५ वा मजला.
त्या दिवशी ऑफिस मध्ये काम खूप असल्यामुळे सुशांत थोडा लेट निघणार होता. सर्व स्टाफ बघता बघता कमी झाला. आता फक्त सुशांत एकटाच ऑफिस मध्ये उरला होता. त्याने सर्व काम आटोपलं घड्याळात बघितलं तर १० वाजले होते त्याने कॅब बुक केली आणि ऑफिस लॉक करून बाहेर येतोय तोच पाऊस सुरु झाला. तो खालीच उभा राहून टॅक्सिची वाट पाहू लागला. आणि थोड्याच वेळात बिल्डिंग च्या आवारात टॅक्सी आली सुशांत ने बाहेरून त्याचा फोन दाखवला कॅब चालकाने हि त्याचा फोन दाखवला सुशांत डोक्यावर हात ठेवत कसा बसा टॅक्सिजवळ पोहचला. दार उघडून आत आला. टॅक्सी चालकाला म्हणाला चलो भाई चेंबूर सहकार प्लाझा तिलक कॉलनी लेलो. चालकाने त्याच्या स्क्रीन वर मॅप चालू केला. एफ एम वर जुनी गाणी चालू झाली. सुशांत रुमालाने केस पुसत होता. तेवढ्यात रेडिओ वर गुमनाम है कोई गाणं चालू झालं. सुशांत चालकाला म्हणाला अरे भाई कूच दुसरा गाना लागाव. ये भूतो वाला क्यो लगाके रखा है. चालकाने हसून मागे बघितलं आणि गाणं बदललं. पावसाला पण अजून चेव चढला होता त्यात टॅक्सी चालक पण जोरात टॅक्सी चालवत होता. जीव मुठीत घेऊन सुशांत त्याच्या घराच्या आवारात पोहोचला बिल्डिंग...