स्तब्ध शब्द

स्तब्ध शब्द 



एकदा शांत डोळे झाकले 
तर अचानक विचारांचा पूर आला 
शब्द सुदधा प्रवाहाने वाहू लागले 
त्यांच्या नात्याला छान यमक आला
शब्दाने शब्दाचे हात घट्ट पकडले
आणि वाहू लागले प्रवाहाच्या विरोधाला
अटी आणि नियमाचे तोडून टाळे
लागले तेही बंड करायला
बंड पाहून शब्दांचा प्रवाह संतापला
विचारांना आळा घालायचा बेत मोठा झाला
रूढी आणि परंपरेने विचारांवर घातला घाला
शब्दांना कळेना आता स्वातंत्र म्हणतात कशाला
प्रवाहाने पेटवली होती शब्दांची होळी
विचारांना हि दिली होती अंधारी खोली
शब्दांनी विचाराला पुन्हा नवीन आशा दिली
पेटणाऱ्या शब्दांनीच लढण्याची दिशा दिली


----------------------------------------------
राजन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)