भुताचं मनोगत


माझा एक ब्लॉग आहे आणि त्यातले माझे फॉलोवर वाढावे म्हणून रोज एक कथा टाकायचो आणि लेखक म्हणून मिरवू लागलो भेटेल त्या सोशल मीडिया ला मी माझ्या कथेने सोसायला लावलं. माझी जास्त रुची भयकथा लिहिण्यात वाढू लागली. एखाद्या भयकथेला जास्त प्राधान्य मिळालं म्हनून की काय ठाऊक नाही पण हो भयकथा आता आवडू लागली होती विचार करायला आणि लिहायला सुद्धा.


पण त्या संध्याकाळी काही विचित्र घडतं गेलं.

मी शनिवारी सकाळी एक हॉरर स्टोरी लिहिण्यासाठी बसलो पण काहिच सुचेना. दिवस गेला काही सुचेना, चहाचे कप बघता बघता बघता बघता संपले. संध्याकाळ झाली मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. विचार करून करून डोळे निस्तेज झाले होते. बाहेर येऊन पाहिलं तर घरातले एरव्ही दिवसा सुद्धा चालू असणारे दिवे अंधार पडायला आला तरी चालू नव्हते. मी स्वयंपाक घरात डोकावून आई ला हाक दिली. कोणीच नव्हतं. अरे गेले कुठे सर्व असा विचार मनात येतो न येतो तोच फोन ची रिंग वाजली. आई चाच फोन होता. ती नातेवाईकांच्या घरी पूजेला गेली होती आणि बाबा पण ऑफिस मधून थेट तिथेच जाणार असल्याचे कळलं. मी तडख मित्रांना फोन लावले पण एक हि त्या संध्याकाळी रिकामा नव्हता कोनाला गिर्ल्फ्रेन्ड सोबत मुव्ही ला जायचं होत तर कोणाला मित्रांसोबत पार्टी ला. मी मनातल्या मनात पुटपुटलो बरच झालं आता मस्त्त एकांत मिळालाय कधी नव्हे तो. माझं लक्ष बाबांच्या ठेवणीतल्या स्कॉच कडे गेलं. मी घरात उजेड करायची तसदी न घेता बाबांचा स्कॉच जिथं ठेवतात तो कप्पा उघडला थंड काचेची बॉटल बाहेर काढली. एक स्मॉल पेग बनवला आणि बाल्कनी मध्ये येऊन माझा स्वतःबरोबरच एकांतात सहवास सुरु केला. खाली गाड्यांची वर्दळ आणि माणसांची धावपळ बघत मी एक एक सिप तोंडात घेत होतो. आता मस्त कल्पना सुचायला लागली मी पटकन माझ्या खोलीत गेलो. आणि सकाळ पासून काहीतरी छान लिहिण्याच्या मनस्थितीत पडलेलं पेपर आणि पेन उचलल आणि माझ्या खोलीची चालू राहिलेली खिडकी बंद करण्यासाठी गेलो तोच माझं लक्ष रस्त्यावरील दिव्याच्या खांबाखाली उभ्या असलेल्या डोक्यावरून पदर ओढून घेतलेल्या बाईकडे गेलं. मी हबकलो कारण ती बाई नजर रोखून ६व्या माळ्यावर माझ्याकडेच बघत होती. मी थांबलो आणि तिच्याशी नजर चुकवत खिडक्या बंद केल्या. आणि पडदे सुद्धा ओढले जे काम नेहमी आई करत असते. मी पुन्हा बाल्कनी मध्ये आलो आणि बाल्कनीत खुर्ची टाकून थोड्या वेळा पूर्वी आलेला विचार लिहायला बसलो. पण राहून राहून तिचाच चेहरा डोळ्या समोर येऊ लागला. आणि दरवाज्याची बेल वाजली.
मी पेपर आणि पेन खुर्चीत ठेवत. दरवाजाकडे निघालो मी अजून हि घरातले दिवे लावले नाहीत हे मला समजत होत पण आता आई आली आहे तर ती लावेलच असा नेहमीप्रमाणे विचार करत दरवाजा खोलला आणि समोर तिला पाहून माझे पाय ओशाळले. घाम फुटला. समोर तीच, हो तीच, खाली उभी होती, ती बाई आता माझ्या समोर उभी होती. मी दार लावायचा प्रयत्न केला पण माझे हात काही पुढे सरसावले नाहीत. ती आत आली तिच्या पैंजणाचा आवाज शान्तता कापत होता, ती न विचारता बाल्कनीत गेली आणि माझ्या खुर्चीत जाऊन बसली. मी मात्र दरवाज्यात उभा. मी तिथूनच तिला विचारायचं धाडस करत तिला कोण तू आणि तू अशी आत कशी आलीस असं बोललो आणि तिच्या तोंडावर भाव नव्हते खर म्हणजे मला तीच तोंड दिसतच नव्हतं. आता बऱ्यापैकी अंधार झालेला होता. मी पटकन दिवा लावण्यासाठी समोर असलेली बटन्स दाबायला चालू केलं. पण कोणतीही लाईट लागली नाही.

