Posts

भुताटकी कथा

पिंजरा  मुंबई मध्ये जॉब लागल्यामुळे सुरेश ला गावापासून लांब राहावं लागणार होत. त्याने हा जॉब मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याने त्या परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करून हि नोकरी मिळवली. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि एक बहीण होती वडील लहानपनीच देवाघरी गेल्यामुळे आई ने त्याचा व त्याच्या बहिणीचा सांभाळ केला. सुरेश दिसायला सावळा असला तरी उंचपुरा आणि दिसायला चांगल व्यक्तिमत्व होत. घरचे खूप खुश होते. सुरेश ने रात्री ११ ची गाडी बस स्टॅन्ड वरून पकडली आणि त्याने मुंबईचा प्रवास चालू केला. दुसऱ्यादिवशी कामात रुजू व्हायचं असल्यामुळे त्याने गाडीतच आपली झोप पूर्ण करून घेतली आणि सकाळी ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेल वर जाऊन पोचला. त्याचे मामा मुंबई ला असल्या मुले त्याच अधून मधून येऊन जाऊन व्हायच त्यामुळे त्याला मुंबईची सर्व कल्पना होती आणि असंही त्याचा मामा चाळीतील १० बाय १० च्या रूम मध्ये त्याच्या फॅमिली सोबत राहायचा त्यामुळे सुरेश ने हॉटेल मध्ये तात्पुरती राहून नंतर लवकरच भाड्याने एखादी रूम घेऊन आई आणि बहिणीला पण तिकडे नेण्याचा निर्णय घेतला होता. ...

अंगणातला गुलमोहर

Image
आजोबांनी लावलं होत गुलमोहरच झाड माझ्यासोबत होत होती त्याची सुद्धा वाढ लहानपण गेलं त्याच्यासोबत खेळताना आजोबाच होते जणू अंगा खांद्यावर झेलताना परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास त्यानेच घेतला पास झाल्याचा आनंद त्याच्याही सोबत वाटला लपाछुपी खेळताना लपायचो त्याच्या कुशीत कोणालाही उलगडल नव्हतं आम्हा दोघांचं गुपित कधी बनवायचो शिवाजी कधी मी टिपू सुलतान गुलमोहराच्या शेंग होती तलवार खूप युद्ध करायचो संपून जायचा रविवार ती विरंगुळ्याची होती माझी जागा दोघांमध्ये होता मैत्रीचा एक धागा घालवले होते तिथे कित्तेक क्षण रडायचो, हसायचो करायचो हलके मन त्याच्या सावलीखाली रंगायच्या मोठ्यांच्या सुद्धा गप्पा ते सुद्धा भावुक होऊन खोलायचे आठवणींचा कप्पा रात्रीच्या अंधारातला चंद्र झाडामुळेच सुंदर वाटत होता त्याच्या मोठे पणामुळे चंद्र सुद्धा झाला होता छोटा रोज त्याच्यामुळे पडायचा अंगणात लाल फुलांचा सडा दुरून दिसायचा जसा गालिचाच अंथरला त्याने नव्हती पहिली कधी जात आणि धर्म फक्त सावली देणे होते त्याचे कर्म नव्हता त्याच्या फुलांना कधी सुगंधी वास पण फुलांनीच केले होते ...

बस स्टोप

Image
बस स्टोप ----------------------------------------------------------- होता एक बस स्टॉप  तिथे घालवायचो कित्तेक तास बोलता बोलता वेळ पडायचा कमी शब्दांना पुरून उरायच्या आठवणी होता एक बस स्टॉप  त्याची सावली, त्याचा आडोसा, त्याच्यामुळेच नात्यामध्ये होता भरोसा कित्तेकदा भांडलो त्याच्या समोर जणू उभे होतो दोघे आरश्या समोर होता एक बस स्टॉप  तिथे घालवायचो कित्तेक तास... त्याखालीच किती घेतल्या शपथा मनापासून बोललो होतो न थकता आमच्यामुळेच फुलपाखरे तिथे जमू लागली बस स्टोप देखील बस सुसाट जाऊ लागली होता एक बस स्टॉप  तिथे घालवायचो कित्तेक तास... ती गेल्यानंतर ही जाऊन बसलो तिथेच तासन तास दुसर्या जोडप्यांना पाहून रडलो होतो एकांतात सर्व फुलपाखरे आज होती जोडीने मीच एकटा स्तब्ध होतो ती येण्याच्या ओढीने कारण, होता एक बस स्टॉप  घालवले होते तिथे कित्तेक तास... थंड पडलेल्या बस स्टोप वर हात ठेवला जेव्हा इथेच का ती उभी होती स्पर्श झाला तेव्हा उधळलेल्या आठवणी उधळावा जसा घोडा मरत होतो तिच्यामुळेच रोज थोडा थोडा कारण, होता एक बस स्टॉप  घालवले ...