Posts

टवाळ

घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक चाराण्याच्या कोंबडीला बाराण्याचा मसाला लावून टाक आयटम ला फिरवायसाठी थोडा पैशाचा झोल करून टाक मित्राच्या गाडीत पेट्रोल भरून तिला पाणी पुरी देऊन टाक दिसायला काळी असली तरी सेल्फीने ने गोरी करून टाक सोनू,बाबू,बच्चा पुढे हॅशटॅग लाव आणि अपलोड करून टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक कशात नाय काय पण फाटक्यात पाय घालून टाक मित्राच्या मॅटर मध्ये पुढच्याला कानफटात पेटवून टाक पोलिसांनी पकडल्यावर त्याच्याकडून दोन रिटर्न घेऊन टाक तुझ्या साठी नडलोय भावा बोलत खांद्यावर हात ठेवून टाक उगाच पडलो लफड्यामध्ये असं मनात एकदा बोलून टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक आईच्या गावात आणि बाराच्या भावात विकून टाक सिम कार्ड ला लिंक करायला आधार कार्ड देऊन टाक आधार कार्ड ला लिंक करायला पॅन कार्ड पण देऊन टाक देशाचा खरा नागरिक झालायस एकदा खात्री करून टाक  खूप मोठं काम केलं बोलत एक दोन बिअर घेऊन टाक घेऊन टाक देऊन टाक देऊन टाक घेऊन टाक आईची कैची काना बरोबर मात्रा पण जोडून टाक कट्ट्यावरच्या मित्रांना दोन चार बिझनेस प्लान सांगून टाक टाटा बिर्ला ...

ओन्ली राजे...

Image
ओन्ली राजे... शब्दाला धार आणि तलवारीने वार नाद करायचा नाय गड्या पडशील गपगार किती पण लढा कितीपण रहा उभे सातार च्या सत्तेवर असणार ओन्ली राजे. बघतोस काय गड्या मुजरा कर असला तसला नाय भावा मानाचा कर असू द्या अब कि बार, कोणतीही सरकार साताऱ्यात होणार फक्त राजेंचा जयजयकार किती पण असुद्या राजकारण, किती पण टाका तिढे साताऱ्याच्या सत्तेवर असणार कायम ओन्ली राजे. बघतोस काय गड्या मुजरा कर असला तसला नाय भावा मानाचा कर गरिबांच्या ताटात जेवतो, आहे गरिबांचा वाली जो देईल त्यांना त्रास त्याची राहणार नाही सावली कितीपण असू द्या भक्षक, साताऱ्याचा आहे एकच रक्षक उदयन राजे म्हणतात त्यांना असू द्या तुमच्या लक्षात बघतोस काय गड्या मुजरा कर असला तसला नाय भावा मानाचा कर साताऱ्याच्या वाघाचा एकच आहे वादा वाटेला कधी गेला तर दाखवेल त्याची जागा कितीपण असू द्या कोल्हे आणि असू द्या पिसाळलेले कुत्रे ज्याच्या डरकाळीने पळतात सर्व, ते आहेत ओन्ली राजे. बघतोस काय गड्या मुजरा कर असला तसला नाय भावा मानाचा कर विजेचा फटका आणि कॉलर ला झटका भाषण करताना शब्दाचा असतो मोठा दणका कितीही दाखवा कमळ आणि क...

हडळ (भाग ४) शेवट...

Image
ती उतरली चंद्र प्रकाशात आली. ती हळू हळू पावलं टाकत सर्वांजवळ जाऊ लागली. सर्व जण पाठी सरकत होते. तिच्या तोंडावर हास्य होत. तिने तिचे दोन्ही हात सरळ रेषेत आडवे केले जणू ती सर्वना आलिंगन देण्यासाठी येत आहे. ती जवळ आली तिने एक हात मागे ठेवून मोठ्या बोटाने गाडीकडे इशारा केला ती सर्वांना गाडीत येण्यास खुणवत होती. इथे सर्वांचा थरकाप उडाला होता. ती अजून जवळ येऊन तिच्या मागे असणारा हात बाहेर काढून आता दोन्ही हाताने आत जाण्यास खुणावू लागली. आता मात्र ऐकणं सर्वांना भाग होत कारण तिच्या दुसऱ्या हातात मोठा सुरा होता त्याला बऱ्यापैकी रक्त लागलं होत. सर्व जण एकत्रच दबकत दबकत गाडीच्या दिशेने जाऊ लागले ती तशीच उभी तिच पूर्ण लक्ष नव्या नवरी कडे होत जस ते जोडपं जवळ आलं तास तीच मोठं असणार वाकड बोट तिच्या दिशेने पुढे आलं. त्याने ते झिडकारलं. तिला खूप राग आला तिने त्याच्याकडे रागाने बघितलं परत हसत तिने आत जाण्याचा इशारा केला. कसे बसे सर्वजण गाडीत शिरले सर्वांनी पाहिलं कि आत मध्ये मागे तो आडदांड माणूस शांत बसला आहे.  दुसऱ्या सीट वर जोडपं आणि त्याच्या मागचये सीट वर ड्राइव्हर, कंडक्टर आणि बाकी दोघे बसल...

