मैफिल
मैफिल
सा रे ग म प ध नि सा ... हा सा आला तुमच्यावर चला गाणं बोला पाहू..... आणि सचिन अवाक होऊन तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता.
तीच लक्ष मात्र अडकित्त्याने सुपारी कातरण्याकडे असलं तरी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आलेले दिसत होते.
दोन आठवड्यापूर्वी...
सचिन मुंबई मध्ये म्युन्सिपालटी मध्ये कारकून म्हणुन १५ वर्ष कार्यरत होता त्याच लग्न २ वर्षांपूर्वीच झालं होत. तो आज हि गडबडीत कामाला जायची तयारी करत असताना मीना ने म्हणजेच याच्या बायकोने आतून डब्बा घेऊन येताना त्याच्याकडे रागात बघून विचारले. '' मग यावेळी लग्नाचा वाढदिवस साजरा कुठे करायचा कि घरीच बसायचं नटून.. त्यावर सचिन तिच्याकडे हसत हसत बघून उगाच लाडात आल्याचं दाखवत बोलला आज रात्री मी माझा प्लॅन सांगतो आपण खूप धमाल करायची आपण या वेळी कुठे तरी बाहेर जाऊयात. आणि तो बॅग उचलून घराबाहेर गेला इकडे मीना चा आनंद गगनात मावेना झाला ती खिडकीत आली आणि नवऱ्याला जाताना पाहू लागली आणि सचिन च लक्ष खिडकीकडे गेलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला आज चक्क ती सचिन ला टाटा करत होती आणि तोंडावर गॉड हास्य त्याने सुद्धा वर पाहून हात हलवला इतक्या दोन वर्षात हे पहिल्यांदा घडतंय आणि ते पण त्याने नको आश्वासन तिला दिल होत खार म्हणजे सचिन तिला रात्री समजवणार होता कि सध्या तरी काम खूप वाढलय आपण घरीच काहीतरी करू फार फार तर एखादा सिनेमा आणि थोडी शॉपिंग पण आता त्याच्याकडे काही गत्यंतर नव्हतं .
सचिन कामामध्ये थोडा उशिराच पोहचला. त्याच आज कामामध्ये लक्षच लागत नव्हतं त्याच्या एका मित्राच्या ते लक्षात आलं तो सचिन जवळ येऊन म्हणाला ''काय झालं रे, आज थोडा अपसेट वाटतोयस काही भांडण बिंडन करून आलास कि काय वहिणींसोबत'' त्यावर सचिन त्याच्याकडे ना बघताच समोरच्या फिले मध्ये काहीतरी शोधताना त्याला म्हणाला ''अरे नाही रे, अजून तरी सर्व ठीकय पण आज रात्री कडाक्याचं होणार, त्याचा मित्र त्याच्या जवळ आला कानाजवळ येऊन बोलला ''काही बाहेर चालू आहे का? सचिन ने आता त्याच्या कडे रागाने बघितलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला ''झालं कधी नवरा बायकोची भांडण म्हंटली कि तुम्हा लोकांना बाहेर काही तरी चालू आहे असच वाटणार, अरे बाबा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे पुढच्या आठवड्यात आणि इकडे कामाचा पसारा बघ, आणि हिला दोन तीन दिवस बाहेर घेऊन जाईन
असं मी आज घरी बोलून आलोय. पण मला नाही वाटत आहे रे हे शक्य होईल. त्याचा मित्र त्यावर हसून बोलला ''हा तिच्या मारी एवढाच ना, मग टेन्शन कशाला घेतोयस मी आहे ना'' ... त्यावर सचिन आशेने त्याच्याकडे बघत बोलला तू काय करू शकतो. त्यावर मित्र म्हणाला मी मघाशी केबिन मध्ये गेलो होतो तर आपले साहेब पुढच्या आठवड्यात बाहेरगावी चाललेत आणि राहील तुझं काम ते मी उडवीन तू जा वाहिणींसोबत फक्त उद्या मीना वाहिनीच्या हातचे गुलाब जामून तेवढे आन... त्यावर सचिन खुश झाला तो बोलला ''अरे बस्स काय उद्या तुलाच काय पूर्ण ऑफिस ला देईन'' तू खूप चांगला मित्र आहेस माझा अस म्हणत तो टेबलापाशी गेला. पुन्हा वळून म्हणाला ''अरे पण तिला नेऊ कुठं''. त्यावर त्याचा मित्र म्हणाला डोन्ट वरी आपण दुपारी खालच्याच सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स कडे जाऊयात तो माणूस मला चांगला ओळखतो तो छान पॅकेज देईल तीन चार दिवसाचं. आता सचिन च्या जिवात जीव आला. त्याने उठून मित्राला मिठी मारली.
