बस स्टोप
बस स्टोप
-----------------------------------------------------------
होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास
बोलता बोलता वेळ पडायचा कमी
शब्दांना पुरून उरायच्या आठवणी
होता एक बस स्टॉप
त्याची सावली, त्याचा आडोसा,
त्याच्यामुळेच नात्यामध्ये होता भरोसा
कित्तेकदा भांडलो त्याच्या समोर
जणू उभे होतो दोघे आरश्या समोर
होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास...
त्याखालीच किती घेतल्या शपथा
मनापासून बोललो होतो न थकता
आमच्यामुळेच फुलपाखरे तिथे जमू लागली
बस स्टोप देखील बस सुसाट जाऊ लागली
होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास...
ती गेल्यानंतर ही जाऊन बसलो तिथेच तासन तास
दुसर्या जोडप्यांना पाहून रडलो होतो एकांतात
सर्व फुलपाखरे आज होती जोडीने
मीच एकटा स्तब्ध होतो ती येण्याच्या ओढीने
कारण, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास...
थंड पडलेल्या बस स्टोप वर हात ठेवला जेव्हा
इथेच का ती उभी होती स्पर्श झाला तेव्हा
उधळलेल्या आठवणी उधळावा जसा घोडा
मरत होतो तिच्यामुळेच रोज थोडा थोडा
कारण, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास...
इथेच ती वाट पाहायची माझी
बसून राहायची तासन तास
मी दिसता क्षणी डोळ्यानेच बोलायची
आत्ता मात्र इथेच बास
होता एक बस स्टॉप
रुसवा फुगवा काढला त्याच्याच समोर
तिला हसवण्यासाठी बनायचो मी जोकर
कारण होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास..
आज त्याला मोडलं होत
कबुतरांपासून त्यांचं झाडच हिरावल होत
आता तिथे थांबतात फक्त प्रवासी बस साठी
फुलपाखरे कधीच उडाली नवीन आश्रयासाठी
खरंच, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास....
---------------------------------------------
- राजन गायकवाड
तिथे घालवायचो कित्तेक तास
बोलता बोलता वेळ पडायचा कमी
शब्दांना पुरून उरायच्या आठवणी
होता एक बस स्टॉप
त्याची सावली, त्याचा आडोसा,
त्याच्यामुळेच नात्यामध्ये होता भरोसा
कित्तेकदा भांडलो त्याच्या समोर
जणू उभे होतो दोघे आरश्या समोर
होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास...
त्याखालीच किती घेतल्या शपथा
मनापासून बोललो होतो न थकता
आमच्यामुळेच फुलपाखरे तिथे जमू लागली
बस स्टोप देखील बस सुसाट जाऊ लागली
होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास...
ती गेल्यानंतर ही जाऊन बसलो तिथेच तासन तास
दुसर्या जोडप्यांना पाहून रडलो होतो एकांतात
सर्व फुलपाखरे आज होती जोडीने
मीच एकटा स्तब्ध होतो ती येण्याच्या ओढीने
कारण, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास...
थंड पडलेल्या बस स्टोप वर हात ठेवला जेव्हा
इथेच का ती उभी होती स्पर्श झाला तेव्हा
उधळलेल्या आठवणी उधळावा जसा घोडा
मरत होतो तिच्यामुळेच रोज थोडा थोडा
कारण, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास...
इथेच ती वाट पाहायची माझी
बसून राहायची तासन तास
मी दिसता क्षणी डोळ्यानेच बोलायची
आत्ता मात्र इथेच बास
होता एक बस स्टॉप
रुसवा फुगवा काढला त्याच्याच समोर
तिला हसवण्यासाठी बनायचो मी जोकर
कारण होता एक बस स्टॉप
तिथे घालवायचो कित्तेक तास..
आज त्याला मोडलं होत
कबुतरांपासून त्यांचं झाडच हिरावल होत
आता तिथे थांबतात फक्त प्रवासी बस साठी
फुलपाखरे कधीच उडाली नवीन आश्रयासाठी
खरंच, होता एक बस स्टॉप
घालवले होते तिथे कित्तेक तास....
---------------------------------------------
- राजन गायकवाड
Comments