भुताचं मनोगत
माझा एक ब्लॉग आहे आणि त्यातले माझे फॉलोवर वाढावे म्हणून रोज एक कथा टाकायचो आणि लेखक म्हणून मिरवू लागलो भेटेल त्या सोशल मीडिया ला मी माझ्या कथेने सोसायला लावलं. माझी जास्त रुची भयकथा लिहिण्यात वाढू लागली. एखाद्या भयकथेला जास्त प्राधान्य मिळालं म्हनून की काय ठाऊक नाही पण हो भयकथा आता आवडू लागली होती विचार करायला आणि लिहायला सुद्धा. पण त्या संध्याकाळी काही विचित्र घडतं गेलं. मी शनिवारी सकाळी एक हॉरर स्टोरी लिहिण्यासाठी बसलो पण काहिच सुचेना. दिवस गेला काही सुचेना, चहाचे कप बघता बघता बघता बघता संपले. संध्याकाळ झाली मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. विचार करून करून डोळे निस्तेज झाले होते. बाहेर येऊन पाहिलं तर घरातले एरव्ही दिवसा सुद्धा चालू असणारे दिवे अंधार पडायला आला तरी चालू नव्हते. मी स्वयंपाक घरात डोकावून आई ला हाक दिली. कोणीच नव्हतं. अरे गेले कुठे सर्व असा विचार मनात येतो न येतो तोच फोन ची रिंग वाजली. आई चाच फोन होता. ती नातेवाईकांच्या घरी पूजेला गेली होती आणि बाबा पण ऑफिस मधून थेट तिथेच जाणार असल्याचे कळलं. मी तडख मित्रांना फोन लावले पण एक हि त्या संध्याकाळी रिकामा नव्हता कोनाला ग...