पीस आणलाय..

बायको : ( स्तब्ध होऊन त्याच्या कडे बघत ) आता ग बाय एवढं सांगायला एवढं का म्हण लाजला. आन कसलं पीस म्हणायचं ते मोराच हाय कोंबड्याचं

नवरा : आग तसलं न्हाई ग वन पीस वन पीस (लाजत )

बायको : ब्लाउस पीस व्हय आव मग आस म्हणा कि बर झालं बया माझ्याकडं एक बी चांगला ब्लाउस नाय बगा. किती व चांगला हायसा

नवरा : आग येडी का खुळी तू थांब तुला दाखवतोच आधिगर (असं म्हणत तो मागे हातामध्ये लपवलेला वन पीस गाऊन काढतो आणि तिला दाखवतो तो मोठ्या ऐटीत हसत असतो )

बायको : (अच्म्बीत होऊन ) अबब आव काय हि असलं नट्या घालत्यात नव्ह उघड नागडं न्हाई का.

नवरा : मंग लयी महाग हाय बघ म्या लयी पैस साठवलं बग तुझ्यसाठन

बायको : ह्यो असतोया व्हय वन पीस (असं म्हणत खिडकी पाशी जाते आणि तिच्या मुलांना हाक मारते ) आर ये शिरप्या.. राम्या तुक्या बब्या लवकर घरात या

(मुलं समोर येऊन उभे राहतात)

बायको : आव ह्यो शिरप्या एक राम्या दोन तुक्या तीन आणि हे शेंडेफळ बब्या चार एवढी चार चार पीस झाली आता हे काय याड घेऊन आलासा तुझा मुडदा बशीवला जा ते दुकानात परत देऊन या (नवरा गप पिशवीत घालतो आन बाहेर जातो बायको परत हाक मारून )आन येताना तांदू मुगडाळ आन चक्कीतन तेवढं ज्वारीचं पीठ घेयून या. जावा बिगी बिगी....



Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)