प्रवास

पुन्हा एकदा घडेल का तोच प्रवास
कागदाच्या होडीत बसून स्वप्नांचा लागेल का ध्यास?
चंद्र आता सुद्धा झाडामागे लपेल का
झोप तर आता सुद्धा नाही लागत चंद्र पुन्हा मामा बनेल का?

पुन्हा एकदा दिसेल का तीच आमराई
मित्रांसोबत शर्यत लागून कैऱ्या तोडायची होईल का घाई
पुन्हा एकदा मित्रांनी भरेल का तेच अंगण
सुरपारंब्यांच्या त्याच डावासाठी पडेल का आता रिंगण

पुन्हा एकदा मांडता येईल का भातुकलीचा तोच खेळ
बाहुला बाहुलीच्या लगीन घाईत निघून जाईल का तसाच वेळ
वरातीत नाचता नाचता दुखतील का पाय आतासुद्धा?
बाहुला खूप पुढे निघून आलाय तीच वरात पुन्हा मिळेल का राहिलाय मुद्दा

पुन्हा एकदा चढेल का तारुण्याचं तेच वलयं
रुबाबात आरश्यासमोर उभं राहून डोळ्यात नसेल ना कसलंच भय
आता सुद्धा तेच प्रतिबिंब आरशात मला दिसेल का?
आणि पुन्हा एकदा धावण्यासाठी उभं राहण्याची जिद्द मिळेल का?

आता पुन्हा एकदा तयार झालॊय पुढच्या प्रवासासाठी
कागदाची नसली तरी होडी मात्रं सजलीय मला नेण्यासाठी
खूप आस लागलीय हा एकटेपणा संपवून सर्वांच्या भेटीची
पुन्हा नवीन खेळ मांडायचाय माहितेय मला सर्व थांबलेत मित्र माझ्याच साठी...


------------------------------------------------------------------------------------
राजन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)