दुपारी ते दोघे सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स मध्ये गेले. छोटस ऑफिस होत. त्यात अष्टविनायक, सप्तशृंगी मंदिर. नाशिक, गणपती पुळे असेच फोटो दिसत होते सचिन फोटो बघत होता तेवढ्यात त्याच्या मित्राने त्या ट्रॅव्हल एजन्ट ला विचारले 'काय हो तुम्ही फक्त देव दर्शनच करवता का? कि कोणतं हुनीमून पॅकेज पण देता. त्यावर तो ट्रॅव्हल एजन्ट मोठ्या ऐटीत म्हणाला अहो अस कस आम्ही तर हुनीमून पॅकेज साठी प्रसिद्ध आहोत. त्याने टेबलच्या ड्रॉव्हर मधून एक अल्बम काढला त्यात खूप साऱ्या कपल्स चे फोटो होते पण सर्व कोकणातले. त्यावर सचिन ने त्याला प्रश्न केला काय मग कोकणातच सर्व ट्रिप जातात का? ट्रॅव्हल एजन्ट सचिन कडे बघत बोलला तुमचा बजेट किती आहे? सचिन म्हणाला बजेट थोडा कमीच आहे... त्यावर तो एजन्ट म्हणाला आमच्याकडे सर्व अशीच येतात त्यासाठी आम्ही इकडेच नेतो. सचिन बोलला मला पॅकेज कळेल का त्या ट्रॅव्हल एजन्ट ने दोन चार प्लॅन सांगितले त्यातला सर्वात स्वस्त प्लॅन त्याला आवडला त्यात त्याला कोकणात एक छोटासा वाडा आणि एक केअर टेकर पण मिळत होता जो त्यांना जेवण बनवून देईल. सचिन ने तर ऍडव्हान्स देऊन तो प्लॅन बुक पण केला.
आज रात्री सचिन मोठ्या ऐटीत वागत होता. रात्रीच जेवण झाल्यावर त्याने तिला वाढदिवसाचा प्लॅन सांगितला. मीना खुश झाली. दुसया दिवसापासून तिचा हसरा चेहरा सचिन ला दिसू लागला आता फक्त ४ दिवस उरले होते त्यांना जाण्यासाठी. सचिन जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिस वरून संध्याकाळी परत आला तेव्हा पूर्ण चाळीत हि खबर पसरलीय हे दिसून आलं जो तो येईल तो त्याला विचारू लागला ' काय मग कोकणात का? येताना आंबे आणा हा. काही टवाळ मुलांनी तर सचिन दिसल्यावर ओरडायला चालू पण केलं ''येवा कोकण आपलोच असा''.. सचिन ह्या गोष्टीवरून मीना वर चिडला होता तिच्या पोटात एक गोष्ट राहत नाही त्याला चांगलं माहित होत. मीना ने सर्वांना सांगितलंय ह्यात काही वादच नव्हता.
अखेर तो दिवस उजाडला..
सचिन आणि मीना पहाटे उठले होते सर्व तयारी करून ते चाळीच्या गेट मधून बाहेर पडले काही शेजारी निरोप द्यायला आले उभे होते. सचिन ला खूप ऑकवर्ड वाटत होत पण मीना सर्व गोष्टीचा आनंद घेतेय हे त्याला कळत होत. चाळीतल्या एकाने टॅक्सि सुद्धा आणली होती. एकदाची गाडी चालू झाली. सचिन ने सुटकेचा श्वास सोडला आणि मीना कडे पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी भरल होत सचिन ला पहिल्यांदाच कळलं होत कि मीना इतकी भावनिक सुद्धा होते. नाहीतरी सचिन सोबत नेहमी भांडणारी मीना आज एकदम गप्प झाली होती सचिन ने तिची थट्टा करावी म्हणून तिला विचारलं आपण बाजूच्या दळवी काकींना घ्यायला पाहिजे होत नाही आपल्या सोबत? त्यावर मीना ने त्याच्या कडे थोडं रागाने बघितलं आणि तिला हसायला आलं. आता त्यांचा प्रवास चालू झाला.
दादर वरून त्यांची एक बस निघणार होती ९ वाजताची सकाळची. ते दोघे दादर ला उभे असताना एक छक्का त्यांच्या समोर येऊन उभा राहिला टाळ्या वाजवत पैसे मागू लागला. सचिन ने पैसे द्यायला नकार दिला.छक्का सचिन कडे बघत म्हणाला ''बीवी के साथ दूर जा राहा है थोडी दुआ लेके जा. सचिन ने कानाडोळा केला. तो छक्का नाकडोळे मुरडत निघून गेला. त्यांची बस आली दोघे रिझर्व्ह केलेल्या सीट वर बसले. गप्पा मारत मारत त्यांना झोप लागली कधी कळलं नाही ते दोघेही कोकणात तारकर्ली या गावात पोहचले तिकडे च त्यांना तो केअर टेकर कम टुरिस्ट गाईड भेटणार होता. रात्रीचे ९.