Posts

गोष्ट तुमची आमची...

सूरपारंब्या (भाग १)

नमस्कार वाचकांनो! मनापासून खूप खूप आभार.. तुम्ही माझ्या कथा आवडीने वाचत आहात आणि मला तुमच्या प्रतिक्रिया मिळताहेत.. या बद्दल खरंच मी तुमचा सर्वांचा कृपाभिलाषी आहे.. मला तुमच्या कडून अजून स्फूर्ती मिळतेय नवीन कथा लिहिण्यासाठी .. सूरपारंब्या  (भाग १) आज मी तुमच्या समोर एक नवीन थर्रारक कथा आणि नवा विषय घेऊन लिहीत आहे. कथेच शीर्षक तितकंच उत्कंठा वाढवणार आहे. मला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.. शाळेची घंटा वाजली... टन टन टन टन! मुलांचा दंगा... एक गावच्या जिल्हापरिषद शाळेतील मुलांचा कल्लोळ... म्हाद्या खूपदा नापास होऊन पुन्हा ४ थी  इयतेत शिकणारा. शरीराने  आडदांड पण बुद्धीने तेवढाच असक्षम. मुक्या अभ्यासात हुशार पण उंचीने आणि रंगाने मार खाल्लेला म्हणजेच काळा कुट्ट आणि बुटका .. वैशी नाकात सदैव वाहणारी गंगा आणि कोणी काही बोललं तर डोळ्यातून सुद्धा आमल्या चुणचुणीत खोडकर टवाळ पण पैंजेसाठी काहीही करणारा आणि मणी अभ्यास सोडून काहीही सांगा सर्व करू शकते लपून छपून आईची मशेरी सुद्धा लावते अशे हे पाच जण नेहमी शाळा सुटल्यावर खेळा मध्ये गुंतून जायचे. आणि संध्याकाळी मातीमध्...

वावटळ

Image
 परसोडी गावातील हि गोष्ट आहे. गावातील अत्यंत साधा आणि सरळ असा रामा आपल्या पत्नी सह गुण्यागोविंदाने राहत होता. रामा चे आई वडील तीन वर्षांपूर्वीच गेले होते. त्याचे नातेवाईक त्याच्या परिस्थिती मुळे त्याच्या  घराकडे डुंकून सुद्धा पाहत नसत. रामा परसोडी गावातील ग्रामपंचायत मध्ये शिपायांच्या पदावर कार्यरत होता. तो आणि त्याची पत्नी एवढच काय ते त्याच कुटुंब होत. रामाची बायको कविता अत्यंत गरीब आणि प्रेमळ स्वभावाची. खूप वर्षे देवाला साकडं घातल्यानंतर देवाच्या कृपेने त्यांच्याही घरात आता पाळणा हलणार होता. ते दोघेही अत्यंत समाधानी होते आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या तयारीत दोघेही रमले होते. कविताला ९ वा महिना लागला होता. रामा तिची पुरेपूर काळजी घेत असे. पण कोणास ठाऊक नियतीच्या मनात काय आलं आणि तो दिवस ती काळ रात्र घेऊन आला. त्या दिवशी सकाळी रामाच पाऊल काही घराबाहेर पडत नव्हतं. बाहेर सुद्धा मळभ आली होती . कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू शकत होता. त्यात कविताला कोणत्याही क्षणी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर ह्या काळजी पोटी त्याची घालमेल चालूच होती. कविता शांत बसून त्याच्या कडे पाहत होती. ...

५ वा मजला.