तेवढ्यात ती बोलली.'' तूच तर बोलवलंस मला ''.
मी तिच्याकडे बघितलं.
ती हसली पुढे म्हणाली अरे तूच तर सकाळ पासून मला बोलवतोयस. आज पूर्ण दिवस घालवलायस माझ्यासाठी आज तू माझीच आठवण काढत होतास. आणि मी आले. मी अवाक होऊन फक्त बघत होतो तिने तिच्या समोरच असलेली खुर्ची पायाने पुढे सरकवली मला तिच्या समोर बसायला लावलं होत कदाचित. मी धाडसाने जाऊन तिच्या समोर बसलो बाल्कनी मधल्या अंधुक प्रकाशात ती मी ठरवलेली तशीच होती. भीतीदायक...
तिने सांगायला चालू केलं. माझ लग्न झालं मी बाजूच्याच गावात नांदायला गेले. सासू सासरे चांगले होते. आणि नवरा कष्टाळू. दिवस जास्त मजेत नाही पण सुरळीत चाललेले. त्या वर्षी जास्त पाऊस न झाल्यामुळे पिकांवर मोठं नुकसान झालं होत. आता शेजारी माझ्या पायगुणाविषयी नवऱ्याला व सासू सासर्यांना भडकवू लागले होते.
तिने सांगायला चालू केलं. माझ लग्न झालं मी बाजूच्याच गावात नांदायला गेले. सासू सासरे चांगले होते. आणि नवरा कष्टाळू. दिवस जास्त मजेत नाही पण सुरळीत चाललेले. त्या वर्षी जास्त पाऊस न झाल्यामुळे पिकांवर मोठं नुकसान झालं होत. आता शेजारी माझ्या पायगुणाविषयी नवऱ्याला व सासू सासर्यांना भडकवू लागले होते.
आमच्या अंगणातली विहीर. त्याच पाणीही आटलं.
सर्व काही माझ्याच पायगुणामुळं झालं असं माझ्या कानावर येऊ लागलं. घरात खाण्याची आबाळ होऊ लागली माझा छळ होऊ लागला. दिवस खूप वाईट चालले होते. मी तर जिवंत पणे नरक यातना भोगत होते.
त्या दिवशी दुपारी मी चुलीवर भाकऱ्या शेकत असताना खूप जोराचं वादळ आलं मी बाहेर पळाले सुकायला टाकलेले कपडे धावत जाऊन काढू लागले. सासू सासरे आणि माझा नवरा शेतीच्या सात बाराच्या कामासाठी तालुक्याला गेले होते घरामध्ये मी आणि माझं ३ महिन्याचं बाळ बस्स. बाळ माझं चुली जवळच खेळात होत. मी अंगणातले कपडे काढून आत येतेय तोच चुलीसमोर माझ्या बाळाला घेऊन एक बाई माझ्याजागेवर बसली होती. मी धावत जाऊन बाळाला तिच्या हातातून हिसकावण्याचं प्रयत्न करू लागले. आणि समोरून मोठमोठयाने ओरडू लागली सोड माझ्या बाळाला मी सुद्धा तशीच ओरडत राहिली आम्ही थोडा वेळ खूप झटपट केली माझं बाळ खाली पडल अगदी चुलीच्या जवळ मी पटकन उचललं त्याला ती बाई हसू लागली तिने माझीच साडी अंगावर नेसली होती. ती माझ्यावरच ओरडू लागली माझं बाळ दे आणि चालती हो इथून.. मला काहीच कळत नव्हतं तिने चुलीतल जळत लाकूड उचलून माझ्या दिशेने येऊ लागली मी बाहेर धाव घेणार तोच तिने ताकदीने बाळाला खेचलं आणि मला बाहेर ढकललं.. मी जोरजोरात दरवाजा आपटू लागले. ती सुद्धा आतून ओरडू लागली. मी समोरच्या विहिरीजवळ गेले माझं सर्व लक्ष माझ्या नवर्याच्या वाटेकडे लागलं होत वादळ पण जोरात सुटलं होत. मी विहिरीच्या आडोश्याला बसले.
मी खूप रडत होते. माझ्या बचाव कोणाची सावली पडलीय ती बाई आत काय करत असेल या भीतीने मी पुन्हा उठले आणि धावत जाऊन दरवाजावर हात आपटू लागले माझ्या बांगड्या फुटल्या केस विस्कटलेले मी घराच्या बाजूने धावत होते खिडकीतून काही दिसेल आता तर मी अक्षरशः गयावया चालू केलेल्या पण ती काही दरवाजा खोलत नव्हती थोडा अंधार पडू लागला मला लांबूनच माझा नवरा आणि सासू सासरे येताना दिसले मी त्यांच्या जवळ धावत गेले पण ते माझ्याकडे दुर्लक्ष करत चालले होते. मी ओरडले पण त्यांच्यवा काहीच फरक नव्हता ते दरवाजा जवळ गेले आणि माझ्या सासू ने कुंकू हातात घेऊन जोरात फुंकल आणि सर्व माझ्याच तोंडावर उडालं माझा आवाज शांत झाला अचानक वादळ पण थांबलं होत मी अचानक स्तब्ध झाली. माझ्या नवऱ्याने आवाज दिला ती विचित्र बाई बाहेर आली तिच्या हातात माझं मूल होत. मला जोरात धावायचं होत पण मी एक पाऊल टाकू शकत नव्हते. मी कळवळून रडू लागले. सर्व आत गेले दरवाजा पुन्हा लागला. माझा पूर्ण अवतार झाला होता तोंडावर कुंकू केस विस्कटलेले बांगड्या तुटल्यामुळे हातातून रक्त येत होत मी शांत जाऊन विहिरीला टेकून बसले. मी रात्र भर रडत होते असा कस झालं. दोन मिनिटात सर्व हातातून निसटून गेलं. 