३० झाले असतील त्याचा कुठेच पत्ता नव्हता बस निघून गेली. सचिन ने ट्रॅव्हल एजन्ट ला कॉल केला. त्याने सचिनला केअर टेकरचा नंबर आणि नाव एस एम एस केला. सचिन ने कॉन्टॅक्ट सेव्ह करून त्याला कॉल लावला सचिन च्या फोन ची बॅटरी फक्त १२% उरली होती. आणि मीनाचा फोन प्रवासात गाणी ऐकल्यामुळे स्विच ऑफ झाला होता देवाच्या दयेने केअर टेकर ला कॉल लागला. तो त्या ठिकाणीच आस पास होता असं तो सांगू लागला तो मागच्या बाजूने धावत आमच्या समोर येऊन उभा राहिला पंचविशीतला तरुण असेल तो सडपातळ असा. सचिन ने त्याला प्रश्न केला कारे एवढा वेळ का लावलास. तो म्हणाला ''मका ना त्या बाजूच्या देवळात देवीक नारळ फोडायचा असा. त आज आमावस्या ना. अस म्हणत त्याने सचिन च्या हातातली बॅग घेतली आणि पुढे चालत राहिला आणि त्याच्या पाठी हे दोघे. आता रस्त्यावरचा उजेड सम्पला होता आणि पुढच्या च्या मागे चालताना सचिनच्या आणि त्याच्या बायकोच्या लक्षातच आले नाही पायवाट अरुंद कधी झाली. आता फक्त पायांचा आवाज येत होता आणि रातकिडे मध्येच घाबरवायचा प्रयत्न करत होते. मीना ने सचिनचा हात घट्ट पकडला होता ती सचिन कडे पुटपुटत काहीतरी बोलली. सचिन ने थोडं तिच्या बोलण्याकडे लक्ष दिल ती म्हणाली हे असल पॅकेज कुठून मिळालं. सचिन हसत बोलला हे बघ इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाहीय. मस्त एन्जॉय कर सर्व. तिने त्याच्या कडे रागाने बघितलं. थोड्या वेळात ते तिघे एका सुंदर वाड्यासमोर आले वाड्यामध्ये दिवे नव्हते लागले. सचिन ने केअर टेकर ला त्याचविषयी विचारल असता त्याने सचिन ला लोड शेडींग च कारण पुढे केलं. सचिन च्या फोन ची बॅटरी आता फक्त ५ % होती. केअर टेकर ने त्या वाड्याचा टाळा खोलून दिला. तो म्हणाला ''तुम्ही आत जावा मी आलोच. सचिन ला वाटलं हा लघुशंकेसाठी झुडुपामागे जाईल आणि येईल कारण घर त्याला दाखवावं लागणार होत. आणि खर म्हणजे सचिन त्याला सांगणार होता कि आज रात्री तू सुद्धा इथेच रहा. पण मीना ने वाड्याच्या आत प्रवेश केला होता. सचिन सुद्धा मग तिच्या पाठोपाठ आत आला तिने समोरच असलेल्या एका जिन्यावरून वर चढण्यास सुरुवात केली. सचिन तिच्याकडे पाहतच राहिला. ती अशी वावरत होती जशी ती इथे राहतेय आधीपासून. सचिन तिच्या पाठोपाठ गेला. त्यांनी वरच्या रूम मध्ये सामान ठेवलं. ती सचिनला म्हणाली मी बाथरूम मधून फ्रेश होऊन येते. सचिन ने होकारार्थी मान डोलावली. ती गेली. सचिन समोरच असलेल्या एका पलन्गावर बसला त्याने खिशातून फोन काढला बॅटरी संपली होती फोन बंद झाला होता आणि इकडे चार्ज कसा करणार लाईट गेल्या होत्या. तेवढ्यात सचिन ला बाथरूम मधून गाण्याचा आवाज आला. हो तो आवाज मीनाचाच होता. सचिन ने त्याची खात्री करून घेतली. ''सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.. हे गाणं ती गात होती. ते गाणं आणि तो परिसर सर्व थोडं भयावह भासू लागलं होत. सचिन थोडा अस्वस्थ झाला.
तो घरामध्ये कुठे तरी बॅटरी असावी म्हणून तिच्या शोधात खाली गेला. त्याने खाली टेबल पाहिलं त्याच्या ड्रॉव्हर मध्ये तो शोधू लागला. तितक्यात वरून पैंजणाचा आवाज आला कोणीतरी खाली चालत येतंय त्याला समजल तो वर पाहू लागला. आणि वरून बॅटरीचा प्रकाशाचा झोत त्या पावलांसोबत खाली येत होता. सचिन च्या डोळ्यावर प्रकाश येत असल्यामुळे त्याला कोण आहे हे मात्र काही कळत नव्हतं त्याने कोण आहे असा आवाज दिल्यावर मीना ला हसू रोखता नाही आलं.