हडळ (भाग ३)

Image
सर्वांना हूर हूर लागून राहिलीय आता काय घडणार याची... तितक्यात सर्वात आधी ज्याने तिला जवळून बघितले होते तोच तो आडदांड माणूस अचानक हळू हळू गाडीच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो आधी हळू हळू पुट पुटत होता. नंतर त्याचा आवाज वाढू लागला तो त्या हाडळीच वर्णनच जणू करत होता, त्याचा आवाज थोडा बाई सारखा येऊ लागला होता त्याने केलेलं वर्णन जास्तच भयानक वाटू लागलं. घडायला १२ चा प्रहर झाला होता तो आता मोठमोठ्याने बोलू लागला. ''पुनवेच्या रातीला, घाटामधल्या वाटला'' यल ती साथीला, घेऊ नगा आत तिला... हसत हसत बगल ती, यड वंगाळ वागलं ती, तिच्या नजरमंदी हाय रातीची धुंदी रात आज तिचीच हाय इसरू नगा ... येशीपाशी बस्तीय ती, झाडामाग दडलीय ती, कावळ बी आल्यात आज तिच्या साथीला तुमच्या बिगर जाणार नाय आज इथंच हाय वस्तीला हडळ हाय ती हडळ, कधीबी नजरेला पडलं, बघू नगा तिच्याकडं समद ईपरीत घडलं...  असं म्हणत म्हणत तो आडदांड माणूस गाडीपाशी जाऊन उभा राहिला कावळ्यांची काव काव थांबली होती जेव्हा ह्याच हाडळीचा वर्णन चालू झालं होत. तो माणूस आता गाडीच्या शेवटच्या खिडकी कडे उभा होता. तो तिची आतुरते...

हडळ (भुताटकी कथा भाग २)

Image
हडळ (भाग २) ड्राइव्हर गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याचा राम नाम जप चालूच होता. तितक्यात सायकलच्या घंटीचा आवाज आला ड्राइवर ने बोलावलेला गाडी रिपेअर करणारा धापा टाकत आला होता. त्याने लांबूनच मोठ्या आवाजात विचारलं कशी काय बंद पडली ड्राइवर त्याच्या दिशेने वळला आणि प्रॉब्लेम सांगू लागला सर्वांना त्या सायकलवरच्या रिपेअर मन ला बघून थोडा धीर आला होता. त्याने गाडीचं बोनेट उघडलं आणि त्याच्याकडच्या टूल्स ने तो काही पार्ट खोलू लागला कंडक्टर ने बॅटरी पकडली होती आणि सर्व जण आशेने सर्व बघत होते. रिपेअर मन गाडी च्या खाली झोपून खाटखुट करत होता तेवढ्यात कंडक्टर ने विषय काढायचा म्हणून बोलला अहो आमच्या गाडीत एक येडी शिरलीय ती काही केल्या खाली उतरत नाहीय. गावातलाच असावी कोणीतरी. नाय का? तो हे ऐकून रिपेअर मन गाडी खालून थोडा बाहेर आला आणि त्याने विचारलं काळी साडी हाय का तिची? कंडक्टर ने नेहमीप्रमाणे मान हलवून होकार दिला. नंतर म्हणाला तुम्हाला कस माहित हो? रिपेअर मन थोडा अजून बाहेर आला आणि विचारलं ति च्या कपाळावर काळ्या रंगाची मोठी चंद्रकोर हाय काय? कंडक्टर ने होकार द्यायच्या आतच क्षणाचाही विलंब न करता तो...

