नायक
मी नाही चांगला चित्रकार, ना शिल्पकार, गायक ना खलनायक, आयुष्याच्या रंगमंचावर बनायचंय फक्त मला एक चांगला नायक पंखांवर विश्वास ठेवून घेतली भरारी मोठी आयुष्यात उंच उडण्याची जिद्द मात्र होती उडता उडता कळलं नाही पाप आणि पुण्य मागे वळून पाहिलं तर सर्वच होत शून्य स्वतः च्या पंखांवर ठेवला होता विश्वास कळून चुकल आता होता तो फक्त एक भास काही तरी वेगळं करण्याचा घेतला होता ध्यास कधीतरी स्वतःलाच गर्वाने बोललो होतो शब्बास ! पाप आणि पुण्याचा हिशोब मी मांडणार आहे स्वतःलाच आरोपी ठरवून मीच साक्षिदार होणार आहे पण पुन्हा एकदा स्वतःसाठी उंच उडायच आहे चांगला नायक बनण्यासाठी स्वतःला लायक बनवायचं आहे. ------------------------------- राजन गायकवाड