मीना खाली आली आणि सरळ स्वयंपाक घरात घुसली. सचिन स्तब्ध होऊन तिला पाहत होता. आता फक्त स्वयंपाक घरात उजेड होता पण सचिन ला आत जायची थोडी भीती वाटत होती. त्याने बाहेर उभं राहून आत डोकावलं आणि तो थक्क झाला. आज मीना ने काष्टी नववारी साडी नेसली होती. आणि तिने केस सुद्धा नेहमी पेक्षा वेगळे बांधलेले. सचिन ने तिला हळू आवाजात प्रश्न केला. ''तू काय करतेयस'' तिने मागे बघून त्याला सांगितलं' जेवण नको का खायला कि उपाशीच झोपायचं? सचिन ने तीच हे असं बोलणं नव्हतं पाहिलं कधी तो मनातल्या मनात बोलला जाऊ दे हि आपली मस्करी करतेय. सचिन विचार करत करत बाहेर आला त्याला कळत नव्हतं कि तो केअर टेकर आला होता तो असा कसा निघून गेला. त्याने बाहेर येऊन वाड्याच्या भोवती त्याला शोधण्यास सुरुवात केली. आणि चालत चालत तो स्वयंपाक घराच्या खिडकीपाशी आला खिडक्या काचेच्याच होत्या पण आत पडदा असल्यामुळे आतली फक्त सावली दिसत होती. तो खिडकी जवळ जाऊ लागला. पण त्याला कोण तरी कुरहाडीने काहीतरी तोडतय असा आवाज येऊ लागला त्याने स्वयंपाक घरातल्या सावलीकडे पाहिलं तर ती मीनाचा होती जी आत काहीतरी तोडत होती तो धावत वाड्याच्या आत प्रवेश करून स्वयंपाक घराच्या दिशेने गेला. त्याने तिला मोठ्याने विचारलं'' हे काय करते आहेस तिने मागे पाहिलं तिच्या तोंडावर रक्त होत आणि हात सुद्धा रक्तानं माखलेले तिने हसून त्याला पाहिलं आणि सौम्य शब्दात ती म्हणाली मटण बनवतेय कापायला नको? जा समोरच्या टेबलावर बसा थोड्याच वेळात जेवण होईल. सचिन ने प्रश्न केला पण इथे मटण कस आलं? तिने फ्रिज कडे बोट दाखवलं आणि पुन्हा मटण तोडण्यात गुंग झाली. सचिन बाहेर आला मनात त्याच्या प्रश्नांचं काहूर माजलेलं. त्याने विचार केला मीना ने कदाचित ट्रॅव्हल एजेंट ला सांगून हि सर्व व्यवस्था आधीच केली असावी असा हि तिला माहितेय तिच्या हातच मटण घरात खूप आवडत. केला असावा तिने बेत असा विचार करत तो स्वतःचीच समजूत काढत होता आणि त्याच्या शिवाय त्याच्याकडे काही पर्याय पण नव्हता...
अर्धा तास तो वाड्याच्या पायरी वर बसून विचार करत होता त्याने खिशातून एक सिगारेट काढली आणि पेटवणार तोच मीना ने हाक मारली ' अहो ऐकलं का?
या आता आत सिगारेट नका ओढू बर.. त्याने मागे पाहिलं त्याने विचार केला हिला कस कळलं मी सिगारेट पितोय? तो उठला त्याने सिगारेट खिशात ठेवली आणि
आत जाऊन टेबलवर बसला. तिने एका हातात बॅटरी आणि दुसऱ्या हातात जेवणाचं ताट असं आणलं होत. तीने ते सचिन समोर ठेवलं. आणि म्हणाली हा आता करा सुरु मी इथेच बसते मला सांगा कस झालय ते... तो थोडा गडबडला तिला म्हणाला अगं तू सुद्धा बस ना दोघे जेवूया. ती म्हणाली नको मी इथे बसून तुम्हाला हवा घालते . त्याने तिच्याशी हुज्जत न घालण्याच्या हेतूने ताट स्वतःजवळ घेतल आणि एक घास तोंडात घेतला. त्याला खूप आवडलं जेवण तो तिला म्हणाला अप्रतिम असं तू आधी का नाही केलंस कधी? मस्तच तुला आणल पाहिजे इकडे नेहमी असा म्हणून तो पुन्हा थांबला तिने पाण्याचा ग्लास त्याच्या समोर भरून ठेवला. मीना त्याला म्हणाली मी आत जाऊन स्वयंपाक घर आवरते तोवर तुम्ही जेवून घ्या मग आपण गप्पा मारू थोडी गाण्यांची मैफिल जमवू .. सचिन ने विचार केला हि कधी आज वर गाण्यांच्या भेंड्यात भाग न घेणारी क्क आज गाण्यांची मैफिल रंगवूया बोलतेय. त्याला आज अशचर्याचे धक्केच बसत होते त्याने त्याच जेवण उरकलं. तो पुन्हा एकदा स्वयंपाक घराच्या बाहेरूनच तिला बोलला ए खूपच मस्त केलेलं हा जेवण उद्यासाठी पण ठेव हा आपण उद्या हेच खाउयात तिने मान हलवली आणि त्याला एका जुन्या झोपाळ्याकडे बोट दाखवलं ती त्याला त्यावर जाऊन बस अशी खुणावत होती. तिने बॅटरीचा प्रकाश तिथे केला. त्या प्रकाशात सचिनला तो लाकडाचा जुना जाड साखळदंडाने बांधलेला झोपाळा दिसला त्याने तो थोडा साफ केला. तो त्यावर बसला आणि हलके हलके झोके घेऊ लागला. मस्त हवा लागत होती. पण मनात कुठे तरी त्याच्या भीती घर करून जात होती. तितक्यात त्याला गाण्याचा आवाज येऊ लागला मीना पुन्हा तेच गाणं बोलत होती आता तिचा आवाज वाढलेला. ''सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.. तुझेच मी गीत गात आहे.. अजुन ही वाटते मला की... अजून हि चांद रात आहे.
