यात माझी काय चूक..

गळा दाटून येतोय माझा
पण रडू मी शकत नाही
बोचणाऱ्या नजरा आता मला
काहीच विसरू देत नाही

कपडे तर कधीच फाटले माझे
लक्तर मांडले मी खांद्यावर माझ्याच ओझे
खूप होती माझ्याकडे हि सहनशक्ती
पण आता दाद मागायचीच वाटते भीती

गिधाडांनी लचके तोडत
चामडी माझी लोळवली
बांधली नसेल त्यांनाही कोणी राखी
त्यामुळेच त्यांनी दुसऱ्याची मळवली

ऐकलं होत शिकार फक्त जंगलात होते
शहरातसुद्धा आता भक्षकांची टोळी फिरते
सावज दिसताच सैतानाची नजर मात्र खिळते
आता कळतंय मला आईला माझ्या हुरहूर का लागते

माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा
एकाच क्षणात सर्व मिळाल्या ना धुळीला
उभं राहायचं होत मलाही स्वप्न पूर्ण करायला
पण खरंच बोचणारे शब्द तेही लागलेत तोडायला

काय होती चूक माझी घडल्या प्रकारात
आज हि अविचारी माझ्यावरच का भुंकतात
मदत नको मला हवी सर्वांची साथ
अभिमानाने पुन्हा जगू द्या मला हि समाजात

---------------------------------------
राजन गायकवाड 

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)