५ वा मजला.
त्या दिवशी ऑफिस मध्ये काम खूप असल्यामुळे सुशांत थोडा लेट निघणार होता. सर्व स्टाफ बघता बघता कमी झाला. आता फक्त सुशांत एकटाच ऑफिस मध्ये उरला होता. त्याने सर्व काम आटोपलं घड्याळात बघितलं तर १० वाजले होते त्याने कॅब बुक केली आणि ऑफिस लॉक करून बाहेर येतोय तोच पाऊस सुरु झाला.
तो खालीच उभा राहून टॅक्सिची वाट पाहू लागला. आणि थोड्याच वेळात बिल्डिंग च्या आवारात टॅक्सी आली सुशांत ने बाहेरून त्याचा फोन दाखवला कॅब चालकाने हि त्याचा फोन दाखवला सुशांत डोक्यावर हात ठेवत कसा बसा टॅक्सिजवळ पोहचला. दार उघडून आत आला. टॅक्सी चालकाला म्हणाला चलो भाई चेंबूर सहकार प्लाझा तिलक कॉलनी लेलो. चालकाने त्याच्या स्क्रीन वर मॅप चालू केला. एफ एम वर जुनी गाणी चालू झाली. सुशांत रुमालाने केस पुसत होता. तेवढ्यात रेडिओ वर गुमनाम है कोई गाणं चालू झालं. सुशांत चालकाला म्हणाला अरे भाई कूच दुसरा गाना लागाव. ये भूतो वाला क्यो लगाके रखा है. चालकाने हसून मागे बघितलं आणि गाणं बदललं. पावसाला पण अजून चेव चढला होता त्यात टॅक्सी चालक पण जोरात टॅक्सी चालवत होता. जीव मुठीत घेऊन सुशांत त्याच्या घराच्या आवारात पोहोचला बिल्डिंगच्या कंपाउंडच्या आत टॅक्सी चालकाने मनाई केली सुशांत ने पैसे देऊन टॅक्सी सोडून दिली सुशांत च्या डोक्यात भुताच गाणं मात्र घुमत होत. तो धावत डोक्यावर हात ठेवत बिल्डिंग च्या गेट च्या आत आला. पूर्ण अंधार होता. त्याने वॉचमन कडे चौकशी केली असता त्याला कळलं कि जास्त पावसामुळे लाईट गेल्यात आसपासच्या भागात पण अंधारच दिसत होता त्याने त्याच्या जवळची सिगारेट पेटवली थोडा वेळ वॉचमन सोबत गप्पा मारल्या सुशांत ला वाटलं थोड्या वेळात लाईट येईल त्याला पाच मजले चढून जाण्याची जराही इच्छा नव्हती पण अर्धा तास झाला तरी तो खालीच उभा होता. त्याने जिन्याने चालत वर जाण्याचा निर्णय घेतला. त्याने वॉचमन ला बॅटरी साठी विचारलं पण त्याच्या कडे एकच होती आणि इलेकट्रीशन येईल त्याचसाठी त्याला ती लागणार होती.