स्वयंपाक घरात तिचा आवाज जास्तच घुमत होता. ती आता हातात काहीतरी घेऊन सचिनच्या दिशेने गेली आज सचिन तिच्याकडे जास्त बघत नव्हता. तिने त्याच्याकडे पानाचा डब्बा उघडून त्याला पुढे केला. त्याने तिच्याकडे पाहिलं तिने हि पण खाल्लेलं त्याने तिला विचारलं अरे वा तू तर इकडचीच वाटतेयस ती हसली. सचिन ने पाण खाण्यास नकार दिला तो म्हणाला नको मला इचछा नाहीय. ती त्यावर त्याला म्हणाली मग चला ना गाणी बोलूया मस्त वातावरण आहे मैफिल रंगवूयात. सचिन ने घडल्याकडे बघितलं त्याला घड्याळातले काटे दिसत नव्हते. तरीही तो तिला म्हणाला आज नको प्लिज उद्या बोलूया का आज प्रवासात खूप दमायला झालाय तिचा चेहरा पडला ती म्हणाली मी वर जाऊन बिछाना करते हाक मरेन तेव्हा वरती या. तो तिला म्हणाला ठीकाय मी तोवर इथेच बसतो. ती वर छन छन पैंजणाचा आवाज करत गेली ती एवढ्या अंधारात एवढ्या विश्वासाने पायऱ्या चढत होती जश्या तिच्या रोजच्या. ती वर गेली तिने पुन्हा तेच गाणं चालू केलं इथे खाली सचिन ला मस्त हवा लागत होती आणि काय माहित त्या गाण्याने त्यावर काय जादू केलेली तो त्या झोपाळ्यात झोपून गेला.
सकाळ झाली सचिन ला जाग आली त्याने घडाळ्याकडे पहिले. घड्याळ कालच्या ९. ३० नंतर बंद झालं होत. त्याच लक्ष आता घरभर फिरू लागलं. घरात कोणत्याही देवाचा फोटो नव्हता. तो स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागला. स्वयंपाक घर स्वछ लखलखीत दिसत होत पण एक वास मन विचलित करत होता त्याने त्या वासाचा शोध घ्यायला चालू केलं त्याने खिडक्या खोलल्या आणि तिथला पंखा चालू करण्यासाठी बटण दाबल पण अद्याप विजेचा काही पत्ता नव्हता त्याला कळून चुकलं कि जोवर लाईट येत नाहीय तोवर मोबाईल चार्ज होऊ शकत नाहीय आणि जोपर्यंत मोबाईल चालू नाही तोपर्यंत तो कोणालाही कळवू शकत नाहीय तो कुठे अडकलाय. हाच विचार करत त्याने फीज चा दरवाजा खोलला आणि त्यात त्याने एका भल्या मोठ्यया ताटात मटणाचे मोठे मोठे तुकडे पहिले आणि त्याचाच वास घरभर पसरलाय हे लक्षात आलं. त्याने ते बाहेर काढलं सचिन ने एका हाताने नाक घट्ट पकडलं होत आणि दुसऱ्या हाताने त्याने त्या मटणाच ताट तो ते बाहेर फेकायला घेऊन जात असताना त्याच लक्ष त्या ताटातल्या एका मटणाच्या तुकड्याकडे गेलं. तो खूप घाबरला तो मटणाचा तुकडा चक्क एक माणसाची करंगळी होती. सचिन चे पाय लटपटायला लागले त्याच्या हातातून ते ताट खाली पडलं तो धावत बाहेर गेला. त्याला उलटी झाली. त्याला कळून चुकलेलं काळ रात्री आपण काय खाल्लं होत. आणि तेही आवडीने. त्याने मागे वाड्याकडे एक नजर टाकली. आणि पुढे वाट पहिली त्याने पुढचा मागचा काही विचार न करता धावत सुटला. तो धावत राहिला धावत धावत खूप लांब आला होता. आजूबाजूला त्याने द्रुष्टी टाकली. तर सर्व जंगलचं दिसलं तो थोडा अजून धावला आता मात्र तो धापा टाकू लागला. त्याने विचार केला काल रात्री तर आपण १५ मिनिटामध्ये पोहोचलो होतो. त्यानं त्याचा प्रयत्न थांबवला नाही. तो दुसरीकडे कुठे वाट भेटतेय का शोधू लागला. आणि त्याच्या मनात आलं अरे आपण हे काय करतोय तिथे मीना अडकलीय आणि आपण तिला सोडून असं कस जाऊ शकतो. तो थोडा थांबला आणि त्याने परतीची वाट धरली आल्या वाटेने तो पुन्हा मागे जाऊ लागला. आता वाद हळू हळू दिसत होता. वाड्याच्या वरच्या व्हरांड्यात कोणतरी थांबलय त्याला धुरकट दिसत होत. त्याला माहिती होत ती मीना आहे ती त्याच्या वाटेकडे ताक लावून बसलेली. त्याने वाड्यात प्रवेश केला. मीना खाली आली. तिने त्याला प्रश्न केला कुठे होतात. सचिन ने दमलेल्या स्वरात उत्तर दिल फेरफटका मारायला गेलेलो. तिने सचिन ला विचारल दमला असाल ना काय बनवू आज भूक लागली असेल ना. सचिन तिला म्हणाला मटण सोडून काहीही माझी ना तब्बेत बिघडली आहे. तर पालेभाजी काहीही असेल ती कर.. ती हसली तिने त्याला विचारलं का हो काल तर मोठ्या आवडीने खात होता. हो पण आता नकोय म्हणत तो झोपाळ्या जवळ गेला ती त्याला म्हणाली अंघोळी साठी पाणी काढलय जा करून घ्या तोवर मी भाजी आणते अशी म्हणत ती दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागली. त्याने तिला