थोडा अंधार पडल्यावर माझा नवरा आणि सासू हातात एक दिवा आणि ताट घेवुऊन आले. त्यांनी ते विहिरीजवल्या झाडाजवळ ठेवून पुटपुटू लागले मी जवळ गेले माझी सासू बोलत होती इडापिडा टळू दे. मला रडायला येत होत ताटात एक शिजवलेलं अँड आणि एक भाकरीच तुकडा होता आणि त्याला पण कुंकू सांडलेल. मी अधाश्यासारखा खाल्लं सासू आणि नवरा आत गेले . मी हतबल झाले होते मी माझ्या आई कडे जावं म्हणून चालत सुटले. अक्खी रात्र संपून गेली मी चालतेय पण माझं गाव काही आलं नाही मी रस्ता चुकले होते. मी मागे वळली मला बाळाची खूप आठवण येत होती पुनः चालत मी माझ्या घराकडे वळली. बरयापैकी सकाळ झाली होती मी विहिरीत च्य पाण्याने तोंड धूळवावं म्हणून विहिरीत बदली टाकली आणि वर घेतली मी माझं प्रतिबिंब पाण्यामध्ये शोधू लागली पण मीच मला दिसेना. मी अस्वस्थ झाली. हळू हळू माझ्या लक्षात आलं होत काळ रात्रीच फक्त मीच काही केल्या मान्य करत नव्हती कि मी फक्त आत्मा आहे. मला फक्त मोह झाला होता माझ्या नवऱ्याचा आणि बाळाचा मी माझ्या नवऱ्याची पहिली बायको होते राजा राणीच संसार होता फक्त मला मूळ नाही झालं म्हुणुन मी याच विहिरीत जीव दिला होता आणि माझ्या नवर्याच्या प्रेमाला कायमचे मुकले.

आता तिथेच बसून असते विहिरी जवळ . 

पण काय माहित आज खूप उचकी लागली आस वाटलं कोण तरी मनापासून आठवण काढतय 
मी वेध घेऊ लागले. मी विहिरीजवळून उठले आणि इथवर पोचले तुला खिडकीतून मला बघताना पाहिलं आपली नजर नजर झाली. आणि आज तू भेटलास माझं ऐकून घेणारा. 

तितक्यात डोअर बेल वाजली. आई बाबा आले होते. मी दरवाजा खोलून आई बाबांना बाल्कनी कडे बोटाने इशारा करून दाखवलं. बाबानी भुवया उंचावून तिकडे पाहिलं आणि हसले आणि आईला म्हणाले तरी मी बोलत होतो याला पण घेऊन जा पूजेला. हा घरी असला कि लिही बसतो आणि त्यात एवढा गढून जातो कि त्याच्या गोष्टीतील पात्र त्याला दिसायला लागतात. 
मी सर्व ऐकलं बाल्कनी मध्येही कोणी नव्हतं मी माझ्या खोलीत मध्ये जाऊन बेड वर पडलो. माळ डोळा लागलं मनात विचार आलेला कि खरंच मी स्वप्न बघत होतो आणि डिम लाईट च्या प्रकाशात खुर्चीकडं लक्ष गेलं आणि ती तिथेच बसली होती.

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)