आज तो पहिल्यांदाच जिन्याने वर चालला होता प्रत्येक जिन्याच्या मध्यभागी एक खिडकी होती त्यातून काय तो प्रकाश येऊ शकत होता पण लाईट नसल्यामुळे तिथून वीज चमकली तरच काय तो उजेड निर्मण होत होता. त्याने चालायला सुरुवात केली तो काहीतरी गुणगुणत पायऱ्या चढू लागला. थोड्याच वेळात त्याच्या
गुणगुणण्याची त्यालाच भीती वाटली तो टॅक्सितल गुमनाम है कोई गाणं गुणगुणत चाललेला. त्याने बंद केलं आणि थोडा जास्त वेगाने वर चढू लागला. पण त्याला भास होत होता त्याच्या मागे कोणीतरी आहे सुशांतने दोनदा मागे वळून पाहिलं. पण काहीच हालचाल नव्हती. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. तो दुसऱ्याच माळ्यावर आला होता तो आता थोडा थांबला त्याने खिशातून लायटर काढला आणि सिगारेट पेटवली आणि मागे बघतोय तर त्याच्या समोरच कोण तरी उभं आहे असा भास होताच घाबरून तो दोन पावलं मागे सरकला. आणि भिंतीला धडकला त्याने सिगारेट तिथेच टाकली आणि वरच्या दिशेने धावू लागला. धावून धावून दमला पण पाचवा मजल्यावर पोहचत नव्हता तो तिसऱ्याच मजल्यावर होता. तो खिडकी जवळ गेला आणि वॉचमन ला आवाज दिला. पण त्याचा आवाज पावसात विरून जात होता. आणि एक मोठी वीज कडाडली त्याला दिसला तिसऱ्या मजल्याच्या पहिल्या पायरीवर कोणी तरी बसलय. सुशांत घाबरला. त्याने लायटर पेटवला. तिथे खरंच कोण तरी बसलं होत. त्याने आवाज दिला कोण आहे. ती आव सायब मी कामवाली ओळखलं नाय व्हय मला काय तुमि बी.. सुशांत एक पायरी वर चढला आणि लायटर थोडा उंचच धरून पाहिलं तर होती ती तर काम वाली होती सुशांत आणि अजून काही बिल्डिंग मध्ये काम करायची ती. सुशांत ला थोडा धीर आला त्याने तिला प्रश्न केला तूच का माझ्या पाठोपाठ चालत होतीस? ती म्हणाली व्हय सायब. तुम्ही गाणं बोलत व्हता आणि म्या ऐकत व्हती आणि मंग तुम्हीच का घाबरला मला कळलंच नाय.. सुशांत तिला म्हणाला पण तू इथे का बसलीयस? सुशांत तिच्याकडे निरखून बघत होता पण तिचा चेहरा दिसत नव्हता त्याने अजून पुढे जाऊन लायटर च्या प्रकाशात निरखून पाहिलं आणि जे त्याला दिसलं ते पाहून त्याची बोबडी वळली. त्याने पाहिलं तिच्या धडावर तीच डोकं नव्हतं तो खाली कोसळला वीज कडाडली ती आता जागेवरून उठली आणि भर भर सुशांतच्या दिशेने चालू लागली तिच्या हातात काहीतरी धार धार चमकत होत सुशांत जीव मुठीत घेऊन धावला तो मोठमोठ्याने ओरडत धावत होता. आणि तेवढ्यात लाईट आली पूर्ण बिल्डिंगच्या लाईट्स चालू झाल्या. त्याने मागे वळून पाहिलं. कोणीही नव्हतं. त्याने वॉचमन ला हाक मारली पाऊस थांबल्यामुळे सुशांत चा आवाज वॉचमन पर्यंत गेला आणि वॉचमन धावत सुशांत जवळ येऊन पोचला. त्याने सुशांतची हालत पहिली काय झालं साहेब तुम्ही कितीतरी वेळ झाला वर जाऊन मग पुन्हा खाली का आला आणि असा का अवतार झालाय तुमचा? सुशांत त्याच्या खांद्यावर हात ठेवत दमलेल्या आवाजात म्हणाला एक जरा आपण तिसऱ्या मजल्यावर जाऊयात वॉचमन ला असंख्य प्रश्न पडलेले पण तो सुशांतच्या मागे चालू लागला. ते दोघेही ती जिथे बसली होती तिथे पोहचले पण तिथे काहीही नव्हतं ते दोघेही पुढे तिसऱ्या मजल्यावरच्या प्रत्येक घरा समोरून फिरू लागले रात्रीचे १ वाजले असतील. भीती आता थोडी कमी झाली असली तरी सुशांतच्या मनाचा थरकाप अजूनही नव्हता थांबला. त्याच्ये हात पाय थरथरत होते. त्यांना तिथे काहीही नाही आढळल. वॉचमन सुशांत ची हालत बघून म्हणाला साहेब असं होत कधी कधी आज आमावस्या