विचारलं ''तू कुठून आणणार इथे लांब लांबवर काहीच नाही एक काम कर तू तयारी कर आपण निघूया... तिला राग आला ती त्याला म्हणाली अजून तर आपण गाणी पण नाही गायली. मी नाही येणार कुठे आणि तुम्ही कुठे जाऊ शकत नाहीय. गप्प वर जा आणि अंघोळ उरकून या. ती निघून गेली. सचिन वर अंघोळी साठी गेला . त्याने बाथरूम च्या छोट्याशा खिडकीतून पाहिलं मीना समोरच्या शतच्या इथे काहीतरी गोळा करतेय. ती अशाप्रकारे राहतेय जशी ती इथेच होती. त्याने पाणी कस बस अंगावर ओतलं आणि खाली आला तो समोर असलेल्या कपाटामध्ये काहीतरी शोधू लागला त्याला कपाटाच्या वर एक फार जुना फोटो भेटला आणि एक जुना पेपर मिळाला त्यात ९० च्या शतकातल्या बातम्या होत्या. त्याने त्या फोटो वरची धूळ साफ केली. ज्या प्रकारे मीना पेहराव करायला लागलीय तशीच एक बाई त्या फोटोत हसत होती आणि तिच्या बाजूला एक माणूस जो बहुतेक तिचा नवरा असावा. तेवढ्यात त्याला पावलांचा आवाज आला त्याने सर्व वस्तू होत्या ताशा ठेवल्या आणि समोरच्या टेबलावर जाऊन बसला. ती आत आली ती सचिन कडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. तिने जेवण बनवले सचिन ने ते मुकाट्याने खाल्ले. घरात भयाण शांतता पसरली होती. तिने विचारलं चला आता मस्त गाणी बोलूयात. सचिन शांत पने उठला तो झोपाळ्यावर जाऊन बसला. ती स्वयंपाक घरात गेली ती भलतीच खुश दिसत होती. सचिन च्या मनात प्रश्नांचं काहूर माजलेलं तो ताडकन झोपाळ्यातून उठला तो तडाखा स्वयंपाक घराच्या दिशेने गेला आणि मोठ्या आवाजात त्याने तिला विचारलं कोण आहेस तू? आणि तुला काय हवाय माझ्याकडून. ती हासत म्हणाली अहो असं काय करताय मी मीना विसरला का मला कि आता नवीन मस्करी सुचली. तो हतबल झाला गुढग्यावर बसला तिला म्हणाला हे बघ तू जी कोण असशील ना आमहाला कृपा करून सोड मला मुंबईला कमला पण जायचंय गावी माझी आई एकटी आहे. आम्हाला असं अडकवून काय मिळणार तुला. तिने त्याच्याकडे शांत पणे पाहिलं ती त्याच्या जवळ आली त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली चला उठा आपल्याला गाण्याची मैफिल रंगवायचीय ती जाऊन झोपाळ्यावर बसली. झोपाळ्याचा आवाज कर्रर्रर्र कर्रर्रर्र येत होता आणि त्यात ती अडकित्त्याने सुपार्या तोडत होती. सचिन निमूटपणे उठला. तिने तीच गुणगुणं चालूच ठेवलेलं. सचिन झोपाळ्यात जाऊन बसला आता पुन्हा झोपाळा कर्रर्रर्र कर्रर्रर्र करत हलू लागला. संध्याकाळची मावळण्याची सुरुवात झाली होती. ती सुपारी तोडायची थांबली आणि म्हणाली.
सा रे ग म प ध नि सा ... हा सा आला तुमच्यावर चला गाणं बोला पाहू.
भाग २

सचिन तिला घाबरतच म्हणाला मला कोणतही गाणं येत नाही. तिने त्याच्याकडं एक कटाक्ष टाकून हातातला अडकित्ता बाजूला ठेवला आणि झोपाळ्यातून खाली उतरून समोरच्या खोली मध्ये गेली. इकडे सचिन ची नजर त्या खोलीवर खिळली होती. थोड्याच वेळात ती हातामध्ये काहीतरी घेऊन बाहेर आली तिने ते बाहेर येऊन जमिनीवर ठेवलं काहीतरी कपड्यात गुंडाळलेल तिने त्या कपड्याची गाठ सोडली आणि त्यातून जुनाट असा हार्मोनिअम बाहेर काढला त्याला ती फार प्रेमाने पुसू लागली. नंतर तिने हार्मोनियम वर थोडी बोट चालवून चालतोय कि नाही ते बघितलं सचिन ला कळतच नव्हतं ती आता पुढे काय करणार आहे. तिने सचिन कडे एकदा बघितलं आणि हसली. तिने आता पुढचं वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यासोबत तिचे सूर जुळू लागले घरामधली भयाण शांततेचे रूपांतर आता आल्हादायक होऊ लागल्याचा सचिन ला भासू लागलं. सचिन सुद्धा तिच्या गाण्यात गुंग होऊन गेला तो आता झोपाळ्यात अगदी थाटात बसला होता आणि त्याच्या नजरेत आता तिच्या कडे बघताना प्रेम दिसू लागल होत गाणं संपताच सचिन झोपाळ्यातून उठला तो तिच्या जवळ गेला तिने सुद्धा पानाचा विडा त्याच्या समोर केला त्याने तो घेतला आणि तोंडात ठेवत तिला हात देऊन उभं राहण्यास खुणावलं दोघेही चालत बाल्कनीमध्ये गेले बाहेर चंद्राचा लक्ख प्रकाश होता पौर्णिमा होती कदाचित तो तिच्या हातात हात ठेवून उभा होता तिने त्याच्या कडे प्रेमाने डोळ्यात बघत विचारलं खूप वेळ लावलात आज! लवकर यायला काय