अंगणातला गुलमोहर

आजोबांनी लावलं होत गुलमोहरच झाड माझ्यासोबत होत होती त्याची सुद्धा वाढ लहानपण गेलं त्याच्यासोबत खेळताना आजोबाच होते जणू अंगा खांद्यावर झेलताना परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास त्यानेच घेतला पास झाल्याचा आनंद त्याच्याही सोबत वाटला लपाछुपी खेळताना लपायचो त्याच्या कुशीत कोणालाही उलगडल नव्हतं आम्हा दोघांचं गुपित कधी बनवायचो शिवाजी कधी मी टिपू सुलतान गुलमोहराच्या शेंग होती तलवार खूप युद्ध करायचो संपून जायचा रविवार ती विरंगुळ्याची होती माझी जागा दोघांमध्ये होता मैत्रीचा एक धागा घालवले होते तिथे कित्तेक क्षण रडायचो, हसायचो करायचो हलके मन त्याच्या सावलीखाली रंगायच्या मोठ्यांच्या सुद्धा गप्पा ते सुद्धा भावुक होऊन खोलायचे आठवणींचा कप्पा रात्रीच्या अंधारातला चंद्र झाडामुळेच सुंदर वाटत होता त्याच्या मोठे पणामुळे चंद्र सुद्धा झाला होता छोटा रोज त्याच्यामुळे पडायचा अंगणात लाल फुलांचा सडा दुरून दिसायचा जसा गालिचाच अंथरला त्याने नव्हती पहिली कधी जात आणि धर्म फक्त सावली देणे होते त्याचे कर्म नव्हता त्याच्या फुलांना कधी सुगंधी वास पण फुलांनीच केले होते ...