आहे. थोडं सांभाळून राहत जा असं म्हणत वॉचमन सुशांत सोबत लिफ्ट मध्ये शिरला आणि सुशांत ला सोडायला ५ व्या मजल्यावर आला. सुशांत ला सोडून वॉचमन लिफ्ट जवळ. आला आणि लिफ्ट खोलणार तोच वॉचमन ला सुशांतच्या किंचाळण्याचा आवाज आला सुशांत त्याच्या दाराबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडला होता वॉचमन पुढे आला तो सावधानता बाळगत हातातली बॅटरी घट्ट पकडत त्याच्या दारासमोर गेला सुशांतच्या आवाजाने बाजूच्या दोनचार घराचे दरवाजे उघडले गेले आजूबाजूचे माणसं पळत बाहेर आली वॉचमन ने घरात कामवालीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पहिला ज्याच् धड आणि डोकं वेगळं झालं होत. वॉचमन घाबरला. तोवर माणसांची गर्दी झाली. पोलिसांना तातडीने फोन लावण्यात आले. सर्वांची धावाधाव झाली. सुशांत ला जाग आली तेव्हा तो एका सरकारी हॉस्पिटल मध्ये होता त्याच्या समोर एक पोलीस कॉन्स्टेबल बसला होता. सुशांतच्या डोक्यावरचा पंखा आवाज करत गर गर फिरत होता सुशांत पोलिसांकडे बघून अवाक होऊन प्रश्नार्थक नजरेने बघत होता. त्याच्या डोळ्यावर अंधारी येत होती तो पान्हा मूर्च्छित होऊन पडला. तीन दिवसांनी त्याच्या प्रकृती मध्ये थोडासा चांगला बदल दिसला त्याने डॉक्टरांना चौकशी केली मला डिस्चार्ज कधी मिळेल मी घरी कधी जाऊ शकेन तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल कदम तिथे हजर झाले त्यांच्या तोंडावर स्मित हास्य होत पण त्यांना बघून सुशांत च्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होत. कदम साहेब त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून त्याला म्हणाले खर म्हणजे मी तुम्हाला काहीही प्रश्न विचारून त्रास नाही देणार केस सॉल्व्ह झालीय तुमच्या घरात चोरीच्या उद्देशाने काही चोर घुसले होते त्यावेळी तुमची कामवाली किचन मध्ये चपात्या शेकत होती .तिला ते तिघे अनोळखी माणसं तुमचे मित्र असल्याचा सांगून घरात प्रवेश करण्याची परवानगी मागू लागले तिने दार खोललं असता तिच्या डोक्यात जाड हत्याराने हल्ला करून तिला बेशुद्ध केलं आणि घरात चोरी करण्यासारख्या काही गोष्टी शोधू लागले परंतु प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन तिने आरडा ओरडा चालू केला तेवढ्यात त्यातल्या एकाने तिच्या गेल्यावर जाड शास्त्राने हल्ला केला आणि तीच डोकं शरीरापासून वेगळं केलं. त्यांनी घरातून काही ऐवज चोरला आणि दरवाजा लॉक करून निघून गेले. मारेकरी आता आमच्या ताब्यात आहेत तुम्ही तुमच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलीस स्टेशन ला येऊन क्लेम करू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. असं बोलून कदम साहेब निघून गेले. आता सुशांत ला कळलं होत तिला त्याला भेटून सांगायचं होत कारण घरात ती मारून पडलेली होती आणि त्याच दिवशी सुशांत ला लेट झाला होता. तो घरी आला त्याने दार उघडलं फ्रिज मधलं थंड पाणी घेऊन पिऊ लागला तोच त्याला किचन मधून भांड्याचा आवाज आला त्याने किचन मध्ये डोकावलं कोणीही नव्हतं तो बाहेर आला सोफ्यावर बसला त्याच लक्ष समोरच्या टेबलवर पडलेल्या किल्ल्यांकडे गेलं ज्या त्याने कामवालीकडे दिल्या होत्या. आणि ती नेहमी सुशांत असताना घरात आली कि तिच्याजवळच्या किल्ल्या त्याच टेबल वर ठेवत असे. सुशांत ने पुन्हा एकदा उठून किचन मध्ये डोकावलं पण आता हि तिथे कोण नव्हता सुशांतच्या डोळ्यात पाणी भरलं होत.

Comments