त्या दिवशी ऑफिस मध्ये काम खूप असल्यामुळे सुशांत थोडा लेट निघणार होता. सर्व स्टाफ बघता बघता कमी झाला. आता फक्त सुशांत एकटाच ऑफिस मध्ये उरला होता. त्याने सर्व काम आटोपलं घड्याळात बघितलं तर १० वाजले होते त्याने कॅब बुक केली आणि ऑफिस लॉक करून बाहेर येतोय तोच पाऊस सुरु झाला. तो खालीच उभा राहून टॅक्सिची वाट पाहू लागला. आणि थोड्याच वेळात बिल्डिंग च्या आवारात टॅक्सी आली सुशांत ने बाहेरून त्याचा फोन दाखवला कॅब चालकाने  हि त्याचा फोन दाखवला सुशांत डोक्यावर हात ठेवत कसा बसा टॅक्सिजवळ पोहचला. दार उघडून आत आला. टॅक्सी चालकाला म्हणाला चलो भाई चेंबूर सहकार प्लाझा तिलक कॉलनी लेलो. चालकाने त्याच्या स्क्रीन वर मॅप चालू केला. एफ एम वर जुनी गाणी चालू झाली. सुशांत रुमालाने केस पुसत होता. तेवढ्यात रेडिओ वर गुमनाम है कोई गाणं चालू झालं. सुशांत चालकाला म्हणाला अरे भाई कूच दुसरा गाना लागाव. ये भूतो वाला क्यो लगाके रखा है. चालकाने हसून मागे बघितलं आणि  गाणं बदललं. पावसाला पण अजून चेव चढला होता त्यात टॅक्सी चालक पण जोरात टॅक्सी चालवत होता. जीव मुठीत घेऊन सुशांत त्याच्या घराच्या आवारात पोहोचला बिल्डिंग...

कधी अचानक...

कधी अचानक... कधी अचानक स्वप्नांमध्ये डोकावून जातात आठवणी हसता हसता डोळे उघडता स्वप्न मोडते सत्य उमगते बघता बघता कधी अचानक आभाळ दाटते पावसाची चाहूल लागताना सूर्याला सुद्धा जाग येते मग उन्हात पाऊस बघितला पडताना कधी अचानक जुन्या मित्रांच्या गप्पा लागतात रंगायला कोणाच्या तरी नसण्याची खंत सलत असते मात्र मनाला कधी अचानक श्वास फुलतो गळा गहिवरतो क्षण तो सारा बघताना आठवण होते जेव्हा हीच ती माझी शाळा शाळेच्या आवारात घंटेचा आवाज ऐकताना कधी अचानक चालता चालता मागे वळून बघताना दिसतो मला मीच त्या मैदानात मित्रांसोबत शर्यत लावताना कधी अचानक दिसतो मी मला तिच्या सोबत अंगणात हसत खिदळत खेळताना आता बघितलं कडेवर तिच्या चिमुकल्याला काऊ चिऊचा घास भरवत खेळवताना कधी अचानक आठवत मला आईचा तो अभ्यास माझा घेताना आणि चुकल्यावर मात्र बापासमोर पाय दुःखे पर्यंत ओणव उभं राहताना कधी अचानक समजून घेतो मी स्वतःला सावरताना मीच कदाचित वाहून जातो जुन्या आठवणीत रमताना .... ---------------------------- लेखक - राजन गायकवाड

मैफिल

मैफिल सा रे ग म प ध नि सा ... हा सा आला तुमच्यावर चला गाणं बोला पाहू..... आणि सचिन अवाक होऊन तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता. तीच लक्ष मात्र अडकित्त्याने सुपारी कातरण्याकडे असलं तरी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आलेले दिसत होते. दोन आठवड्यापूर्वी... सचिन मुंबई मध्ये म्युन्सिपालटी मध्ये कारकून म्हणुन १५ वर्ष कार्यरत होता त्याच लग्न २ वर्षांपूर्वीच झालं होत. तो आज हि गडबडीत कामाला जायची तयारी करत असताना मीना ने म्हणजेच याच्या बायकोने आतून डब्बा घेऊन येताना त्याच्याकडे रागात बघून विचारले. '' मग यावेळी लग्नाचा वाढदिवस साजरा कुठे करायचा कि घरीच बसायचं नटून.. त्यावर सचिन तिच्याकडे हसत हसत बघून उगाच लाडात आल्याचं दाखवत बोलला आज रात्री मी माझा प्लॅन सांगतो आपण खूप धमाल करायची आपण या वेळी कुठे तरी बाहेर जाऊयात. आणि तो बॅग उचलून घराबाहेर गेला इकडे मीना चा आनंद गगनात मावेना झाला ती खिडकीत आली आणि नवऱ्याला जाताना पाहू लागली आणि सचिन च लक्ष खिडकीकडे गेलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला आज चक्क ती सचिन ला टाटा करत होती आणि तोंडावर गॉड हास्य त्याने सुद्धा वर पाहून हात हलवला इतक...