झालेलं... तीच वाक्य संपेपर्यंत तो तिचा रुसवा दूर करत म्हणाला ''अग अशी का रुसते तुझ्या साठी तर एवढ्या लांब आलोय सर्वांचा विरोध केलाय फक्त तुला भेटण्याची आस मनात असते नेहमी आणि तुझ्या आवाजाच्या दिशेने तर मी स्वतः खेचला जातो. ती आता त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या मिठीत जाणार तोच खाली अंगणात घोड्यांच्या खिदळण्याचा आवाज आला दोघांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. खाली एक टांगा उभा झाला होता त्यातून एक बाई खाली उतरली आणि उतरून बाल्कनी कडे बघू लागली सचिन खाली बघून काहीतरी रागात बडबडू लागला त्याने समोरचा कंदील उचलला आणि जिना उतरून मुख्य दरवाजाकडे जाऊ लागला त्याने कोपऱ्यात असलेली कुर्हाड हातात घेतली आणि रागात दरवाजा खोलून अंगणाच्या दिशेने चालत गेला. आणि समोर जेव्हा त्याच लक्ष गेलं तेव्हा समोर काहीच नव्हतं तो स्तब्ध झाला त्याने वर पाहिलं बाल्कनी मध्ये ती नजर रोखून सचिन कडे पाहत होती. सचिन काहीच कळत नव्हतं. तिने गाणं चालू केलं हळू आवाजात ल गाणं स्पष्ट त्याला खाली ऐकू येत होत पण सचिन आता मात्र प्रभावित नाही झाला. तिला गाणं बोलत बोलत आत निघून गेली. सचिन ला आत जायची हिम्मत काही होत नव्हती. तो समोरच असलेल्या दगडावर बसून विचार करू लागला. थोड्याच वेळात त्याला एका गोष्टीचा सुगावा लागला तो जेव्हा वाड्यातून बाहेर अंगणात आला तेव्हा चंद्र प्रकाशामुळे अंगणात वाड्याची सावली जिथं वर होती तिथवर तीच साम्राज्य असावं बहुतेक कारण ज्यावेळी तो वरून खाली आला तेव्हा त्याच्या डोळ्यात राग होता आणि वाड्याच्या सावलीतून त्याला तो टांगा आणि ती दुसरी बाई दिसली आणि सावली च्या बाहेर येताच तो सर्वातून बाहेर आला होता. त्याला आता मीना ला कसाही करून बाहेर आणायचं होत कारण तिथे आल्या पासून मीना एकदाही बाहेर आलेली नाहीय आणि आली तरी वाड्याच्या सावलीतच ती फिरते. आता त्या पुरत कळून चुकलेलं कि मीनाला बाहेर आणण म्हणजे वाडयाच्या सावलीतून बाहेर काढणं हाच एक उपाय...
पहाट झाली तरी साची तिथंच बसून राहिला होता.
आता सचिन धीर करून वाडयाच्या दरवाजातून आत गेला. आतल्या खोलीत त्याने प्रवेष केला. त्याने थोडाही आवाज न करता एका छोट्याशा टेबलावर चालून कपाटावरील दोन जुनाट पेट्या खाली घेतल्या. त्यामध्ये तो काहीतरी शोधू लागला. त्यात एका बाईचे जुने फोटो होते. तिच्या काही कविता काही पत्र त्याच्या हाती लागली. सर्व काही वाचताना त्याच्या लक्षात आलं होत जी बाई मीना वर हावी झाली आहे तीच नाव मालती, तिचा आवाज तिच्या आईप्रमाणेच गोड असल्यामुळे ती सुद्धा आईसारखीच या क्षेत्रात आली होती पंडित रवीचंद्र कुल्कर्ण्यांकडे ती रियाझ करत असे.आणि आई गेल्यानंतर तिने त्यांनाच आपला आधार मानलं होत. मालतीचा आवाज चांगला असल्यामुळे तिला नामांकित पारितोषक मिळालेली होती. एका गाण्याच्या कार्यक्रमात तिच्या भेटीला आलेले जहागीरदार चंद्रभान विखे पाटील तिच्या सोन्दर्यावर आणि तिच्या आवाजावर मंत्रमुग्ध झाले असावेत कारण काही पुढची पत्र सचिन ला मिळाले त्यात आणि काही डायरीत लिहिलेल्या मजकुरातून दोघांमध्ये वाढलेलं संबंध कळून येत होते. पण त्यांचं लग्न मात्र होऊ शकलं नाही कारण चंद्रभान पाटलांचं लग्न आधीच झालं होत आणि त्यांना २ मूल सुद्धा होती. चंद्रभान पाटील मालतीशी लग्न करायला तयार होते पण पुढे हळू हळू त्यांची प्रकृती गंभीर झाल्याविषयी पात्रातून उल्लेख झाला आणि कर्क रोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. इकडे मालतीने गाणं गायचं बंद केलं असावं कदाचित काहीच काळात याच वाड्यात तिचा मृतदेह आढळला अशी बातमी असलेला पेपर सचिन ने चाळला आणि त्याला आता सर्व सत्य कळलं होत तो आता सर्व आटपणार तोच त्याला जिन्यावरून कोण्ही तरी खाली येतंय असं आवाजावरून समजलं तो पेटी उचलणार तोच ती आत आली तिने त्याच्या कडे रागाने बघितलं. तो तिच्याकडे न बघतच समान वर ठेवू लागला आणि नजर चुकवतच बाहेर निघून गेला . ती बाहेर आली स्वयंपाक घरात जाऊन तिने त्याला चहा पिणार का अस विचारलं सचिन नको म्हणत पुन्हा वाड्याबाहेर गेला.
