सर्वांना हूर हूर लागून राहिलीय आता काय घडणार याची... तितक्यात सर्वात आधी ज्याने तिला जवळून बघितले होते तोच तो आडदांड माणूस अचानक हळू हळू गाडीच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो आधी हळू हळू पुट पुटत होता. नंतर त्याचा आवाज वाढू लागला तो त्या हाडळीच वर्णनच जणू करत होता, त्याचा आवाज थोडा बाई सारखा येऊ लागला होता त्याने केलेलं वर्णन जास्तच भयानक वाटू लागलं. घडायला १२ चा प्रहर झाला होता तो आता मोठमोठ्याने बोलू लागला. ''पुनवेच्या रातीला, घाटामधल्या वाटला'' यल ती साथीला, घेऊ नगा आत तिला... हसत हसत बगल ती, यड वंगाळ वागलं ती, तिच्या नजरमंदी हाय रातीची धुंदी रात आज तिचीच हाय इसरू नगा ... येशीपाशी बस्तीय ती, झाडामाग दडलीय ती, कावळ बी आल्यात आज तिच्या साथीला तुमच्या बिगर जाणार नाय आज इथंच हाय वस्तीला हडळ हाय ती हडळ, कधीबी नजरेला पडलं, बघू नगा तिच्याकडं समद ईपरीत घडलं... असं म्हणत म्हणत तो आडदांड माणूस गाडीपाशी जाऊन उभा राहिला कावळ्यांची काव काव थांबली होती जेव्हा ह्याच हाडळीचा वर्णन चालू झालं होत. तो माणूस आता गाडीच्या शेवटच्या खिडकी कडे उभा होता. तो तिची आतुरते...
Comments