तीच नाव विचारायचं राहीलच!

हि गोष्ट आहे १९९० ची, अमित मुंबईला मेडिकल एंट्रन्स साठी काकाकडे आला होता . खूप मन लावून अभ्यास केला होता त्याने. त्याची परीक्षा संपली. त्या संध्याकाळी काकाच्या मुला सोबत तो फिरायला गेला. दोघांनी आधी शॉपिंग केली नंतर एक एक बिअर घेऊन स्वारी घराकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकल ला छोटासा अपघात झाला. दोघांनाही समोरच्याच एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमितच्या पायाला दुखापत झाल्याने फ्रॅक्चर लावण्यात आलं होत. अमितला आणि त्याच्या भावाला बऱ्यापैकी ओरडा पडला होता. आता अमितला एक दोन आठवडे त्या बेड वरच काढावे लागणार होते. अमितला आता त्याच्या कक्षा मध्ये हलवण्यात आलं होत. त्याच्या कक्षा मध्ये अजून एक बेड होता जो रिकामाच होता. तिथे मग दिवस-दिवस त्याचे मित्र मंडळी, नातेवाईक सर्व बसून अमितशी गप्पा करू लागले. दोन तीन दिवस मजेत गेले. पण त्या रात्री १२ वाजता त्या बेड वर एका ५० वर्षाच्या माणसाला आणून ठेवण्यात आलं. अमित सोबत रात्री सोबतीसाठी थांबलेला गण्या ने त्या बेड वर अर्धी झोप काढली असेल पण प्रसंगावधान बघून त्यानेही पटकन बेड रिकामी करून दिला. त्या ५० वर्षाच्या माणसाचं नुकतच ऑपरेशन झाल...

भुताचं मनोगत

माझा एक ब्लॉग आहे आणि त्यातले माझे फॉलोवर वाढावे म्हणून रोज एक कथा टाकायचो आणि लेखक म्हणून मिरवू लागलो भेटेल त्या सोशल मीडिया ला मी माझ्या कथेने सोसायला लावलं. माझी जास्त रुची भयकथा लिहिण्यात वाढू लागली. एखाद्या भयकथेला जास्त प्राधान्य मिळालं म्हनून की काय ठाऊक नाही पण हो भयकथा आता आवडू लागली होती विचार करायला आणि लिहायला सुद्धा. पण त्या संध्याकाळी काही विचित्र घडतं गेलं. मी शनिवारी सकाळी एक हॉरर स्टोरी लिहिण्यासाठी बसलो पण काहिच सुचेना. दिवस गेला काही सुचेना, चहाचे कप बघता बघता बघता बघता संपले. संध्याकाळ झाली मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. विचार करून करून डोळे निस्तेज झाले होते. बाहेर येऊन पाहिलं तर घरातले एरव्ही दिवसा सुद्धा चालू असणारे दिवे अंधार पडायला आला तरी चालू नव्हते. मी स्वयंपाक घरात डोकावून आई ला हाक दिली. कोणीच नव्हतं. अरे गेले कुठे सर्व असा विचार मनात येतो न येतो तोच फोन ची रिंग वाजली. आई चाच फोन होता. ती नातेवाईकांच्या घरी पूजेला गेली होती आणि बाबा पण ऑफिस मधून थेट तिथेच जाणार असल्याचे कळलं. मी तडख मित्रांना फोन लावले पण एक हि त्या संध्याकाळी रिकामा नव्हता कोनाला ग...