तो बाहेर पुन्हा त्याच दगडावर बसून मीना ला या वाड्याबाहेर कसं आणायचं हा बेत आखू लागला. त्याच लक्ष वाड्याच्या सावलीवर होत त्याला काहीही करून मीना ला वाड्याच्या सावलीपासून दूर आणायचं होत. तो आता वाड्यामध्ये मध्ये गेला तिच्या जवळ जाऊन म्हणाला आज पुन्हा मैफिल रंगवूया का? तिच्या तोंडावर आनंद दिसून आला. तिने हसून मान डोलावली. सचिन त्यावर युक्ती वाद करत म्हणाला आपण आज ना बाहेर अंगणात मैफिल रंगवूयात. त्यावर तिने एक भुवई उंचावत त्याच्याकडे बघत म्हणाली '' बाहेर कशाला इकडे झोपाळ्यावर तुम्ही छान दिसता एखाद्या राजाप्रमाणे आणि मी खाली बसून नेहमी प्रमाणे गाणं गाईन. सचिन त्यावर बोलला ठीक आहे पण आज मस्त हवा आहे आणि बाहेर झोपळयाची व्यवस्था करू कि आपण. ती त्यावर सचिन ला म्हणाली ठीक आहे मी वाड्याच्या पायऱ्यांवर बसेन आणि तुम्ही बसा मग झोपाळ्यात. सचिन थोडा हताश झाला पण त्याच्या कडे थोडी शी आशा होती कि अंगणात नाही तरी काय झालं पायरी पर्यंत तरी यायला तयार झाली या गोष्टीने तो सुखावला.
हळू हळू दिवस मावळून गेला. आता संध्याकाळचे ७ वाजले असतील. सचिन वाड्याच्या बाहेर पायऱ्यांवर जाऊन बसला. आणि तिला आवाज दिला '' मालती
येतेयस ना बाहेर मी वाट बघतोय. आतून ती बाहेर आली आज तिने नेहमीपेक्षा जास्त च शृंगार केला होता. तिने हार्मोनियम बाहेर आणला ती पायरीवर बसली. तिने आज काहीतरी पिण्यासाठी आणलं होत ते तिने सचिन च्या हातात दिल. आणि सचिन ला म्हणाली आज लवकरच आलात. सचिन म्हणाला हो तुझ्या आवाजाने खेचून आणल मला नेहमी सारखच. ति गाणं गायला सुरुवात करणार तोच सचिन तिला थांबवत म्हणाला. थांब हा मालती आज काहीतरी कमी दिसतेय तुझ्यामध्ये. ती म्हणाली अय्या हो मी आज गजराचा नाही माळलाय. सचिन जागेवरून उठला आणि अंगणात चालू लागला ती त्याच्याकडे नजर रोखून बघत होती.
तो आता वाड्याच्या सावलीतून थोडा पुढे आला होता तो तिथून तिच्याशी संवाद साधत बोलला इथे ना मस्त जास्वदींचं फुल उमललय मी आणतो तुझ्या केसात माळायला तिच्या डोळ्यात आनंद दिसू लागला. तिला जास्वंदीचं फुल खूप आवडत हे त्याला तिच्या डायरीमध्ये असलेल्या सुकलेल्या फुलं वरून समजलं होत.
आता सचिन एका झुडुपासमोर उभा राहून फुल तोडण्याचा हावभाव करू लागला ती सर्व पायरीवर बसून पाहत होती, आणि सचिन जोरात किंचाळला आणि खाली पडला. त्याला पाहून मालती धावत त्याच्या दिशेने निघाली आणि सावली बाहेर पाय पडताच मीना जमिनीवर आदळली सचिन ने क्षणाचा विलंब न करता मीना ला चंद्र प्रकाशात खेचलं. मीना शुद्धीवर नव्हती. त्याच लक्ष वाड्याकडे गेलं. आतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आदळआपट करण्याचा आवाज येऊ लागला.
सचिन मीनाचा डोकं मांडीवर ठेव सर्व प्रकार शांतपाने बघत होता. नंतर वयातून विनवणी चे आवाज येऊ लागले ती त्याला आत येण्यासाठी विनवणी करू लागली. ती कळवळून रडू लागली. तिचा आवाज भेसूर होत चालला होता. हळू हळू पहाटेच्या उजेडात तिचा आवाज विरत गेला आणि इथे मीना शुद्धीवर आली.
त्याने घडला प्रकार मीनाला सांगितला. त्या दोघांनी परतीची वाट धरली.. काही अंतर चालत असताना त्याने मागे वळून पाहिलं त्या बाल्कनीत कोणतरी उभ असल्याचं भासत होत पण ती काळी आकृती स्पष्ट होत नव्हती. हळू आवाजात एक गाणं मात्र कानावर पडत होत. ''सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही....

Comments