ओन्ली राजे...

ओन्ली राजे...

शब्दाला धार आणि तलवारीने वार
नाद करायचा नाय गड्या पडशील गपगार
किती पण लढा कितीपण रहा उभे
सातार च्या सत्तेवर असणार ओन्ली राजे.

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

असू द्या अब कि बार, कोणतीही सरकार
साताऱ्यात होणार फक्त राजेंचा जयजयकार
किती पण असुद्या राजकारण, किती पण टाका तिढे
साताऱ्याच्या सत्तेवर असणार कायम ओन्ली राजे.

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

गरिबांच्या ताटात जेवतो, आहे गरिबांचा वाली
जो देईल त्यांना त्रास त्याची राहणार नाही सावली
कितीपण असू द्या भक्षक, साताऱ्याचा आहे एकच रक्षक
उदयन राजे म्हणतात त्यांना असू द्या तुमच्या लक्षात

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

साताऱ्याच्या वाघाचा एकच आहे वादा
वाटेला कधी गेला तर दाखवेल त्याची जागा
कितीपण असू द्या कोल्हे आणि असू द्या पिसाळलेले कुत्रे
ज्याच्या डरकाळीने पळतात सर्व, ते आहेत ओन्ली राजे.

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

विजेचा फटका आणि कॉलर ला झटका
भाषण करताना शब्दाचा असतो मोठा दणका
कितीही दाखवा कमळ आणि कितीपण लावा इंजिन
ओन्ली राजेच आता चेक मेट देणार कामाचा नाय वजीर

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

शिवरायांची आण आणि आमच्या राज्याची शान
साताऱ्यात आज आहे फक्त दोघांनाच मोठा मान
कितीही असतील तारे आणि कोणाचेही वाहू दे वारे
अजिंक्य तारा दुसरा आहे, पहिला तारा ओन्ली राजे...

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर

राज्यांचे मावळे आम्ही उडवून लावू कावळे
सातारा बोलेल आता, माझ्या राज्याचे पोवाडे
कितीही अटी घाला आणि लावा कितीही बंधन
आदराने आम्ही करतो आमच्या राजाला वंदन

बघतोस काय गड्या मुजरा कर
असला तसला नाय भावा मानाचा कर


राजन गायकवाड 

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)