प्रेमाचा पूल

Image
एका अंधारतल्या खोलीत एक ८० वर्षाची म्हातारी अंथरुणावर तिच्या शेवटच्या घटका मोजत होती. तिचा मुलगा अमेरिकेत त्याच्या कुटुंबासोबत राहत असल्यामुळे त्याला फारसं त्याच्या आईकडे लक्ष द्यायला मिळत नसे. पण त्याने त्याच्या आईच्या देखभालीसाठी एका कामवाल्या बाईची व्यवस्था मात्र करून ठेवलेली. कामवालीनेही काम करायचे पैसे घेत असल्यामुळे ती फक्त कामच करून निघून जायची तिच्याकडे म्हातारीशी बोलण्यासाठी वेळ नव्हता आणि म्हातारीनेही गेल्या एकदोन वर्षात महिन्यातून एकदा येणाऱ्या फोनवरून मुलाच्या आवाजाव्यतिरिक्त कोणाचाही आवाज ऐकला नव्हता.      नेहमी प्रमाणे आजही कामवाली बाई काम आटपून निघून गेली होती. म्हातारीने हि तीच लक्ष बंद खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या प्रकाशाच्या कवडस्या कड एकाग्र केलं होत. तिचा आता संपूर्ण दिवस त्या बंद खिडकीकडे बघत जाणार होता हे तिलाही चांगलच माहित होत. आजसुद्धा ती खिडकी बाहेरील जिवंत जगाचा अंदाज लावण्यात मग्न होती. अचानक तिला खिडकीबाहेरील पक्षांचा सुंदर आवाज आला तीच लक्ष विचलित झालं. तिला तो आवाज ओळखीचा वाटला आणि तिला तो आवाज खिडकीजवळ जाऊन ऐकायची इच्छा झाली. तिल...

लहान माझी बाहुली...

Image
छोटस गावं होत. त्या गावात एक कुटुंब राहत होत. ते घर गावच्या वेशी पासून जवळच होत. त्या कुटुंबात नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुली आनंदाने राहत होते नवरा म्हणजेच हरिराम हा ग्रामपंचायत समिती मध्ये कामाला होता आणि त्याची बायको अनिता हि घरची काम करत असे आणि या दोन्ही मुलींना सांभाळत असे. हरिराम चे आई वडील त्याच्या मोठ्या भावाकडे दुसऱ्या गावात राहत असत. त्यामुळे यांच्या घरात या चौघांव्यतिरिक्त कोणी नसे. कधी तरी सणासुदी ला सर्व एकत्र येत असत. हरिराम चा त्याच्या दोन्ही मुलींवर खूप जीव होता. त्यांचं घर गावाच्या शेवटी होत आणि त्यामुळे त्यांच्या घराच्या आसपास वर्दळ थोडी कमीच असायची. संध्याकाळची वेळ होती. त्या दोघी खेळात रमल्या होत्या. त्यांच्या आईने आतून आवाज दिला. ''चला बस झालं आता अभ्यासाला बसा बाबा यायची वेळ झालीय. आणि त्या दोघी बाथरूमकडे पळाल्या अनिता ने बाहेर येऊन टीव्ही चालू केला आणि तिची आवडती सीरिअल लावून स्वयंपाक घरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. सायंपाक घरातल्या खिडकीतून वेशीवर असेल वडाच मोठं झाड स्पष्ट दिसत असे. रातकिड्यांचा आवाज दिवस असताना पण किर्र्र्र ...

बाजार

काल रात्री तू ओरबाडलं होतंस मला असेल तुझ्या नखात अजून माझं मांस सिगारेट चे चटके देत देत तोंड दाबलं होत होता तुला माझ्या ओरडण्याचाहि त्रास  दाताचे ठसे माझ्या छातीवर आणि गळ्यावर शरीर माझं खराब करतोय तीच माझी अर्धी भाकर माझ्या शरीरावर तुझी भूक भागवतोयस मी पण माणूस आहे माझी पण असू दे कदर