हडळ (भुताटकी कथा भाग १)

Image
  रात्री फलाट क्रमांक ७ वरून मुंबई साठी ९. ३० वाजताची एस टी होती. मोजकेच प्रवासी एस टी स्टॅन्ड वर दिसत होते. कडाक्याच्या थंडी मुळे सर्वांनी घोंगड शाल कानटोपी मफलर अश्या पद्धतीचा पोशाख केला होता. एकदाची मुंबईची एस टी तिच्या नेहमीच्या जागेवर येऊन उभी राहिली ड्राइवर खाली उतरून  काचेवर पाणी मारू लागला आणि नंतर त्याने त्याच्या तोंडावर हि पाणी मारून झोप उडवली. तोवर ४ ते ५ प्रवासी एस टी मध्ये चढले त्यातला एक जण चढायच्या आधी कंडक्टर ला विचारू लागला '' काय हो मास्तर रिसेर्व्हशन हाय व्हयं''. कंडक्टरने तंबाखू तोंडामध्ये ठेवत नुसती नंदी बैलासारखी नकारार्थी मान हलवली आणि कुठं बी बसा फक्त माझी सीट सोडा. असं म्हणत तो एसटी पुढे जाऊन शिट्टी मारू लागला आता एसटी चालू झाली अजून एक नवीन लग्न झालेलं जोडपं धावत एसटी जवळ येऊन एसटी थांबवली आणि त्यात चढलं. एसटीचा दरवाजा जोरात बंद झाला गाडीतले अंधुक दिवयाच्या प्रकाशात ते जोडपं बसण्यासाठी जागा शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांनी थोडी मधोमध आणि एकांतातली सीट पकडली. त्यांचं हसणं खिदळणे चालूच होत. त्यांच्या अशा वागण्यामुळे बाकी प्रवासी त्यान्च्याक...

Love - E - Story

Image

ड्राय डे

Image
एकादशीच्या दिवशीच साला असतो का ड्राय डे ब्लॅक ने शोधा, गावभर फिरा असले कसले कायदे उपवासाच्या चकण्याबरोबर लागते मस्त दारू दारू भेटली हेच बस्स झालं आता देशी मारू सही बात बोला भाई सही बात बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. उन्हामध्ये चालता चालता घामामध्ये भिजलो ६० ९० ३० साठी गोल गोल फिरून थकलो थोडी जरी भेटली आता मारेन ती कच्ची साबुदाण्याची खिचडी चालेल नको आता मच्छी सही बात बोला भाई एकदम सही बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. घशाला माझ्या कोरड पडली आता तरी पाव घोटभर जरी भेटली तरी घेईन तुझंच नाव शोधून शोधून दमलो मी आता कुठं भेटेना थरकाप माझ्या अंगाचा काही केल्या थांबेना क्या बात बोला भाई एकदम सही बोला... तु है मेरा भाई और मै हू तेरा चेला. आता तर मी काढनाराय ड्राय डे वाल कॅलेंडर वाईन शॉप च्या बाहेर जाऊन तारखा तेवढ्या पेंट कर आता कोणाची होणार नाय आदल्या दिवशी दमछाक कॅलेन्डर तुझ्यासाठी काढलाय मित्रा फक्त एक पेग देऊन टाक सही बात बोला भाई दिमाग से बोला! ड्राय डे का कॅलेन्डर बडे इज्जत से खोला कुणी तरी द्या बाबा कुणी तरी द्या उद्या पाहिजे तर मा...

माणूस झाला दगड व्हिडिओ

Image
माणूस झाला दगड, दगड झाला देव. माणुसकी आता जरा बाजूलाच ठेव

यात माझी काय चूक..

Image
गळा दाटून येतोय माझा पण रडू मी शकत नाही बोचणाऱ्या नजरा आता मला काहीच विसरू देत नाही कपडे तर कधीच फाटले माझे लक्तर मांडले मी खांद्यावर माझ्याच ओझे खूप होती माझ्याकडे हि सहनशक्ती पण आता दाद मागायचीच वाटते भीती गिधाडांनी लचके तोडत चामडी माझी लोळवली बांधली नसेल त्यांनाही कोणी राखी त्यामुळेच त्यांनी दुसऱ्याची मळवली ऐकलं होत शिकार फक्त जंगलात होते शहरातसुद्धा आता भक्षकांची टोळी फिरते सावज दिसताच सैतानाची नजर मात्र खिळते आता कळतंय मला आईला माझ्या हुरहूर का लागते माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा एकाच क्षणात सर्व मिळाल्या ना धुळीला उभं राहायचं होत मलाही स्वप्न पूर्ण करायला पण खरंच बोचणारे शब्द तेही लागलेत तोडायला काय होती चूक माझी घडल्या प्रकारात आज हि अविचारी माझ्यावरच का भुंकतात मदत नको मला हवी सर्वांची साथ अभिमानाने पुन्हा जगू द्या मला हि समाजात --------------------------------------- राजन गायकवाड